Tuesday, March 18, 2008

रायगड रौप्यमहोत्सव

रायगड रौप्यमहोत्सव
१ फेब्रुवारी २००८ - ३ फेब्रुवारी २००८


「चक्रम हायकर्स」 चा रौप्यमहोत्स्वी सांगता सोहळा समस्त दुर्गप्रेमींच्या रायगडावर पार पडला. एकुण १३० चक्रम लोकांनी रायगड सर केला. पण सर केला तो मात्र ५ वेगवेगळ्या मार्गानी. चित्त दरवाजा, रायगड प्रदक्षिणा करून चित दरवाजातून वर आले [ह्या सोप्या वाटा], भवानी टोक, होरकणी बुरुज आणि वाघ दरवाजा [ह्या अवघड वाटा]. मी हिरकणी वाटेने गेले. मोठी वयस्कर मंडळी आणि लहान १ ते ४ वर्षाची मुल व त्यांचे पालक मंडळी Rope way नी गडावर गेली. हा ट्रेक केवळ चक्रम लोकांन करीताच होता. चक्रम चे members आणि चक्रम बरोबर खूप ट्रेक केलेली मंडळी.
चक्रंम मधे अनेक चांगले ट्रेकर्स - climbers आहेत. आणि त्यांच्या जोडीला आहेत सर्वाचे लाडके "आपटे काका". गड बघायला जयच तर आपटे काकांबरोबरच. ते स्वता: उत्तम ट्रेकर असून त्यांचा गड, दुर्ग, लेण्या ईत्यांदीवर प्रचंड आभ्यास आहे. वय वर्ष ५५, पण आपल्याला लाज वाटावी एवढा stabina. आम्हि गमतीने नेहमी म्हणतो, आपटे काका बहूतेक लहानपणापसून च्यवनप्राश खात असणार. महाराजांबद्दल बोलताना, त्यांचा ईतीहास सांगताना ते अगदी तल्लीन होऊन जातात आणि ऎकणारा श्रोतागण रमुन जातो. गड, दुर्ग नुसता बघताना जेवढा भकास वाटतो तेवढाच त्या ठिकाणी ऊभ राहून गडाचा ईतीहास, गडाची माहीती, गड विशीष्ट पद्दतीत बांधण्या मागच कारण हे एकताना खरच तो गड जीवंत होऊन आपल्याशी संवाद साधतो. ह्यावेळी सुद्दा काकांच्या मुळे रयगडाला जाग आली. राज्यांच्या दरबारात उभ राहून इतीहास ऎकण्यात सगळे भान हारपले आणि एकच जल्लोश झाला, महाराजांना सलामी देण्यात आली, " गोब्राह्मण प्रतिपालक, प्रौढ प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय"

रायगड मोहीम अगदी ठाताची होती. सगळे वेगवेगळ्या मार्गा वरुन रायगड सर करुन आले आणि मग काय विचारता, १३० चक्रम एकत्र आल्यावर चक्रम पणा, जल्लोश आलाच. रात्री काही चक्रम ग्रुप चे जेष्ठ आणि श्रेष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. आमच्यातल्या काही जणानी नंतर पोवाडे म्हणून, गोंधळ घालून, न्रुत्य करून एक जल्लोश केला. बाजा, पेटी, ढोलकी ची साथ आर्थातच होती.


रायगडाची मोहीमेला अप्रतिम!!! हा एकच शब्द...


काकांनी सांगीतलेली गडाची थोडक्यात माहिती व गडाचे वैशिष्ठ:

१. राणी वसा - पारंपारीत समजूत - रायगडावर सहा महाल आपल्याला दिसतात, त्याला राणीवसा म्हणतात. महाराजांना जरी आठ राण्या असल्या तरी, रायगडाच्या रचने वेळी सईबाईंचा म्रुत्यू झाला होता व चारच राण्या त्यावेळी गडावर होत्या. चार राणीवसा एकमेकांना आतून जोडले आहेत. आत दोन झोत आपल्याला दिसतात - एक बैठकिची जागा आणि ह्या चित्रात जो चवथरा दिसतो आहे, तेथे सुंदर वाडा व आत राणीच्या सोइसाठीच्या सगळ्या वस्तू असाव्यात असा आंदाज आहे. Photo मधे जे पलीकडे तोन दरवाजे दिसत आहेत ते आहेत त्या काळातली सैचालय / Toilets. टोपली संडास सारख बांधकाम आपल्याला येथे बघावयास मिळते. त्या काळात कशी सोय होती सांगण कठीण आहे. त्याकाळात १८ कारखाने व १२ महाल ही सांकल्पना होती. त्यापेकी हे ६ महाल असण्याची शक्यता आहे.
Controversy: त्यात समजा हे सहा महाल राणीवसा असतिल तर मग त्यात स्नानग्रुह हे असलच पाहीजे, जे आपणांस येथे आढळत नाही. त्यामुळे हा राणीवसाच आहे का राजांच्या प्रधानांचे व इतर कसले वाडे अहेत ह्यावर मतभेद आहेत.

२. कैद खाना / धान्यकोठार - राणीवसा च्या समोर एक मोठ तळघर आहे. २०-२५ फ़ुट खोल अस हे तळघर खूप प्रसस्त आहे. काही तद्यांच्या प्रमाणे ते कैद खाना आहे. पण परत प्रक्ष्न तोच मनात येतो, राणीवसाच्या एवढया जवळ कैद खाना कसा? काही तद्यांच्या मते, ती जागा धान्या कोठार असावा. पण मग त्या जागेची रचना पावसाच्या द्रुष्टीने योग्य वाटत नाही.

