Friday, September 26, 2008

लग्न, ज्योतिषी आणि मी。。。

अडचणीत माणसाला देव आठवतो म्हणतात. मी म्हणते, कलियुगातल्या माणसाला अडचणीत ज्योतिषी आठवतो. कलियुगात माणसाला देव भेटेल हे दुर्लभच. मी सुद्धा ह्या न त्या कारणांसाठी ज्योतिष्याकडे कडे गेले अहे. माझा जन्म २९ डिसेंबर १९८१ ला पहाटे १.१४ मि. ला - मुलुंड - मुंबईला झाला. [ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणा~यांनी खुशाल माझी पत्रिका मांडावी आणि माझे फुकट भविष्य सांगावे. ] आता पर्यंत अनेक ज्योतिश्यांनी माझी पत्रिका मांडली आहे. पत्रिकेप्रमाणे माझे दर सहा महिन्याने चांगले दिवस येतात. प्रत्येक्षात मात्र 'त्या' सहा महिन्यांची वाट मी अद्याप पहात आहे. वेळेप्रमाणे मांडलेल्या गणितात माझे ग्रह उच्च स्थानी असतात किंवा सहा महिन्यानी ते उच्चीचे होणार असतात. प्रत्येक्षात तसे घडत नाही आणि मग सुरू होते पुढल्या सहा महिन्यांची प्रतिक्षा. मला तर वाटतं माझी जन्माची वेळच त्या डॉक्टर ने चुकीची नोंदवली आहे. सगळे ग्रह मजबूत व उच्चीचे असताना घोडं अड़ते कुठे हेच समजत नाही.

मुलीच्या लग्नाची काळजी सगळ्याच आई - वडीलांना असते तशी माझ्या आई बाबांना पण आहे. अपल्या मुलीला योग्य असा जोडीदार मिळेल का? [आजकालच्या नवीन अमेरिकन फॅड प्रमाणे मुलगी जावईच शोधेल ना? अस पण काही आई वडिल या ज्योतिष्याकडे तसल्ली करून घेत असावेत. नाहितर ही आमच्या मुलिची बायको, अथवा हा आमच्या मुलाचा नवरा अशी ओळख करून देण्याची वेळ येईल ह्याची धास्ती. तो काळ अता भारतात दूर नाही म्हणा!!.] असो... तर मी पण माझे ग्रह सध्या कोणत्या घरात वास्तव्याला अहेत हे विचारायला जोतिष्याकडे गेले. मी ज्या घरात जन्मले त्याच घरात अद्याप राहते आहे. पण माझ्या ह्या ग्रहानी आता पर्यंत अनेक घर बदलली आहेत. बर घर बदलून तेथे वास्तुशांत नको का करायला? दोन चार संस्कृत श्लोक म्हटले की घरात शांतता नांदते. [घरात म्हणजे घरातल्या माणसात असे समजू नये.] माझे ग्रह घर बदलून वास्तुशांत करत नसावेत, म्हणून मग ते घर मला त्रास द्यायला लागत.

。"तुमच्या मुलीचं लग्नानंतर भाग्य उजळणार आहे" अस एकाकडून समजले. माझ्या नव~याच्या ग्रहांच्या मांडणी नुसार लग्नानंतर हाल अपेष्टा असाव्यात, तरिच तो आजून मला भेटलेला नाही.

。"तुझा नवरा पायलट असेल" अस एका पठ्ठ्याने मला सांगितले. त्या दिवसा पसून मी अनेक वर्षे विमानाकडे डोळे लाऊन बसले होते. नंतर त्याच ज्योतिष्याने काही वर्षांनी मला software engineer नवरा मिळेल असे सांगितले. माझ Plane अश्या प्रकारे office मधे Land झाले. लग्नाला उभ्या असलेल्या मुलींच्या भावनांशी असे खेळू नये :-(

。 एका जोतिषाने तर सांगीतले, "ह्या मुलिशी जो लग्न करेल तो मुलगा खूप भग्यवान असेल म्हणे". थापड्या जोतिषी नुसता. माला तर स्वता:लाच स्वताच्या नव~याची दया येते. माझी अखंड बडबड सहन करायला लागणार आहे त्याला. आणि तो भाग्यवान?

