Wednesday, May 28, 2008

मीच का ?

अनेकदा आपल्या सगळ्यांना पडणारा हा प्रश्न - मीच का? तुम्हाला पण हा प्रश्न अनेकदा पडला असणारच. मी काही तुमच्याहून वेगळी नाही. त्यात माझी "मकर रास" असल्या कारणामुळे अनेकदा असे मीच का? हा प्रश्न पडणारे प्रसंग घडतच असतात. तोंडाशी आलेला घास समोरसा घेउन जातो आणि मग असहाय पणे आपण विचार करतो, मीच का? कधी हस्यास्पद, कधी Embarrassing Moments तर कधी Frustrating, Depressing moments मधे - नेहमी मीच कशी ह्या बाबतीत अडकते, मीच का? असा प्रश्न पडतोच. पण त्याचे उत्तर ब्रह्मदेवालाच ठाउक. इतर सगळ्यांच आयुष्य मस्त असताना, आपणच कसे नेहमी अडकतो? पण आपण देखिल समोरच्यांसाठी इतर असतो हे आपण विसरतो.

Blog लिहीण्याचे कारण म्हणजे करमणूक. म्हणून आपण frustrating, depressing moments बद्दल न बोलता. काही मजेशीर विनोदी घटणाच बघुयत.

मुलुंडच्या platform क्रमांक १ वर मी train ची वाट पहात उभी होते. तेवढ्यात announcement झाली,"Platform क्रमांक १ पर आने आली अगामी लोकल आज platform क्रमांक १ के बजाय platform क्रमांक ३ से रवाना होगी". मग काय... धावा... धावत धावत bridge चढायला लागले. माझ्या बरोबर १ मछली ची टोपली घेऊन १ भैया पण धावायला लागला. धावता धावता तो अडखळला आणि त्याच्या हातून मास्याची टोपली उलटी झाली. माझ्या आंगावर मछलीचं पाणी पडलं. माझ्या बाजूने चालत असलेल्या बाईच्या आंगावर तर काही मासे सुद्दा पडले. ती बाई एवढ्याने ओरडली [जैन असेल्यास तिने किती दिवस त्याबद्दलचं प्रायश्चित्त म्हणून उपास तपास केले असतील तिच जाणे.] मी जाम हसत सुटले, सवई प्रमाणे. ती बाई मात्र जाम भडकली होती, ती त्याला ओरडत होती," ये क्या किया? अब मै office कैसे जाउंगी?" तो भैया पण जरा घाबरला होत पण माला हसताना बघून त्याला धिर आला असावा. "आप train मे चढेगी तो पूरी train खाली हो जाएगी." अस म्हणून तो पण खो खॊ हसत सुटला. तस पण त्याच्यावर भडकण्यात काहीही अर्थ नव्हता. त्याने थोडी हे सगळ मुद्दाम केले होते. चालायचचं. घरी येउन २ तास आंघोळ केली. मी शाकाहारी असल्यामुळे स्वत:च्याच आंगाचा वास नकोसा झाला होता. "मीच का?" आज पण तो प्रसंग आठवला की हसू येते.

Office मधे एकदा असच झालं, मीच का? म्हणण्याचा प्रसंग आला. मी cabin मधे काम करत बसले होते एकटी. Colleague नी lunch साठी buzz केल. मी cabin बाहेर जायला निघले तर समजलं, cabin चा दरवाजा lock झाला आहे. एक चावीवाल्याला सगळी कुलुप तपासायला बोलावले होते. त्याने नेमक माझ्या cabin च lock तपासून बघताना ते lock करून तो चावी घेउन गेला. मी माझ्या कलीगला फोन लावला, तर मी miss call करते आहे अस समजून तिने तो २दा कट केला. मग एकदाचा तिने उचलला फोन. मी तिला जेव्हा सांगीतले की मैं आंदर फस गई हूँ तर ती हसायलाच लागली. वर मला म्हणते," रुक मैं आती हूँ तुझे देखने तू अंदर locked कैसी लगती है, रुकना". रुकना? त्या पलीतडे मी काय करु शकत होते? मी अडकली आहे ही news, office मधे वा~यासारखी पसरली. चावीवाल्याची शोधाशोध चालू झाली. त्या दरम्यान माला बघायला ५-६ जण आले. US च्या आमच्या office मधून Mike नवाचा एक ७फुट ६ इंच ऊंच माणूस आला होता. तो आणि मी अनेकदा एकमेकांच्या बाजूला उभं राहून एक्मेकांना complex देत असू. तो सुद्धा आला मला बघायला. जस काही मी पिंज~यातला प्राणी आहे. Mike मला म्हण्तो कसा," You are looking like a rabit in a huge lion's cage". पिंज~यात्ल्या प्राण्यासारखी मी असाहाय दिसत होते.

