Thursday, November 11, 2010

रुढी आणि परंपरा

असंख्य रुढी आणि परंपरा असलेला आपला हिंदू धर्म. लहान पणापसून आपल्यावर कळत नकळत त्या रुढी आणि परंपरां चे संस्कार होत असतात. काही परंपरेचें मला जितके कौतुक वाटते तितकेच अप्रुप पण वाटते.

अहनाच्या महिन्यांच्या वाढदिवसांना आई तिला ओवाळते व तिच्या डोक्यावर कापुस व दुर्वा ठेवत म्हणते, "कापुसा सारखी तू म्हातारी हो व दुर्वांसारखा तुझा वंश वाढुदे". आपल्या धर्मात जेवढा सखोल व सुक्ष्म विचार केला आहे, तसा विचार अजून कोणत्याही धर्मात केलेला नाही. कापुस कितीही झुना झाला तरी तो खराब होत नाही किंवा तो म्हातारा होत नाही. कितीही झुना झाला तरी कापसाचा उपयोग होतो, तो कधीही टाकाऊ व निरुपयोगी होत नाही, तशीच तू सुद्दा कापसा सारखी म्हातारी हो आणि तुझा जगाला कायम फायदा होऊदे. तातप~य तू सुद्दा चिरतरूण रहा. एका दुर्वा पसून अनेक दुर्वांचा जन्म होतो, तसाच तुझा वंश सतत वाढुदे. किती छान कल्पना आहे नाही. आणि त्यामागे किती अभ्यास आहे.

एक काळी टिट आपल वाईट नजरेपासून सौरक्षण करत असते. काही लोक ह्याचा अतिरेक करतात तो भाग वेगळा. ते लोक बाळाला एवढी टिट लावतात की ते बाळ अगदी कुरूप दिसायला लागत. मग त्याला नजर लागेलच कशी? मी काही वर्षापूर्वी ह्या टिट लावण्याच्या पद्दतिला हसत असे. त्याला मुर्खिपणा म्हणत असे. पण मावशी झाल्यापसून मी बदलले आहे. आपल्या गोंडुस बाळाला कुणाकुणाची नजर लागू नये असे वाटत असते. मी अहनाला आता टिटि लावल्याखेरीज कोठेही घेऊन जात नाही. आणि का कुणास ठाऊक, अहना सुद्दा टिट लावली असली की शांत असते व कधी टिट लावावयास विसरलो की ती हमखास घारी येऊन रडा रड करते. मग आई तिची द्रुष्ट काढते.

"द्रुष्ट - मिष्ट पापी चांडाळाची, भुता-केतांची, आल्या-गेल्याची, घरातल्या माणसाची - दारातल्या माणसांची -
बाहेरच्या माणसाची, पशु - पक्ष्यांची, झाडा - झुडप्यांची, किड्या - मुंग्यांची, द्रुश्य- अद्रुश्य शक्तिंची द्रुष्ट, जशी श्री कृष्णाची निघाली तशी आमच्या अहनाची निघुन जाउदे. ह्यात आपण आपल्या आजुबाजूला असलेल्या सगळ्या जीव-निर्जीव वस्तुंपासून आपल्या बाळाचे संरक्षण करत असतो. किती सुंदर कल्पना आहे नाही!
द्रुष्ट वाईटच असते अस नाही. खूप मनापसून, प्रेमाने केलेल्या तारीफेमुळे सुद्दा द्रुष्ट लागते. अता modern thinking प्रमाणे विचार केला तर आपण म्हणतो की आपण नेहमी positive vibes spread करावे. अता मला सांगा positive thinking किंवा positive vibes मिळाल्यामुळे आपल्या aura मधे बदल होतो व आपल्याला एक वेगळी प्रकारची energy मिळते हे आपण मानतो. मग आता त्या द्रुष्टीने द्रुष्ट काढण्याच्या पद्दतिकडे पहा. आपण directly, indirectly positive energy spread करत असतो. आपण एकाप्रकारे त्या बाळाल protection कवच घालत असतो. त्याच्या aura ला सगळ्यापासून रक्षण करत असतो, अस नाही का वातट.

