Wednesday, February 06, 2008

चहा...

" चहा पानम मनुष्याणांम प्रथमंम बुद्धिलक्षणंम"

चहा... हा एक छोटासा, पिटूकला शब्द पण केवढा मोठ्ठा दिलासा देऊन जातो. अस म्हणतात की पाण्याला कोणताही परीयाय होऊ शकत नाही... मी म्हणते, पाण्या सारखच चहाला सुद्दा दुसरा परीयाय नाही. चहा हा हवाच.

फुक्या लोकांची जशी आपापसात पटकन मैत्री होते की नाही, तशीच चहा शोकिन लोकांची पण मैत्री पटकन होते. दोन फुके office च्या break मधे बाहेर भेटतात आणि त्यांची आपापसात चटकन मैत्री होते. तशीच मैत्री चहा पिणा~यांची सुद्धा होते.

"चहा ची वेळ झाली की चहा पाहिजेच" असे शब्द कानावर पडले की मन भरून येत. मग दोन चहा बेवडे टपरी शोधतात. मी अनेक अश्या चहाच्या टपरींवर जाऊन चहा चा भुरके मारुन स्वाद घेतला आहे.

चहा आवडणाऱ्या लोकांच्या शरिरात एक नैसर्गीक घड्याळ असत, चहा ची वेळ दाखवणार. चहा ची वेळ झाली रे झाली, घडाळ्याचा गजर वाजायला लागतो
आणि अपोआप पावल चहा च्या टपरी च्या दिशेला वळतात. तो चहा चा गजर चहा घेतल्यावरच शांत होतो.

चहा चे तसे अनेक प्रकार आहेत. Black Tea, WhiteTea, Green Tea, Oolong Tea वगैरे वगैरे. चहा कोणताही असो, तो उत्तम बणवण्याची कला असते.

उत्तम चहा कोणता? तर.... चहाची टपरी काढल्या दिवसापासून, म्हणजे ज्या फडक्याने पहिला चहा गाळून चहा टपरी चे उत्तघाटण झालेल असेल, त्याच फडक्याने अनेक वर्ष सतत्याने चहा गाळलेला चहा म्हणजे उत्तम चहा. वर्षानू वर्षे ची अविट गोडी असते त्यात. प्यायला आहात का कधी असा चहा. प्यायला असाल तर त्याची गोडी तुम्हाला सांगायला नको. आणि नसाल तर हा लेख वाचून लगेज मागवा बघू बाजूच्या टपरी मधुन चहा... म्हणजे मग चहा चे घोट घेत घेत उरलेले सगळे ब्लोग वाचता येतील, कस.....................