मीच का??????????

Wednesday, March 19, 2008

तोरणा - प्रचंडगड

तोरणा - प्रचंडगड (७ र्माच - ९ र्माच २००८ )

तोरणा - Much Awaiting Trek
१६४६ साली वयाच्या १६व्या वर्षी महाराजांनी तोरणा गड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. असा समज आहे, की त्यामुळेच त्याचे नाव तोरणा पडले. पण खर तर ह्या गडावर तोरण नावाची पुष्कळ झाड असल्या कारणाने त्याच नाव तोरणा पडल आहे. महाराजांनी त्या गडाचा प्रचंड विस्तार पाहून त्याचे नाव 「प्रचंडगड」 ठेवले.

तोरणा काही न काही कारणाने माझा नेहमी रहात होत. तो ह्या खेपेला पूर्ण झाला. जाम मजा केली. एक ९ वर्षाची चिमुर्डी केतकी आमच्या बरोबर होती. केतकी वय वर्ष ९ आणि आपटे काका वय वर्ष ५५, सगळ्यांना लाजवतील असे चढत होते. केतकी माझ्या बरोबर कधी चालायला लागली माहित नाही, पण मग चढताना आणि उतरताना ती मझ्या बरोबरच होती. "चल आपण सगळ्यांच्या पुढे जाऊया, ह्या दादाच्या पुढे जाऊन मग थांबुया हे असले प्रोत्साहन कारक वाक्य नंतर मालाच भारी पडले. ती चिमुर्डी थांबायलाच तयार नाही.

तोरणा तसा सोपा असला तरी त्याचा प्रचंड विस्तार आहे.

सुरवातीलाच कडा चढाईने ह्या गडाची सुरवात होते. मार्च महीन्यात सर्वत्र चुक रान पसरल्यामूळे हिळवळ तशी नाहीच. धकून भागून आम्ही वर पोहोचलो. ह्या सगळ्यात भर म्हणून की काय तोरण्या ला वर्ती जे मंदिर आहे, त्याचे काम चालू होते, त्यामुळे सर्वत्र सिमेंटच सिमेंट होते. सगळ्यांनी बाहेर वरांड्यात सोपण्याचा विचार आला. आम्हा मुलिंना मात्र त्या सिमेंट मधे आमच्या Sleeping bags टाकून झोपावे लागले. मुलिंनी बाहेर नको, रात्री खूप थंडी पडते, Safety च्या द्रुष्टीने ते बरोबर नाही... असे अनेक सल्ले मिळाले. असो....

