Thursday, February 25, 2010

अहो! ऎकलत का?

अहो! ऎकलत का?


पूर्वीचा काळी हिंदू बायका आपल्या नव~याच नाव घेत नसत. त्यातूनच मग "नाव घेण्याचा" प्रकार सुरू झाला. त्या निमित्ताने त्या सणासूदीला आपल्या नव~याच चार-चैघांसमोर नाव घेत असत. एरवी त्या नव~याच्या नावाच नामकरण करत असत. "आमचे हे, अहो, धनी, चिंटुचे/मिनेचे बाबा" वगैरे वगैरे.. अहो ऎकलत का? ह्या नावाची एक serial पण जाम गाजली. धमाल comedy. पण .........


अहो ह्या शब्दाचा जपानी भाषेत अर्थ होतो,"Dumb person or Nuts". मराठी आणि जपानी भाषा किली मिळती जूळती आहे नाही? म्हणजे मराठी शब्द, त्याचा उपयोग आणि जपानी अर्थ. आजकाल आपण सरदार हा शब्दाचा जसा उपयोज करतो ना तसच काहीस तर झाल नही न ह्या जपानी भाषेमधे. तस बघता अशोक राजाच्या मुलीने आपली खूप संस्क्रुति जपानला नेली आहे. तिनेच तर नेला नाही हा शब्द?


आजकाल आपण," क्या सरदार हे रे तू!" अथवा "काय सरदार आहे!" अस बिंधास बोलतो. तसच जपानी लोक「あほちゃうか - आहोच्याका?」म्हणजे - कसला मंद आहेस! अश्या अर्थी वापरतात. सरदार लोकांच्या हर्कती बघून आपण हा शब्द काढला तसाच त्या जपानी लोकांनी काढाला असावा...


आजकालच्या मुली नव~याला नावनेच हाक मारतात. पण कधीतरी त्याला आदरार्थी हाक मारायला काय हरकत आहे, नाही? त्याचही समाधान आणि तुमच ही! :-) :-)