Friday, September 26, 2008

लग्न, ज्योतिषी आणि मी。。。

अडचणीत माणसाला देव आठवतो म्हणतात. मी म्हणते, कलियुगातल्या माणसाला अडचणीत ज्योतिषी आठवतो. कलियुगात माणसाला देव भेटेल हे दुर्लभच. मी सुद्धा ह्या न त्या कारणांसाठी ज्योतिष्याकडे कडे गेले अहे. माझा जन्म २९ डिसेंबर १९८१ ला पहाटे १.१४ मि. ला - मुलुंड - मुंबईला झाला. [ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणा~यांनी खुशाल माझी पत्रिका मांडावी आणि माझे फुकट भविष्य सांगावे. ] आता पर्यंत अनेक ज्योतिश्यांनी माझी पत्रिका मांडली आहे. पत्रिकेप्रमाणे माझे दर सहा महिन्याने चांगले दिवस येतात. प्रत्येक्षात मात्र 'त्या' सहा महिन्यांची वाट मी अद्याप पहात आहे. वेळेप्रमाणे मांडलेल्या गणितात माझे ग्रह उच्च स्थानी असतात किंवा सहा महिन्यानी ते उच्चीचे होणार असतात. प्रत्येक्षात तसे घडत नाही आणि मग सुरू होते पुढल्या सहा महिन्यांची प्रतिक्षा. मला तर वाटतं माझी जन्माची वेळच त्या डॉक्टर ने चुकीची नोंदवली आहे. सगळे ग्रह मजबूत व उच्चीचे असताना घोडं अड़ते कुठे हेच समजत नाही.

मुलीच्या लग्नाची काळजी सगळ्याच आई - वडीलांना असते तशी माझ्या आई बाबांना पण आहे. अपल्या मुलीला योग्य असा जोडीदार मिळेल का? [आजकालच्या नवीन अमेरिकन फॅड प्रमाणे मुलगी जावईच शोधेल ना? अस पण काही आई वडिल या ज्योतिष्याकडे तसल्ली करून घेत असावेत. नाहितर ही आमच्या मुलिची बायको, अथवा हा आमच्या मुलाचा नवरा अशी ओळख करून देण्याची वेळ येईल ह्याची धास्ती. तो काळ अता भारतात दूर नाही म्हणा!!.] असो... तर मी पण माझे ग्रह सध्या कोणत्या घरात वास्तव्याला अहेत हे विचारायला जोतिष्याकडे गेले. मी ज्या घरात जन्मले त्याच घरात अद्याप राहते आहे. पण माझ्या ह्या ग्रहानी आता पर्यंत अनेक घर बदलली आहेत. बर घर बदलून तेथे वास्तुशांत नको का करायला? दोन चार संस्कृत श्लोक म्हटले की घरात शांतता नांदते. [घरात म्हणजे घरातल्या माणसात असे समजू नये.] माझे ग्रह घर बदलून वास्तुशांत करत नसावेत, म्हणून मग ते घर मला त्रास द्यायला लागत.

。"तुमच्या मुलीचं लग्नानंतर भाग्य उजळणार आहे" अस एकाकडून समजले. माझ्या नव~याच्या ग्रहांच्या मांडणी नुसार लग्नानंतर हाल अपेष्टा असाव्यात, तरिच तो आजून मला भेटलेला नाही.

。"तुझा नवरा पायलट असेल" अस एका पठ्ठ्याने मला सांगितले. त्या दिवसा पसून मी अनेक वर्षे विमानाकडे डोळे लाऊन बसले होते. नंतर त्याच ज्योतिष्याने काही वर्षांनी मला software engineer नवरा मिळेल असे सांगितले. माझ Plane अश्या प्रकारे office मधे Land झाले. लग्नाला उभ्या असलेल्या मुलींच्या भावनांशी असे खेळू नये :-(

。 एका जोतिषाने तर सांगीतले, "ह्या मुलिशी जो लग्न करेल तो मुलगा खूप भग्यवान असेल म्हणे". थापड्या जोतिषी नुसता. माला तर स्वता:लाच स्वताच्या नव~याची दया येते. माझी अखंड बडबड सहन करायला लागणार आहे त्याला. आणि तो भाग्यवान?

