आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्या साठी भारतातील हिंदू सुवसिणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्रत करतात. करवाचौथ, वटपौर्णिमा अशी वेगवेगळी नाव त्याला आहेत. जशी वेगवेगळी नाव, तश्याच वेगवेगळ्या कथा ही त्याला जोडल्या गेलेल्या आहेत.
वटपौर्णिमेच्या दिवशी बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्य साठी अख्खा दिवस उपास धरतात. करवाचौथ च्या दिवशी सुद्धा बा
आपली बायको आपल्या साठी व्रत करते म्हणून काही नवरे पण त्या दिवशी व्रत ठेऊन उपास करतात. तुम्ही पण असा उपास करून आज-तक वर येण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्या नशीबात नाही. त्या साठी तुमचं अमिताभ बच्चन शी काहीतरी नात असणं जरुरीच आहे. अमिताभ बच्चन पण म्हणे जया बच्चन साठी करवाचौथ चा दिवसभर नीळजळी उपास करतो. त्याचं exclusive coverage आज-तक वर दाखवण्यात येते. पुढे अभिषेक आणि ऐश्वर्या चं लग्न झाला. मग अजून एक news चं खाद्य आज-तक ला मिळाल. हि नवी, modern सून करवाचौथ चा व्रत करणार का? आणि अभिषेख पण आपल्या वादिल्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन नीलजळी उपास करणार का? क्या हे आपका जवाब हमको भेजो YES / NO और भेज दिजीये ५८५८५८ पार". अख्ख्या भारताला सातविणारा प्रश्न असल्या सारखं ती news दाखवली जाते. असो.. त्यांच्या सुखी संसारात आपला प्रवेश एवढाच.
वटपौर्णिमा जवळ आली की हमखास एक प्रश्न मैत्रिणी एक
१. छे! काहीतरीच काय! मी modern मुलगी आहे, एकविसाव्या शतकातली. You know I don’t believe in this Vatpornima and all. Taking 7 rounds to that tree looks so filmy. असा म्हणणाऱ्या मुलींचा Valentine day वर मात्र विश्वस असतो. :P
२. माझा नवरा पण जरका माझ्या साठी उपास करणार असेल तरच मी त्याच्या साठी उपास करीन.. अथवा नाही.
३. शी सात जन्मी एकाच नवरा काय. काही चोईसे नकोका? एक जन्मी सहन करते आहे तेच पुष्कळ झाला. ७ जन्म अशक्यच, असं दोन्ही नवरा/ बायको ची मत.
४. मी ह्या वर्षी उलटे फेरे मारणार आहे. अथवा हा जन्म ७ वा असूदेत.
६. काही मुली देवाकडे असं ही मगण करतात की देवा मला ७ जन्म हाच नवरा चालेल, पण जरा सुधारलेल्या आवृत्तीमध्ये.
७. माझ्या एका मैत्रिणीने तर height केली. आपण ७ जन्म हाच नवरा का मागायचा ह्याचा तिचा logic भन्नाट आहे. की ह्या जन्मीत्याला सुधारवण्यासाठी घेतलेली महिनात वाया जाता कामा नये. नवऱ्याला सुधारायला ७ जन्म लागतातच. पुढच्या जन्मी दुसरा नवरामिळाला तर ह्या जन्माची आपली महिनात वाया तर जातेच पण परत पाटी कोरी असल्यामुळे पालील्यापासून नवऱ्याला सुधारायलासुरवात करायला लागते.
तुम्हीला कोणत्या पर्याय आवडला हे मला सांगण्यासाठी type करा १, २, ३, ४, ५, ६ का ७, आणि पाठवा Comment मध्ये. :-)
मुली असं म्हनातात तेथेच मुल म्हणतात, तुम्हा मुलींना व्रत वगैरे करून हाच नवरा ७ जन्म हवा/नको असं पर्याय तरी आहे. आम्हाला जी पदरात पडेल तिलाच स्वीकारावे लागते. हा अन्याय आहे.
मुली मस्करी मध्ये काहीही बोलत असूदेत, पण आज सुद्धा मुली तितक्याच श्रद्धेने हे व्रत करतात. ह्यात modern, orthodox वगैरे कोणताही "पणा" नसतो. आपल्याला आवडणाऱ्या, आपण ज्याचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे त्याला निरोगी आणि दीर्घयुषा लाभो असं सगळ्याचबायकांना वाटत.
******************************
वटपौर्णिमे बद्दल थोडक्यात - सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशीवडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते.
ज्येष्ठ महिना. नावाप्रमाणेच सर्व ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा हा महिना. ऋतूचक्रातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो.हा महिना तसा गंभीर, शांत आणि संथही. ग्रीष्माची चाहूल लागलेली, आभाळ भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला,मध्येच पावसाची हलकी सर येणार्या पावसाळ्याची आठवण करून देते. उन आणि पावसाळ्याचं 'फ्यूजन' म्हणजे हा महिना. निरोपघेणारा उन्हाळा नि सुरू होणारा पावसाळा यांची गळाभेट या महिन्यात पाहता येते. अशा या स्वप्नील वातावरणाला धार्मिकअधिष्ठानही लाभले आहे.
*****************************************************************************************************************
करवाचौथ बद्दल थोसक्यात - करवा म्हणजे तोटी (spout) असलेल एक मातीच मडक आणि चौथ म्हणजे चौथा दिवस. ह्या दिवशी सुवासिणी बायका निळजळी उपास करून रात्री चंद्र दर्शनानेच नवऱ्याच्या हातून पाणी ग्रहन करून उपास सोडतात. करवाचौथ ची अशी कथा आहे की, विरावती नवची एक रुपवान मुलगी होती. तिचा विवाह एक राजकूमाराशी झाला. पहिल्या करवाचौथ चा दिवशी ती माहेरी आली आणि तिने कडक व्रत केला. पण तिची तब्बेत खराब झाली. तिला ७ भाउ होते, त्यांना तिची अवस्था बघवली नाही. म्हणून मग त्यांनी पिंपळ्याचा झाडामगून आरश्या चे प्रतिबिंब पडल. तो चंद्र अहे अस समजून विरावतीने अपल व्रत सोडल. पण लगेचच तिचा नवरा आजरी पडला. तेव्हा तिला सांगण्यात आल की तिच्या हातून करवाचौथ चा व्रत मोडला गेला आहे आणि तो तिने पुर्न केला. अश्या प्रकारे तिने तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवले.
2 comments:
मॉडर्न वटपौर्णिमेबाबतचे सातही पर्याय भन्नाट आहेत. तसेच करवा चौथ संबधीची नेमकी कथा काय आहे हे पहिल्यांदाच समजले. छान आहे ब्लॉग.
आयुष्य प्रार्थना
Post a Comment