Difficulties always come from all side अस म्हणतात ते काही खोट नाही. काही कारणामुळे, काही चुकिच्या calculations मुळे ७-८ जणांना पुरेल एवढेच जेवण आमच्या कडे होते, आणि आम्ही होतो आंदाजे २०-२२ जण. आपटे काका, पाटकर काका, केदार आणि त्यांची मुलगी केतकी ह्यांना पहीले जेवायला दिल. नशीबाने काही मंडळी रात्री गड सढून येणार होते. त्यांना ताबडतोप phone लावण्याचे प्रयंत्न झाले. एकदाचा तो लागला, नशिबाने ते hotel मधे dinner घेत होते. लगेच parcle आणयला सांगीतले. ३घा जणांच्या Instant food मधे आम्ही पाच मुली जेवलो. आम्हाला ते पुरल हे सांगायला नको. मुलगी असल्याचे अनेक फायदे असतात त्यातला हा एक. रात्री चढून येणा~या मंडळींना येयला बराच वेळ लागणार होता. पोटात तर सगळ्या मुलांच्या आग पडली होती. शेवटी पप्पूने एक नविन dish चा शोध लावला "पापड कोशिंबीर". आमच्याकडे बरेच पापड होते व काही tamatoes, onions, फरसाण असे काही सामान होते. मग काय, झाली कोशिंबीर तयार. पाव-भाजी ज्या चविने खावी तशी ती कोशिंबीर मुलांनी खाल्ली, बिच्चारे :( नंतर आजून एका dish चा शोध लागला. सकाळच्या Pack-lunch मधे काही जणांनी "रावण पिठले आर्थात श्रिखंड" आणल होत. मग Apple श्रिखंड dish चा शोध लागला. माला तो प्रकार बघूनच कसतरी झाल. "अग खाउन बघ... कसली मस्त teast आहे" अस म्हणत बल्लुने माला एक फोड श्रिखंड लाउन खायला दिली. खर संगायच तर काहीही चव नव्हती त्याला. "हू! पोट भरल्या चा परीणाम, म्हणून तुला त्याची चव लागत नाही... कदर नाही" इती बल्लू. खरच भुकेला कोंडा आणि निजायला ढोंडा.

रात्री साधारण १.०० ला बाकीची मंडळी वर पोहोचली. मग सगळे ताव मारत बिर्याणी जेवले. तो परीयंत आम्ही मुली झोपी लेलो होतो, गाड. ट्रेक म्हंटल की अश्या छोट्या गोष्टी घडायच्याच. चालायच........

पाहाटे कोणाच्या तरी घोरण्याने माला जाग आली. आपटे काका सवई प्रमाणे आधिच उठून चहाच्या तयारीला लागले होते. काका ५मि. नंतर उठते अस म्हणून माझा जर डुलकी काढण्याचा विचार होता. पण घोरण्याचा आवाज मंदिरात घुमत होता. सगळयांचीच झोपमोड होत होती. आपटे काका हुशार, त्यांनी चालताना हळूच वाकून त्या घोरणा~या माणसाला हातानी हलवल्या सारख करुन नमस्कार केला. तो माणूस दचकून जागा झाला,"काय, कोण?" काकांनी तेवढयाच शांतपणे उत्तर दिल," Sorry! पाय लागला होता". आम्ही ओठ दाबून हसत होतो.

आजून एक आठवण म्हणजे - मी आणि बल्लू रात्री ९.३० ला पाणि काढायला म्हणून तळ्यावर गेलो. पोटात भितीचा गोळा होताच. बल्लू पाणि काढत असताना मी Torch दाखवत उभी होते. पाणि भरून आम्ही वळालो आणि माझीच एवढी मोठ्ठी सवली पडलेली बघून मी घाबरले. केस विखूरलेले, त्यात ते curley आणि मी केवढी - माझी सावली केवढी.... आधीच तो तोरणा गड, भिती असतेच. भकास आणि खूपसा Haunted वाटणारा गड आहे हा. पाणि घेउन आम्ही निघालो. मी आजू-बाजूला कोण आहे का बघायला म्हणून torch फिरवत होते आणि प्रकाश अचानक एका water pump वर पडला. मी आणि बल्लू दोघेही घाबरलो. १मि समजलच नाही काय आहे ते. समजून पण फार काही भिती गेली नाही. बल्लू माला म्हणाला," शर्वाणी चल आता पटापट" आणि आम्ही सुटलो ते थेट मंदिरात येउन थांबलो.

जाम धमाल आली... प्रतेक ट्रेक चा आठवणी आणि अनूभव वेगळे.