。 Arrange marriage चांगले का Love marriage हा सगळ्यांना पडणारा प्रश्न. मला कशाचाच तिरस्कार नाही. Arrange किंवा Love किंवा Marriage ह्या सगळ्यांच्या बाबतीत मी समतोल विचारांची आहे. पण तो arrange marriage मधला "मुलगी बघण" हा प्रकार काही मला झेपलेला नाही आणि जमणार पण नाही. अम्हाला पत्रिका बघायची नाही - आमचा ह्यावर विश्वास नाही, असे ठासून सांगणारे पुढे म्हणतात, "पण मुलीला मंगळ तेवढ नको" हा अर्धवट पणा. मुलीचा संपूर्ण फोटो पाठवा - कशाला ? माझे पायगुण बघायला? काय हा पोरकट पणा. [अश्या लोकांना प्रतिका पाठवायची नाही... अस मी आईला सांगितले. त्यावर आईने मला ४ (४०००) समजूतिच्या गोष्टी सांगितल्या.]

。ह्याला कंटाळून मी एका जोतिष्याला सरळ विचारले,"माझ love marriage होईल का? योग आहे का?" त्यावर त्यांनी "तुझा love marriage चा योग निघून गेला" अस सांगितल. निघून गेला? असा कसा निघून गेला योग? बर मग योग जेव्हा केव्हा होता तेव्हा ३-४ नाही तरी एखाद्या तरी मुलाने मागणी नको का घालायला? मला योग आलेला कळायच्या आतच तो योग शेजारच्या घरात निघून गेला :-(

माझ तर ह्या ज्योतिष्यांना एक सांगण आहे - काही ज्योतोषी सांगतात... पूर्वेला किंवा उत्तरेला किंवा अग्नेयला जा अस सांगण्यापेक्षा सरळ पत्ता का नाही देत? सरळ मला पत्ताच सांगा न!

लग्न, ज्योतिषी आणि मी。。。यांचे ग्रह आजून जुळलेले नाहीत.

Tuesday, September 09, 2008

"Valley of Flowers - पुष्पवटी"

"Valley of Flowers - पुष्पवटी"
ऑगस्ट - १७ ऑगस्ट २००८

Its rightly said, "The World is a book, and those who do not travel read only a page."