आपल्या हिंदू संस्क्रुतित आपण लक्षीची जशी पूजा करतो तशी आपण झाडुची पण लक्षी समजून पुजा करतो. त्या मागचा हेतु हा की, लक्षी घरात आली की संम्रुद्धी जशी येते, तसच झाडू आपल्या घराची सफाई करुन घरा स्वच्छता ठेवते. म्हणुन आपण तीची लक्षी समजून पूजा करतो. शेवटी घर स्वच्छ असल्याखेरीज लक्षी त्या घरात नांदेलच कशी. लक्षीला पण प्रसन्न वातावरण आवडत अस माझी आई मला नेहमी सांगत असते. त्यामुळे घराची स्वच्छता करून घर निरोगी ठेवणा~या झाडूला सुद्दा आपल्या धर्मात स्थान आहे.

हिंदू, गो मातेची आई समजून पूजा करतात. जगात सगळ्यांना त्याच अप्रुप वाटत. मला एकदा एका जपानी माणसाने हसतच विचारले, "तुम्ही गाईला देव / आई का मानता?" आता त्याला पटेल अस आणि आपल्या हिंदू धर्माचे महत्व समजावून देणारे उत्तर देणे आवश्यक होते. मी त्याला म्हणाले, "लहान असताना आपण आईचे दुध पितो. तसेच मग मोठ झाल्यावर आईच्या दुधाला पर्याय म्हणुन आपण गाईच दुध पितो, म्हणुन आम्ही गाईला आई समजून तिची पूजा करतो." त्याला पण हे उत्तर पटल पण मग त्याचा पुढचा प्रश्न, "गाय म्हातारी झाली की ती दुध देत नाही. मग तिचा फारसा उपयोग पण होत नाही. मग गाय म्हातारी झाली की तिला तुम्ही मारुन खात का नाहीत"? बापरे, काय हा क्रुर विचार. मग मी त्याला विचारल, "तू आजून तुझ्या आईचे दुध पितोस का?" त्याला काही समजले नाही पण मग हसुन म्हणाला, "छे! आता मोठा झ्याल्यावर आईच दुध कोण पित का?" मग मी त्याला विचारल, "मग तरी तू तुझ्या आईला मारून खाल्ल नाहीस आहेस न? तसच आम्ही गाईला आई मानतो. मग तिने आपल्याला दुध देणे बंद केले तरी आम्ही तिला कस बर मारू. ती आई आहे आणि त्यामुळे कायम पुजनियच असेल". तो जपानी चपापलाच पण त्याला खरच आपल्या संस्क्रुतिची कमाल वाटली. तस त्याची पण चुक नाही. जपान हा कृषी प्रधान देश नाही. काही पिकत नसल्यामुळे सगळ्या प्राण्यांना देवाने आपल अन्न म्हणुनच ह्या प्रुथ्वी वर पाठवल आहे अशी समजूत तेथे आहे. आणि म्हणुन भारतात खूप लोक शाकाहारी आहेत व प्राण्यांची पुजा करतात ते त्यांच्या पचनीच पडत नाही.

दर दस~याला आम्ही निसर्ग प्रेमी मुंब्राला जातो आणि तिथे डोंगराची पुजा करतो. पाऊस असल्यामुळे आमच 'rock climbing' काही महीने बंद असत. मग आम्ही दस~याला त्या डोंगराची पुजा करतो व त्याला सांगतो की आता आम्ही तुझ्यावर परत चढाई करु, तर तू आमची काळजी घे! किती छान वाटत म्हणुन सांगू! आपण सकाळी ’कराग्रे वसते लक्षी करमद्दे सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनं॥ समुन्द्र वसते देवी पर्व स्तन मंडिते! विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पद स्पर्श क्षमस्व में॥" अस म्हणुन आपण पायाचा स्पर्श केल्याबद्दल / पाय लावल्या बद्दल आपल्या प्रुथ्वी मातेची माफी मागतो. तसच आम्ही डोंगराची पुजा करून त्याची आधी माफी मागतो आणि मग पुढच्या चढाई साठी त्याचे आशिर्वाद पण घेतो.

काही लोक ह्याला निव्वळ अंधश्रद्दा म्हणतील. पण विचार करता, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचे आपल्या आयुष्यातील महत्व आपल्याला ह्यातून समजते व त्यासाठी आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करतो. अश्या आणि अश्या प्रकारच्या आनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या रुढी आणि परंपरा मधे असल्याचा मला अभिमान आहे!

3 comments:

manali said...

Nice blog... :)

Mandar Chandrachud said...

changala lihila ahes

Girish Vaishampayan said...

Masta lihila ahes.. Me maza frds madhe share karto ha blog