Tuesday, March 18, 2008

रायगड रौप्यमहोत्सव

रायगड रौप्यमहोत्सव
१ फेब्रुवारी २००८ - ३ फेब्रुवारी २००८


「चक्रम हायकर्स」 चा रौप्यमहोत्स्वी सांगता सोहळा समस्त दुर्गप्रेमींच्या रायगडावर पार पडला. एकुण १३० चक्रम लोकांनी रायगड सर केला. पण सर केला तो मात्र ५ वेगवेगळ्या मार्गानी. चित्त दरवाजा, रायगड प्रदक्षिणा करून चित दरवाजातून वर आले [ह्या सोप्या वाटा], भवानी टोक, होरकणी बुरुज आणि वाघ दरवाजा [ह्या अवघड वाटा]. मी हिरकणी वाटेने गेले. मोठी वयस्कर मंडळी आणि लहान १ ते ४ वर्षाची मुल व त्यांचे पालक मंडळी Rope way नी गडावर गेली. हा ट्रेक केवळ चक्रम लोकांन करीताच होता. चक्रम चे members आणि चक्रम बरोबर खूप ट्रेक केलेली मंडळी.
चक्रंम मधे अनेक चांगले ट्रेकर्स - climbers आहेत. आणि त्यांच्या जोडीला आहेत सर्वाचे लाडके "आपटे काका". गड बघायला जयच तर आपटे काकांबरोबरच. ते स्वता: उत्तम ट्रेकर असून त्यांचा गड, दुर्ग, लेण्या ईत्यांदीवर प्रचंड आभ्यास आहे. वय वर्ष ५५, पण आपल्याला लाज वाटावी एवढा stabina. आम्हि गमतीने नेहमी म्हणतो, आपटे काका बहूतेक लहानपणापसून च्यवनप्राश खात असणार. महाराजांबद्दल बोलताना, त्यांचा ईतीहास सांगताना ते अगदी तल्लीन होऊन जातात आणि ऎकणारा श्रोतागण रमुन जातो. गड, दुर्ग नुसता बघताना जेवढा भकास वाटतो तेवढाच त्या ठिकाणी ऊभ राहून गडाचा ईतीहास, गडाची माहीती, गड विशीष्ट पद्दतीत बांधण्या मागच कारण हे एकताना खरच तो गड जीवंत होऊन आपल्याशी संवाद साधतो. ह्यावेळी सुद्दा काकांच्या मुळे रयगडाला जाग आली. राज्यांच्या दरबारात उभ राहून इतीहास ऎकण्यात सगळे भान हारपले आणि एकच जल्लोश झाला, महाराजांना सलामी देण्यात आली, " गोब्राह्मण प्रतिपालक, प्रौढ प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय"

रायगड मोहीम अगदी ठाताची होती. सगळे वेगवेगळ्या मार्गा वरुन रायगड सर करुन आले आणि मग काय विचारता, १३० चक्रम एकत्र आल्यावर चक्रम पणा, जल्लोश आलाच. रात्री काही चक्रम ग्रुप चे जेष्ठ आणि श्रेष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. आमच्यातल्या काही जणानी नंतर पोवाडे म्हणून, गोंधळ घालून, न्रुत्य करून एक जल्लोश केला. बाजा, पेटी, ढोलकी ची साथ आर्थातच होती.


रायगडाची मोहीमेला 「 अप्रतिम!!! 」 हा एकच शब्द...


काकांनी सांगीतलेली गडाची थोडक्यात माहिती व गडाचे वैशिष्ठ:

१. राणी वसा - पारंपारीत समजूत - रायगडावर सहा महाल आपल्याला दिसतात, त्याला राणीवसा म्हणतात. महाराजांना जरी आठ राण्या असल्या तरी, रायगडाच्या रचने वेळी सईबाईंचा म्रुत्यू झाला होता व चारच राण्या त्यावेळी गडावर होत्या. चार राणीवसा एकमेकांना आतून जोडले आहेत. आत दोन झोत आपल्याला दिसतात - एक बैठकिची जागा आणि ह्या चित्रात जो चवथरा दिसतो आहे, तेथे सुंदर वाडा व आत राणीच्या सोइसाठीच्या सगळ्या वस्तू असाव्यात असा आंदाज आहे. Photo मधे जे पलीकडे तोन दरवाजे दिसत आहेत ते आहेत त्या काळातली सैचालय / Toilets. टोपली संडास सारख बांधकाम आपल्याला येथे बघावयास मिळते. त्या काळात कशी सोय होती सांगण कठीण आहे. त्याकाळात १८ कारखाने व १२ महाल ही सांकल्पना होती. त्यापेकी हे ६ महाल असण्याची शक्यता आहे.
Controversy: त्यात समजा हे सहा महाल राणीवसा असतिल तर मग त्यात स्नानग्रुह हे असलच पाहीजे, जे आपणांस येथे आढळत नाही. त्यामुळे हा राणीवसाच आहे का राजांच्या प्रधानांचे व इतर कसले वाडे अहेत ह्यावर मतभेद आहेत.