चरातीचराती चरतो बघ: - जो चालत असतो तोच ज्ञान प्राप्त करतो. ट्रेकिंग करण्यामागे हेच कारण आहे. आपल्या भारत देशात एवढी विविधता आहे, अनेक रंग त्याच्या विविध छटा, अनेक भाषा, अनेक चेहरे, प्रत्येक जागेचा स्वत:चा असा इतिहास, त्यातून आलेला पेहराव आणि संस्कृती हे भाराऊन टाकणारे आहे. भारत देशाकडे ह्या दृष्टीकोनातून बघणारा ह्या देशाच्या प्रेमात पडला नाही तरच नवल! एकीकडे सैह्याद्रीचा रौद्र कडा तर दुसरीकडे हिमालयाचा विस्तार. एकीकडे खवळलेला समुद्र तर दुसरीकडॆ विस्तिर्ण वाळवंट, एकीकडे शांतपणे वाहणारी कृष्णा तर दुसरीकडॆ दुथडी वाहणारी गंगामैया. आमचा हा ट्रेकसुद्दा या गंगामैयाच्या दर्शनानेच सुरू झाला.दिवसदिवस पहिला - ९ ऑगस्ट २००८
९ ऑगस्टला गरिब ? रथ ने आम्ही मुंबई हून दिल्ली ला निघालो. 'गरिब'रथात सगळ्या सुविधा होत्या, नव्हता तो म्हणजे कोणीगरिब. गाडीत गेल्या-गेल्या adjustment ला सुरवात झाली. १ भला माणूस चटकन जागा बदलायला तयार झाला. तो इतका adjustable होता की आम्ही मजेत म्हणालो सुद्धा - ह्याला कुणी टपावरची जागा adjust कराल का? अस विचारल असत तर तो भला माणून टपावर पण गेला असता. त्यात एक मिठाचा खडा अला, एक शिष्ठ माणूस - शिष्ठ नाहितर काय, एवढ्या भल्या शब्दात आणि गोड अवाजात मी त्याच्याशी बोलले तरी शिष्ठ बुड हलवायला तयार नाही. काही माणसं पैदाइशी दु:खी वाटतात त्यातला तो. असो .... तर आम्ही दिल्लीला पोचलो.दिवसदिवस दुसरा - १० ऑगस्ट २००८
दिल्लीवरूनदिल्लीवरून हरिद्वारला जाण्यासाठीची Train म्हणजे 5 Star hotel मधून चहाच्या ठेल्यावर आल्यासारखे वाटले. हरिद्वार च्या राम झुल्यावर परत एकदा जाऊन मजा आली. ८ वर्षा पूर्वी आई - बाबां बरोबर आले होते. गांगेचा किनार, अलोट भक्तांची गर्दी, लक्ष्मण झुला, बोलो बंबम - बंबम चा जयघोश, सगळ तसच होत. GMVN 「गढ़वाल मंडल विकास निगम」 मधला आमचा मुक्काम मस्त झाला.दिवसदिवस तिसरा -११ ऑगस्ट २००८
पहाटॆपहाटॆ उठून आम्ही आमच्या हरिद्वार ते जोशीमठ प्रवासाला लागलो. त्या बस मधे आमच्या सोबत होते ते बिहारी बाबू. त्यांच्या आंगाला येणारा वास आणि त्यांच्या न संपणा~या बिड्या. दर वर्षी फ़क्त एकदा गंगेत येउनच स्नान करत असावेत. त्यांच्या अंगाच्या वासाच्या जोडीला त्यांच्या बिड्या. त्यांच्या बिडीच्या धुराने आम्ही सर्वांनी किती बिड्या ओढल्या ते गंगामैयालाच ठाउक. आम्हा सगळ्यांच १-२ वर्ष आयुष्य कमी झालं हे नक्की. चौदा तासाचा तो बिडीमय प्रवास म्हणजे भारतातल्या गलिच्छ लोकांच दर्शन होत. अजून तो धूर आठवला की खोकला येतो. पण त्याला तडा द्यायला होते गंगामैया च्या घाटातले वेडेवाकडे वळण. Driver अश्या वळणावर गंगामैयाचा घोश करत, "बोलो गंगामैया की जय"असे म्हणून ते वेडेवाकडॆ वळण पार करत असत. ह्या सगळाला सोबत होती ती म्हणजे सुंदर अशा निसर्गाची. डोळे दिपवून टाकणे म्हणजे काय ते येथे समजल. चौदा तासाचा तो गलिच्छ लोकांबरोबरचा प्रवास मी मनसोक्त photography करून घालवला. गंगामैयाला भेटायला आलेले ढग म्हणजे - "अप्रतिम" हा एकच शब्द. खाली वाहणारी गंगामैया, मोठाले पर्वत, आणि ढग असा अनोखा संगम आपणास पहावयास मिळतो. आपल्या जवळच्या मैत्रीणीला भेटायला आतूर झालेली भागिरथी खळखळत वाहात येउन कडकडून अलखनंदेला येउन भेटते. हा अलखनंदेचा आणि भागिरथीचा मैत्रिपूण संगम, ह्यालाच पूढे जाउन आपण गंगा म्हणून ओळखतो. अलखनंदा आणि भागिरथी च्या संगमाचा आनंद घेत आम्ही तो प्रवास करित होतो. तेवढ्यात गिरिशचा किन्चाळण्याचा आवाज आला, " अरे गाडी थांबवा, कुणीतरी ओकलायं माझ्यावर". आम्ही गोंधळून गेलो, कसली गडबड तर दिसत नव्हती. मग लक्षात आले , गिरीषच्या मागे बसलेल्या माणसाने त्याच्या आंगावर उलटी केली होती. मुळात गिरीष बस लागते म्हणून Window seat शी बसला होता तर त्यालाच असा प्रसाद मिळावा? मग काय सगळ्यांनी मिळून त्याला जाम पिडले. जाम मजा आली. त्यात अमोल ने तर height केली, त्या माणसाला त्याने जाऊन विचारल, "भाईसाब, क्या आपका अभिबी जी मचल रहा हे?" अमोलच नशीब बरवत्तर म्हणून बर, आणि हा प्रश्न त्या माणसाच्या बायडीला विचारला नही म्हणून वाचला म्हणायचा. असे सगळे चांगले - वाईट अनुभव घेउन आम्ही जोशीमठ ला पोहोचलो. शंकराचार्यांच्या मठात जाण्याचा योग आला. शंकराचार्यांनी बांधलेल्या चार मठांपेकी हा एक. बाकिचे तीन मठ म्हणजे, रामेश्वर - दक्षिण, द्वारका - पश्चिम आणि पुरी - पूर्व.

