Wednesday, May 25, 2011

Gulmohar - गुलमोहर"गुलमोहर"
ह्या झाड बद्दल तसं फारसं कुणी लिहिलेलं मला आठवत नाही. गुल म्हणजे फुल आणि मोहर म्हणजे मोराचा पिसारा. त्याला इंग्रजीत "Flame Tree" असं ही म्हणतात. ते त्याच्या फुलाच्या रंगामुळे. गुलमोहर बहरला की आग लागल्या सारखं ते झाड दिसायला लागतं म्हणून Flame Tree असा नाव त्याला पडलं आहे.

माझं आणि गुलमोहर ह्याच पण एक नातं आहे.गुलमोहर बहरला म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी हे समीकरण ठरलेलं. एरवी-तेरावी ओसाड पडलेल्या ह्या झाडाला उन्हाळा जवळ आला की पालवी फुटायला सुरवात होते.आता लवकरच उन्हाळ्याची सुट्टी सुरु होणार ह्याची जणू ती एक चाहूल असाते.

माझ्या लहानपणी माझा मुंबईच्या घरी असंच एक गुलमोहर आमच्या सुट्टीची, आमच्या दंग-मस्तीची वाट पहात मस्त डवरायचा. जणू आम्हा सगळ्या लहान मुलांना तो खेळायला बोलवायचा. त्या झाडाचा विस्तार एवढा मोठा होता की भर दुपारी सुद्धा अंगणात त्या झाडाची सावली सर्वत्र पसरायची. त्या झाडाच्या साक्षीने मग आम्ही लगोरी, डबाइस पैस, लपछपी, डोजबोल ई.खूप सारे मैदानी खेळ खेळत असू. भर दुपारी खेळताना त्या गुलामोहाराची साथ आम्हाला असायची. आई जेवायला हाक मरे परीयंत आम्ही त्या उन्हात खेळत असू. भूक-तहान सगळ्यांचाच विसर पडत असे. ते झाड आमच्या मस्तीचा, भांडणाचा, खोडकर पणाच साक्षीदार होता.

लहान मुलांचं जसं ते लाडका होतं तसंच ते मोठ्या माणसांचा सुद्धा लडक होतं. गुलमोहराची सावली त्याना देखील हवी हवीशी वाटायची. एवढी की त्यांनी त्या झाडा खाली एक पार बांधला. निवांत त्या पारावर सोसायटी ची सभा भरायची.अनेक पक्षी सुद्धा त्या झाडाला भेट देत असायचे. अनेक अश्या पक्षांनी त्या झाडावर आपला संसार सुद्धा थाटला.

एके दिवशी आमच्या त्या लाडक्या गुलमोहरच्या झाडावर renovation च्या नावाखाली कुल्हाड चालवली. आम्हा मुलांचा आनंदालाच
कुणीतरी नजर लावावी तसं हळूहळू आमचा खेळ आणि बालपण दोन्ही संपलं.

आज मला माझ्या DSK Visha मधे गुलमोहर बहरलेला दिसला आणि परत एकदा त्याने मला माझ्या लहानपणीची जणू सहालाच घडवून आणली.