२. कैद खाना / धान्यकोठार - राणीवसा च्या समोर एक मोठ तळघर आहे. २०-२५ फ़ुट खोल अस हे तळघर खूप प्रसस्त आहे. काही तद्यांच्या प्रमाणे ते कैद खाना आहे. पण परत प्रक्ष्न तोच मनात येतो, राणीवसाच्या एवढया जवळ कैद खाना कसा? काही तद्यांच्या मते, ती जागा धान्या कोठार असावा. पण मग त्या जागेची रचना पावसाच्या द्रुष्टीने योग्य वाटत नाही.

३. अष्ट प्रधान वाडा - राणीवसेच्या समोर पण थोडस खालच्या बाजूला अष्ट प्रधानांचे मोडक्या अवस्थेत असलेले आठ वाडे दिसतो. आता मोडकळीत आलेल्या ह्या वाड्यांना बघून त्याच्या विस्ताराचा आंदाज करता येतो. चित्रात दिसत असल्या प्रमाणे प्रतेक वाडा प्रशस्थ आहेत. महाराजांच्या सेवेत असलेल्या खास लोकाच्या साठी केलेले हे वाडे. त्या काळात मात्र ह्या वाड्यांची शान काही ओरच असेल नाही?

४. राज सभा / सिंव्हासन - राजांचा राज्याभिशेक झाला ते सिंव्हासन रत्नजदीत सिंव्हासन होत. आता आपण बघतो ती मेघडंबरी. ह्या जागेच वैशिष्ट म्हणजे, एकूण ५००० माणस ह्या दरबारात मावतिल एवढी प्रचंड जागा आहे आणि कोणत्याही कोप~यातून किणीही कितीही हाळू आवाजात बोलल तरी ते महाराजां परीयंत पोहचत. महाराज आसनावरून जे काही सांगत असत, बोलत असत ते, समोर उभा असलेल्या ५००० - ६००० लोकांना सहज ऎकू येत असे, कोणतेही साधन न वापरता. जरा जरी त्या जागे पासून दूर गेलात तरी ते शक्य नाही. त्या काळात अश्या जागेची निवड करणे खरोखरच किती आवघड होत. ह्यावरून आपल्याला त्या काळातील विदवत्तची जाणीव होइल. ज्या दिवशी महाराझांचा राज्याभिशेक झाला तो दिवस पण तसा खासच. त्या दिवशी सु~याचे किरण सरळ सिंव्हासनावर पडतात.

महाराजांचा राज्याभिशेकाचे तीन महत्वाचे पैलू

राज्याभिशेक - खरा राज्याभिशेक एका शाळेत झाला. त्यानंतर महाराज सिंव्हासनाधीश झाले व आलेल्या मंडळींची त्यांनी भेट घेतली. आणि नंतर देवदर्शन.

५. शिळा - महाराजांच्या म्रुत्यूची बातमी गडा बाहेर न जाण्याची दक्षता घेण्यात आली होती. महाराज गेले त्या दिवशी त्यांची द्वितीय पत्नी पुतळाबाई ह्या पाशाड्ला होत्या. १८ जून ला जेव्हा संभाजी राजे गडावर आले तेव्हा पुतळाबाईनी सती जाण्याची परवानगी त्यांच्याकडून घेतली. त्यांच्या स्मरणार्थी रायगडावर त्यांची सतिशिळा बांधली आहे. आज मात्र त्या सैभग्यावतीला शिरकाई मंदिरा मागे ठेवण्यात आले आहे.