दिवस चौथा - १२ ऑगस्ट २००८
"हेमकुंड"


देवदेव काही लोकांना फुरसतीने बनवतो म्हणतात, तसच काही जागा सुद्धा देव फुरसतिनेच घडवतो, त्यातली एक म्हणजे "Valley Of Flowers - पुष्पवटी" आणि "हेमकुंड". देवाने ह्यात इतके विविध रंग भरले आहेत, इतकं नाजूक नक्षीकाम केल आहे की डोळे दिपून जातात. जोशीमठ ते घांगरीया हा १३की. चा प्रवास आम्ही खेचरावर / घोड्यावर केला. मी आधी बसले त्या खेचराचे नाव विरू. अत्यंत बेकार खेचर. मी बसल्या बसल्या महाराज निघाले आणि मला घेऊन एका खड्यात उतरले. मी तो पर्यंत नीट मांड पण टाकली नव्हती. स्वता:ला वाचवण्याच्या गडबडीत मी एका काटेरी झाडाला पकडले. पूढे खूप दिवस बोटं सुजलेली होती. मी कॉलेज ला असताना थोड Horse riding केल आहे. पण ते अत्यंत trained horse होते. ह्या विरूनी जाम त्रास दिला. शेवटी मी आणि अमोलने खेचर बदलली. बसंती दमदार होती. २-३ तासात आम्ही घांगरीयाला पोहोचलो. त्याच दिवशी हेमकुंड करायचं असं ठरलं. वेळ कमी असल्या कारणाने आम्ही परत खेचरावरून /घोड्यावरून जायचं ठरवल. आम्ही हेमकुंडाकडॆ जात असताना आम्हाला परतीचे प्रवासी भेटत होते, "अभी तो गुरुद्वारा बंद हो गई, अब जानेसे कोई फायदा नही" असले सल्ले मिळाले. पण आमच्या नशीब बलवत्तर होत. आमच्या आग्रहास्त्व त्यांनी गुरुद्वारा उघडली. गुरु गोविंदसिंग ह्यांच्या स्मरणार्थ बांधलेली ही गुरुद्वारा शिख लोकांच दैवस्थान आहे. गुरुद्वाराच्या मागे आहे - हेमकुंड. हेमकुंड- हेम म्हणजे हिमालय आणि कुंड. हिमालयाचा कुंडा. हे साधारण १५००० फुटांवर वसलेल आहे. प्रचंड थंड अशा त्या कुंडात सरदार डुबकी मारतात. हिंदू लोकांसाठी गंगेला जे महत्व आहे, ते महत्व हेमकुंडाला शिख लोकांमधे आहे. अशा पवित्र कुंडात डुबकी मारण्याची हिम्मत झाली नही. पण मग मी ते अती थंड पाणी डोळ्यांना लावल. त्या थंड आणि पवित्र पाण्यात हात घालून माझी बोटांची सुज कमी झाली. तेथे असलेल्या लक्ष्मण मंदिरला भेट देउन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. हेमकुंडा वरून परत येताना घोड्याची सवय झाली असली तरी परतल्यावर शरिरात जितकी म्हणून हाड (शिल्लक)होती ती सगळी बोलायला लागली होती. घांगरीयाला आल्यावर मात्र गरम पाण्याने आंघोळ केल्यावर बर वाटल . हा पहिलाच असा ट्रेक होता जेथे आम्हाला आंघोळ करण्याचा आनंद मिळाला. असं सुख ट्रेकला दुर्लभच. अर्थात आंघोळ करुन fresh होऊन आम्ही झोपी गेलो हे ओघाने आलेच.