३. अष्ट प्रधान वाडा - राणीवसेच्या समोर पण थोडस खालच्या बाजूला अष्ट प्रधानांचे मोडक्या अवस्थेत असलेले आठ वाडे दिसतो. आता मोडकळीत आलेल्या ह्या वाड्यांना बघून त्याच्या विस्ताराचा आंदाज करता येतो. चित्रात दिसत असल्या प्रमाणे प्रतेक वाडा प्रशस्थ आहेत. महाराजांच्या सेवेत असलेल्या खास लोकाच्या साठी केलेले हे वाडे. त्या काळात मात्र ह्या वाड्यांची शान काही ओरच असेल नाही?

. राज सभा / सिंव्हासन - राजांचा राज्याभिशेक झाला ते सिंव्हासन रत्नजदीत सिंव्हासन होत. आता आपण बघतो ती मेघडंबरी. ह्या जागेच वैशिष्ट म्हणजे, एकूण ५००० माणस ह्या दरबारात मावतिल एवढी प्रचंड जागा आहे आणि कोणत्याही कोप~यातून किणीही कितीही हाळू आवाजात बोलल तरी ते महाराजां परीयंत पोहचत. महाराज आसनावरून जे काही सांगत असत, बोलत असत ते, समोर उभा असलेल्या ५००० - ६००० लोकांना सहज ऎकू येत असे, कोणतेही साधन न वापरता. जरा जरी त्या जागे पासून दूर गेलात तरी ते शक्य नाही. त्या काळात अश्या जागेची निवड करणे खरोखरच किती आवघड होत. ह्यावरून आपल्याला त्या काळातील विदवत्तची जाणीव होइल. ज्या दिवशी महाराझांचा राज्याभिशेक झाला तो दिवस पण तसा खासच. त्या दिवशी सु~याचे किरण सरळ सिंव्हासनावर पडतात.

महाराजांचा राज्याभिशेकाचे तीन महत्वाचे पैलू

राज्याभिशेक - खरा राज्याभिशेक एका शाळेत झाला. त्यानंतर महाराज सिंव्हासनाधीश झाले व आलेल्या मंडळींची त्यांनी भेट घेतली. आणि नंतर देवदर्शन.

५. शिळा - महाराजांच्या म्रुत्यूची बातमी गडा बाहेर न जाण्याची दक्षता घेण्यात आली होती. महाराज गेले त्या दिवशी त्यांची द्वितीय पत्नी पुतळाबाई ह्या पाशाड्ला होत्या. १८ जून ला जेव्हा संभाजी राजे गडावर आले तेव्हा पुतळाबाईनी सती जाण्याची परवानगी त्यांच्याकडून घेतली. त्यांच्या स्मरणार्थी रायगडावर त्यांची सतिशिळा बांधली आहे. आज मात्र त्या सैभग्यावतीला शिरकाई मंदिरा मागे ठेवण्यात आले आहे.

. बाजारपेठ - राजगडावर प्रचंड वसाहत रहात असे. त्यामुळे बाजारपेठ बांधन्यात आली आहे. प्रचंड मोठी आशी ही बाजारपेठ आहे. पूर्वीच्या काळी मावळे घोड्यावरून बाराला जात असवी, कारण बाजारपेठेची उंची लक्षात घेता, पाई चालणा~या लोकांना वस्तू दिसण शक्या नाही.

Controversy: गडावर एअवढी मोठी बाजारपेठ असण शक्य नाही असे काही लोकांचे मात आहे. महाराजांना लोक गडावर भेटायला येत असत. ही त्यांच्या रण्यासाठी बांधलेली नगरपेठ आहे असाही एक समज आहे.

७. अष्ट कोनी स्तंभ / Balcony : फ़ोटोत दिसत असल्या प्रमाणे अत्यांत कलाकुसरीचे असे हे स्तंभ आहेत. महाराज्यांच्या काळात ते पाच मजली असल्याचा आंदाज आहे. येथे बसून राण्या बाजारपेठ व मैदानात चाललेले खेळ बघत असे. स्तंभात आपल्याला प्रतेक भिंतीवर वरच्या बाजूला छिद्र दिरतात. तेथुन पूर्वीच्या काळी ठंड पाणि वहात असे. त्याच्या खली तेलाचा दिवा ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. त्या दिव्याचा प्रकाश पाण्यात पडून सुंदिर प्रकाश पडत असे. खिडक्यांना सुंदर वाळ्याचे व मखमलाचे परफ़े लावलेले आसायचे. आज ह्या पाच मजल्यांपेकी १-२ मजले मोडक्या अवस्थेत अपल्याला बघायला मिळतात.

८. ह्या व्यतिरीक्त महा दरवाजा, चोर दरवाजा असे अनेक ठिकण आपल्याला बघायला मिळतात.

प्रतेक माणसाने रायगड आयुष्यात एकदा तरीक रावाच. ज्यांना ट्रेकिंग करण शक्य नाही त्यांच्या साठी Rope-way ची सोय आहेच.


3 comments:

मोरपीस said...

खरच अप्रतिम!

HAREKRISHNAJI said...

मला जे म्हणायचे होते त अगोदरच मोरपिस नी लिहीले आहे.
मी अगदी सुरवातीला म्हणजे १९७८ साली रायगड प्रदक्षणेस सोमनाथ समेळ,तुकाराम जाधव वगैरे बरोबर गेलो होतो.

Sharvu [Amala] said...

Thanks all...