६. बाजारपेठ - राजगडावर प्रचंड वसाहत रहात असे. त्यामुळे बाजारपेठ बांधन्यात आली आहे. प्रचंड मोठी आशी ही बाजारपेठ आहे. पूर्वीच्या काळी मावळे घोड्यावरून बाराला जात असवी, कारण बाजारपेठेची उंची लक्षात घेता, पाई चालणा~या लोकांना वस्तू दिसण शक्या नाही.

Controversy: गडावर एअवढी मोठी बाजारपेठ असण शक्य नाही असे काही लोकांचे मात आहे. महाराजांना लोक गडावर भेटायला येत असत. ही त्यांच्या रण्यासाठी बांधलेली नगरपेठ आहे असाही एक समज आहे.

७. अष्ट कोनी स्तंभ / Balcony : फ़ोटोत दिसत असल्या प्रमाणे अत्यांत कलाकुसरीचे असे हे स्तंभ आहेत. महाराज्यांच्या काळात ते पाच मजली असल्याचा आंदाज आहे. येथे बसून राण्या बाजारपेठ व मैदानात चाललेले खेळ बघत असे. स्तंभात आपल्याला प्रतेक भिंतीवर वरच्या बाजूला छिद्र दिरतात. तेथुन पूर्वीच्या काळी ठंड पाणि वहात असे. त्याच्या खली तेलाचा दिवा ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. त्या दिव्याचा प्रकाश पाण्यात पडून सुंदिर प्रकाश पडत असे. खिडक्यांना सुंदर वाळ्याचे व मखमलाचे परफ़े लावलेले आसायचे. आज ह्या पाच मजल्यांपेकी १-२ मजले मोडक्या अवस्थेत अपल्याला बघायला मिळतात.

८. ह्या व्यतिरीक्त महा दरवाजा, चोर दरवाजा असे अनेक ठिकण आपल्याला बघायला मिळतात.

प्रतेक माणसाने रायगड आयुष्यात एकदा तरीक रावाच. ज्यांना ट्रेकिंग करण शक्य नाही त्यांच्या साठी Rope-way ची सोय आहेच.


Wednesday, February 06, 2008

चहा...

" चहा पानम मनुष्याणांम प्रथमंम बुद्धिलक्षणंम"

चहा... हा एक छोटासा, पिटूकला शब्द पण केवढा मोठ्ठा दिलासा देऊन जातो. अस म्हणतात की पाण्याला कोणताही परीयाय होऊ शकत नाही... मी म्हणते, पाण्या सारखच चहाला सुद्दा दुसरा परीयाय नाही. चहा हा हवाच.

फुक्या लोकांची जशी आपापसात पटकन मैत्री होते की नाही, तशीच चहा शोकिन लोकांची पण मैत्री पटकन होते. दोन फुके office च्या break मधे बाहेर भेटतात आणि त्यांची आपापसात चटकन मैत्री होते. तशीच मैत्री चहा पिणा~यांची सुद्धा होते.

"चहा ची वेळ झाली की चहा पाहिजेच" असे शब्द कानावर पडले की मन भरून येत. मग दोन चहा बेवडे टपरी शोधतात. मी अनेक अश्या चहाच्या टपरींवर जाऊन चहा चा भुरके मारुन स्वाद घेतला आहे.

चहा आवडणाऱ्या लोकांच्या शरिरात एक नैसर्गीक घड्याळ असत, चहा ची वेळ दाखवणार. चहा ची वेळ झाली रे झाली, घडाळ्याचा गजर वाजायला लागतो
आणि अपोआप पावल चहा च्या टपरी च्या दिशेला वळतात. तो चहा चा गजर चहा घेतल्यावरच शांत होतो.

चहा चे तसे अनेक प्रकार आहेत. Black Tea, WhiteTea, Green Tea, Oolong Tea वगैरे वगैरे. चहा कोणताही असो, तो उत्तम बणवण्याची कला असते.