दिवसदिवस पाचवा - १३ ऑगस्ट २००८
"Valley Of Flowers"सकाळीसकाळी लवकर तैयार होऊन आम्ही Valley ला निघालो. 「रघुविर चौव्हाण」 हे आमचे लोकल गाईड 「Local Guide」. M Sc Botany झालेले चौव्हाण गेली ३० वर्ष Valley मधे एक अभ्यासक म्हणून हिंडत आहेत. Ticket काढण्यासाठी आम्ही थांबलो असताना, मी पिट्टूत बसून घेतले. घोड्यावर बसताना पण माला जेवढी भिती वाटली नव्हती तेवढी भिती मला ह्या पिट्टूत बसताना वाटली. एक तर आपण कुणा माणचाच्या पाठीवर बसायचे ही कल्पनाच मनाला पिळ पाडण्यासारखी आहे. [अर्थात, ढष्ट - पुष्ट सरदार आणि सरदारीणींना ह्या पिट्टूत बसलेल बघून, "रोज माझ्या सारख भाड मिळूदे" अशी त्या माणसाने गंगामैयाला साकड नक्की घातल असणारच.] Valley मधे साधारण ३५० प्रकारची फुले अढळतात. लोकांच असा समज आहे की जुलै - ऑगस्ट ह्या सिझन मधे आपल्याला ही सर्व फुल बघावयास मिळतील. सरांनी सांगितल्याप्रमाणे, वर्षभरात वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळी फुल उमलतात. बर्फ असताना उमललेली फुल बर्फाबरोबर नाहिशी होतात. तर काही बर्फ वितळण्याच्या वेळेला, तर काही पावसाळ्यात अढळतात. Forget me not, Arisaema Tortuosum, Geranium Wallichianum, Codonopsis Virdis etc. असे अनेक फुलांचे प्रकार आम्ही बघितले. [ही सगळी नाव माझ्या स्मरणशक्ती मुळे आठवून लिहीलेली नाही. पुस्तकातून शोधून लिहीली आहेत, उगाच गैसमज नको.] नचिकेत ने ह्यावर एक भारी किस्सा केला होता. सर फुलांची नाव सांगत होते आणि आम्ही नविन नावाबरोबर आधिच नाव विसरत होतो. त्यावर नच्याचे टिपण असे की, सरांना आपण कुठे चुकू नये म्हणून बरोबर घेतल आहे, बाकी काही नाही. [त्याच्या ह्या जोक ला, नंतर आम्ही 'Best Joke of the Trek" अस award दिलं.] Valley सरांनी आम्हाला पहिल्या फुलाची माहिती दिली आणि गिरिशला नेहमीप्रमाणे बाळबोध प्रश्न पडला, ही फुल आपण खाऊ शेकतो का? फळ खाण्यासाठी असतात हे माहिती होत पण फुल खाण्यासाठी कोण विचारेल अस वाटल नव्हत कधी! एक निळ्या रंगाच फळ खाण्याची परवानगी सरांकडून मिळाली. गिरिश ने ती असंख्य प्रमाणात खाल्ली हे सांगायला नकोच. Valley म्हणजे देवाची बाग. ही बाग देवाने अनेक रंगांनी नटवली आहे. त्या Valley ची गुलाबि छटा बघून कुणाचे 'होश' उडले नसतील तरच शपथ! असंख्य फुल, Glacier बघून व मनसोक्त photography करुन आम्ही परतलो. मन ह्या फुलांनी फुलून गेले होते.देवाने ज्या प्रेमाने येथला निसर्ग नटवला आहे तसच येथली माणस.