。 Arrange marriage चांगले का Love marriage हा सगळ्यांना पडणारा प्रश्न. मला कशाचाच तिरस्कार नाही. Arrange किंवा Love किंवा Marriage ह्या सगळ्यांच्या बाबतीत मी समतोल विचारांची आहे. पण तो arrange marriage मधला "मुलगी बघण" हा प्रकार काही मला झेपलेला नाही आणि जमणार पण नाही. अम्हाला पत्रिका बघायची नाही - आमचा ह्यावर विश्वास नाही, असे ठासून सांगणारे पुढे म्हणतात, "पण मुलीला मंगळ तेवढ नको" हा अर्धवट पणा. मुलीचा संपूर्ण फोटो पाठवा - कशाला ? माझे पायगुण बघायला? काय हा पोरकट पणा. [अश्या लोकांना प्रतिका पाठवायची नाही... अस मी आईला सांगितले. त्यावर आईने मला ४ (४०००) समजूतिच्या गोष्टी सांगितल्या.]

。ह्याला कंटाळून मी एका जोतिष्याला सरळ विचारले,"माझ love marriage होईल का? योग आहे का?" त्यावर त्यांनी "तुझा love marriage चा योग निघून गेला" अस सांगितल. निघून गेला? असा कसा निघून गेला योग? बर मग योग जेव्हा केव्हा होता तेव्हा ३-४ नाही तरी एखाद्या तरी मुलाने मागणी नको का घालायला? मला योग आलेला कळायच्या आतच तो योग शेजारच्या घरात निघून गेला :-(

माझ तर ह्या ज्योतिष्यांना एक सांगण आहे - काही ज्योतोषी सांगतात... पूर्वेला किंवा उत्तरेला किंवा अग्नेयला जा अस सांगण्यापेक्षा सरळ पत्ता का नाही देत? सरळ मला पत्ताच सांगा न!

लग्न, ज्योतिषी आणि मी。。。यांचे ग्रह आजून जुळलेले नाहीत.

21 comments:

manji said...

aavadala!!! aevadhi chid chid karu naye ga! :)

prachi said...

good one.....

Unknown said...

It shows a real frustration......

Shuddha marathit satvik santap....

Sharvani Khare - Pethe said...
This comment has been removed by the author.
Ravi Datar said...

ugee ugee ... Sabr ka phal meetha hota hai ... hoil hoil ... graha aley linevar ki hoil sagla theek ..

Manasvee said...

Hey Nice to read all your blogs, I had no idea that u can write such nice Marathi :) and the latest one is hunmerous one.... but honestly, kahi thikani thode frustration jaste pramanat disate

prachi said...

forget abt forty i hve come across a person who has seen 150 girls & patrika & still not found a suitable gal for him....

Sharvani Khare - Pethe said...

Thanks all...

Thodasa frustration nakki ahe... pan tyahun jasta santap ahe... Lagnala ubha aslya pasun - Mulakadchi baju mhanje kay he samajta.

Anonymous said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर

imsaurabh said...

good one.........

aga jara dhir dhar..........
tuzya navaryache grah ajun changalae astil..

tyachi sadesathi(ayushya bharachi) kinva sharvani nakshtra pravesh ajun ala nasel..........

so thamb tithaparyanth, n apart from kidin mi mandato tuzi patrika........

Anonymous said...

lol, dhondopantani vachla ka post?

Sharvani Khare - Pethe said...

No Idea Mr. Anonymous!

Unknown said...

Good one!

Vishal K said...

हा हा.. मस्तच!
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Anonymous said...

Great
it's True............

Anonymous said...

i like ur style.i read ur all blogs.n i m really very impress.tu ek chhan friend hou shaktes

Aditi said...

very nice, and funny...

Swati said...

athishay chan lihila aahe! you should start writing in newspaper now....

हेरंब said...

एकदम मस्तच झालंय लेख.

Anonymous said...

hello

tuza jyotishyanvaracha rag samajala,any way he bagh me suddha ek jyotishi aahe me sangato to upay karashil ka,pl kar ha bagh aarthat tuzya buddhila patala tar---- dararaoj anghol karatana angholichya panyat ek chamacha bhar halad takun anghol kar---kamit kami mahina bhar, karun tari bagh

Pradnya said...

mastach ahe lekh..... pratyek mulichi goshta pratit karnara...keep writing :)