उत्तम चहा कोणता? तर.... चहाची टपरी काढल्या दिवसापासून, म्हणजे ज्या फडक्याने पहिला चहा गाळून चहा टपरी चे उत्तघाटण झालेल असेल, त्याच फडक्याने अनेक वर्ष सतत्याने चहा गाळलेला चहा म्हणजे उत्तम चहा. वर्षानू वर्षे ची अविट गोडी असते त्यात. प्यायला आहात का कधी असा चहा. प्यायला असाल तर त्याची गोडी तुम्हाला सांगायला नको. आणि नसाल तर हा लेख वाचून लगेज मागवा बघू बाजूच्या टपरी मधुन चहा... म्हणजे मग चहा चे घोट घेत घेत उरलेले सगळे ब्लोग वाचता येतील, कस.....................

Wednesday, January 16, 2008

देहेणे - रतन

३ नद्या, अत्यंत अरुंद वाट, खोदलेल्या वेड्या वाकड्या पाय~या, प्रचंड चढ आणि प्रचंड चाल असा ट्रेक म्हणने देहेणे- रतन. ३ नद्या वगळल्या तर बाकी कशाचिही माला भिती वाटत नाही. पण पाणि म्हंटल की हात पाय ठंड पडून कापायला लागतात. पाण्याचा प्रवाहाला जोर होता. मी सुदिप ला धरुन नदी cross करायला लागले. बिचारा सुदिप माला समोर धरुन नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेला चालत होत. मध्यापरियंत सगळ ठिक होत. मध्यावर आल्यावर सुदिप मला म्हणतो," शर्वाणी ताई, तुला एक गम्मत सांगू? माला सुद्धा पोहता येत नाही". दोन मिनिट ब्रह्मांड आठवले. तोंडातून एकच उद्गार निघाला,"काय"?



नद्या cross करण पुरेस नव्हत की काय कोण जाणे, उतरताना आमची आणि एका गटाची सुकामूक झाली. ज्या काही जणांकडे जेवणाच सामान होत, ते आणि आम्ही वेगळ्या मार्गावरुन उतरलो. शोधासोध झाली पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नही. ते आम्हाला भेटले ते jeap पाशी. सकाळी चाहा आणि थोडा नाष्टा ह्यावर आम्हाला तो कठिण ट्रेक उतरायला लागला. जेवण मिळाल ते संध्याकाळी उशीरा. पोटात वाईट आग पडलेली जाणवत होती. Main Road येई परियंत मी तग धरुन बसले. Main Road ला लागलो, समोर jeap आणि हारवलेले मित्र दिसले आणि माझी सहनशक्ती संपली, मी सस्त्यातच बसले. १०-१५ मिनीट तशीच बसून राहीले.

शेवट मात्र गोड झाला. Lunch ला झक्कास आंरसाचा बेत होता. आम्हाला तो Dinner ला मिळाला एवढाच फरक.

Tuesday, January 15, 2008

लहान पणी काढलेली काही चित्र

लहाणपणा पसून चित्रकला हा माझा आवडीचा विषय. Biology त्यामुळेच अर्थात माला आवडयचा. पण गम्मत अशी असायची की, मी heart, kidney, frog ह्यांच चित्र काढण्यात एवढी गुंतून जात असे की, चित्रा बरोबरच theory पण लिहायला लागते हे लक्षात येईपरीयंत उशीर झालेला असायचा. माझ्या चित्राला very good remark कायम असायचा आणि theory ला .... जाऊदे. सांगायचा मुद्दा असा... मुलीला heart कस असत, त्यातले भाग ईत्यादींची माहिती नसल्याशीवाय ती चित्र काढेलच कस? एकदा हे उत्तर मी biology teacher ला दिल आणि नेहमी प्रमाणे मुकाट्याने जाउन वर्गा बाहेर उभी रहीले.