दिवासदिवस सहावा - १४ ऑगस्ट २००८

ह्याह्या ट्रेक मधे दोन अविस्मरणीय गोष्टी घडल्या, त्यातली एक. परतीचा प्रवास - घांगरीया ते गोविंदघाट. परतीच्या प्रवासात मी आणि मानसी सोडल्यास सगळ्यांनी चालत जायच ठरवल. मानसीचा पाय वाईट दुखावला गेल्यामुळे आणि मला horse ridingचा आनंद लुटायचा होता म्हणून मी - असे दोघींनी घोडे घेतले. मी ह्या वेळी घेतलेला घोड्याचे नाव "शेरू" ! अत्यंत रुबाबदार असा हा घोडा. Tall - Dark and Handsome. एके ठिकाणी checkpost वर आम्ही थांबलो असता, माझ्या घोड्याचा मालक receipt शोधण्यात मग्न असताना, त्याने शेरूला चरण्यासाठी बाजूला सोडले. हे महाशय असे थांबणार थोडीच!!. ते निघाले मला एकटीला घेऊन . सुरवातीला मजा वाटली पण मग हे थांबायच नावच घेईनात. अर्चनाने सुरवातीला घोडा केला होता. मी पुढे जाऊन तिच्या घोडेस्वाराला माझा घोडा थांबवायला सांगितला. मग मात्र मला चेव आला आणि मी जवळ्जवळ तीन साडे तीन तास त्या valley तून एकटीने मनसोक्त horse riding केल. त्या घोडेवाल्याले मला लगाम कसा ओढून घोड्याला दिशा दखवायची, टाच मारून त्याला चल म्हणून सांगायचे हे शिकवले. "हिबरू" हा एक शब्द मी त्याच्याकडून शिकले. हिबरू म्हणजे - "चलिऎ, चला हुहूर." मधे एके ठिकाणी एका ठेल्यावर तो स्वता: थांबला. थांबला म्हणजे ठेल्याच्या समोरच्या एका उंच जागी चढला [सवई प्रमाणे], तेव्हा मी एवढ्याने ओरडले. [त्या वेळेला त्याला कुणितरी पाठिवर बसल्याची जाणीव झाली असेल.] पण मग मी बिंद्दास होऊन मनसोक्त horse riding केल. मधे मी आमच्या ग्रुप च्या खूप पुढे आले होते, म्हणून मग आम्ही एके ठिकाणी थांबलो. मी लगेच फोटो काढण्यात मग्न झाले. तव्हा शेरू ने माझ्या खांद्यावर अलगत मान टाकली. तो क्षण माझ्या आयुश्यातला आनंदाचा क्षण. This was the most memorable day and moment of my life. गोविंदघाट ला उतरल्यावर मी त्या घोड्याला एक गळ्यातला पट्टा विकत घेतला, माझी आठवण म्हणून. घोडेवाल्याने आम्हाला गोविंदघाटाच्या बरच आधी सोडल्यामुळे आम्हाला आमच्या बॅगा उचलाव्या लागल्या. जोशीमठ ते हरिद्वार मार्गा वर landsliding झाल्यामुळे आम्ही बद्रिनाथला जायचे रद्द केले. त्यावेजी आम्ही औलीला गेलो. औली हे skiing करण्यासाठीचे भारतातले प्रसिद्ध ठिकाण. ह्या ठिकाणी cable car नी जावे लागते. परत जोशीमठात येऊन आम्ही थोडा timepass करून झोपी गेलो.


दिवसदिवस सातवा - १५ ऑगस्ट २००८

Most thrilling, exciting, horrifying day. This thrill was exclusively captured by Sharvani n Amey's channel. जोशीमठातून आम्ही हरिद्वारला निघालो. आमच्या सुदैवाने आदल्या दिवशी पूर्णपणे बंद असणारा जोशीमठ ते हरिद्वारचा महामार्ग , आम्ही निघालो त्याच्या १ तास आधी सुरू झाला. मुसळधार पावसामुळे खूप ठिकाणी landslide झालं होतं. अशाच एका landsliding मुळे आम्ही अडकलो . मी, अर्चना, अमेय, गिरिश आणि अमोल ते बघण्यासाठी उतरलो. काही लहान - मोठे दगड - धोंडे बाजूला केल्यावर एक मोठा दगड काढण्यासाठी सुरंग लावण्याचे ठरले. सगळ्या लोकांना लांब करण्यात आले. "गाडी में जाके बैठो " असे सांगण्यात आले. पण आम्ही धाडसी [अगाऊ] बाहेरच थांबलो. मी आणि अमेय हे सगळ Live आमच्या कॅमेरात टिपण्यासाठी म्हणून आतूर होते, आणि जरा अगाऊगिरीने पुढेच उभे होतो. बारूद भरला गेला. मग त्या JCB च्या कामगाराने आधी बिडी शेलकावली आणि मग ती त्या वायरीला लाऊन त्याने धूम ठोकली. Countdown चालू झाले. मी कॅमेरा फोकस करून उभी होते. हात कापायला लागला. आणि काही सेकंदात एक मोठा विस्पोट झाला आणि त्या दगडाचे तुकडे उडाले. त्या क्षणी घाबरायला पण वेळ नव्हता. आम्ही धूम ठोकुन समोरच्या bus मधे चढलो. सगळ्यांची धावपळ झाली. त्या क्षणी मजा वाटली पण आता तो video परत बघताना त्याच गांभीर्य जाणवते. त्यात १५ ऑगष्ट ला माझ्या आईचा वाढदिवस. अशा दिवशी उसणे धाडस करायला नको होते. पण असो ... मजा आली, हे मात्र १०० टक्के खर. रस्ता सुरू झाल्यावर आम्ही निघालो आणि हरिद्वारला पोहचलो. भारतातल्या निसर्ग वरदानाला दारिद्र्याचा आणि अस्वस्छतेचा एक भयंकर शाप आहे. हरिद्वार station हे त्यातल एक उदाहरण. गंगेच अस्तित्व लाभलेल असताना station मधे दारिद्र्याची आणि गलिच्छ लोकांची गर्दी. अख्खे station म्हणजे शौचालय असल्यासारखा सगळी कडे वास मारत होता. त्या लोकांच्या भुकेल्या कुत्रां कुत्र्यांसारख्या नजरा. त्या station वर ३-४ तास कसे घालवले हे गंगेलाच ठाऊक. गंगा मात्र त्या वेळी मला एका असहाय नदी सारखी वाटली. खरच गंगा मैली हो गई! दिल्लीला जाणारी train आली आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.


दिवसदिवस आठवा - १६ ऑगस्ट २००८

सकाळीसकाळी साधारण ९.३० (7.30) ला आम्ही दिल्लीला पोहचलो. नवी दिल्लीला जाण्यासाठी आम्ही मेट्रो पकडली. Clock room मधे सामान टाकून आम्ही दिल्ली भटकंतीला निघालो. राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटला जाऊन आलो. मी हरिद्वार, दिल्ली ह्या दोन्ही ठिकाणी दहा एक वर्षांपूर्वी जाऊन आले होते. पण मित्र - मैत्रिणींबरोबर जाऊन मजा आला. संध्याकाळी ४.३० ला राजधानीतून मुंबईला निघालो. UNO खेळून आम्ही झोपी गेलो.


दिवसदिवस नववा - १७ ऑगस्ट २००८

सकाळीसकाळी साधारण ९.३० (8.30) ला आम्ही मुंबईला परतलो. मी एकटीच मुंबईची असल्यामुळॆ सगळ्याचा निरोप घेऊन मी परतले ते ह्या ट्रेकच्या चांगल्या अशा आठवणी घेऊन.


थांबा ट्रेक आजून संपला नाही आहे.

आम्ही ३१ ऑगस्ट ला पुन्हा भेटले. 'Prize Distribution' साठी.
१。 अमेय जांबेकर - उत्कृष्ट मॅनेजमेंट
२。 शर्वाणी खरे - Photography (First prize)
३。 सैरब मोघे - Photography (Second Prize)
४。 विनोद अलाट - a. Best entertainer b. Best Captions for the photograph (only nominee)
५。 मानसी मोघे - Best UNO player
६。 गिरीश पेंडसे - a. Khataron Ke Khiladi b. Creating entertaining scenes
७。 रोहित ढेकणॆ - Best Trekker
८。 मुकेश चौधरी - Kya aap paanchvi fail Champu Hai
९。 नचिकेत - Best joke of the trek.


[L-R] विनोद, गिरिश, मानसी, नचिकेत, सौरब, अमय, अमोल, अर्चना, तन्मय, गैरी, रोहित, मुकेश आणि मी [photographer]