शाळेत history मधल्या महातम्यांचे चेहरे रंगवणे हा सगळ्यांचा आवडतीचा उद्योग. माझाही होता. फक्त मी गांधींना सुट-बुट आणि हातात सिगरेट देण्याऎवेजी, गांधींना गांधींच ठेउन त्यांच व्यंगचित्र करत असे आणि जोडिला त्यांच्या मनतले विचार. व्यंगचित्र काढणे हा अत्यांत गम्तिशीर विषय असला तरी त्या माधमातून गांभिर विशय मिष्किल पणे दाखवणे ही एक कला आहे.


एकदा मी आमच्या एक teacher च व्यंगचित्र फळ्यावर काढले होते. त्या मगे येउन कधी उभ्या राहील्या समजलच नाही. अत्यांत कडक, खडूस म्हणून ओळखल्या जाणा~या त्यांनी, चक्क माला शाबासकी किली, त्या वेळेला एवढ गहीवरुन आल म्हणून सांगू... असाच उदार पणा त्यांनी marks देताना दाखवला असता तर? Teacher ची लाडकी असण हा नशिबाचा भाग असतो. असो....


मी history books मधे काढलेली चित्र पण आज History झाली आहेत. त्या काळात काढलेली काहीच चित्र माझ्या कडे आहेत, पण ती व्यंगचित्र नाही आहेत. १-२ चित्रच आज माझ्याकडे आहेत ती येथे टाकते.



Sunday, January 13, 2008

कारकाई...

कारकाई... ५ऑगष्ट २००७


कारकाईची मनात भरलेली आठवण म्हणजे, करकाईला अनुभवलेल वादळ. मी अनेक ट्रेक केले आहेत, पण कारकाईला जे वादळ अनुभवले ते अवीस्मरणीय.

कारकाई हा अमचा तसा पायलेट ट्रेक होता. आम्ही पहील्यांदाच जात होतो आणि रसत्याची जुजबीच माहिती होती. पावसाळ्याचे दिवस, तुफान पाऊस आणि त्याच्या जोडिला वादळ. टेकडीवर तर अक्षरशा: ढकलले जात होतो. उतरताना पण वाट घसरडी झाल्यामुळे सगळ्यांची वाट लागली होती. उतरताना आम्ही हरीचंद्रच्या वाटेनी उतरली [धरणाची वाट] . धरणावरुन तर एकट्याने चालण शक्याच नव्हत. आम्ही अक्षरशा: साखळी करुन चालत होतो तरी साईडला ढकलले जात होतो. कानाला वा~याचा फटका आणि पावसाचा मारा. डोळ्यांत तर पावसाच्या पाण्याचे बाण मारावे तसे बाण बसत होते. एवढा वादळात फोटो काढण पण शक्यच नव्हत, तरी काही जणांनी फोटो काढण्यासाठी छत्र्या आणल्या होत्या, त्यामुळे थोडे तरी फोटो काढले गेले. Enjoy...
















अप्रतीम असा निसर्ग, तुफान असा वारा, जोरदार पाऊस, घसरडी वाट आणि धमाल.

Thursday, January 10, 2008

Waterfall Rappelling...

Waterfall Rappelling...
माला तशी पाण्याची भिती वाटते. मुळात ३-४ वेळेला पोहायला शिकायला गेले असून पोहता न येणारी मी एकटीच असीन. ट्रेक, Climbing करताना तशी माला भिती वाटत नाही. काळजी घेणारे मित्र असतातच. पण मी Waterfall Rappelling करायच ठरवल. मनात जाम भिती होती पण पाण्याची भिती पण कायमस्वरुपी घालवायची होती. आणि Waterfall rappelling हा माध्यम मी निवडला. त्याला कारण पण आहे, Rappelling करताना rope, Harness चा सहायाने ते केले जाते. तशी पडण्याची काहीच भिती नसते.

काही वर्षा पूर्वी मी पहील्यांदा Waterfall Rappelling केल. [वरील photo गेल्या वर्षीचे आहेत.] Bhivpuri station जवळ एक सुंदर waterfall आहे. आम्ही २० जणांचा ग्रुप गेलो होतो. काही Leadersनी एक दिवस आधी जाउंन तयारी केली. माझ्या सारख्या पहिलांदाच Rappelling करणारे अनेक होत्या. Leader नी सुरवातीला प्रात्यक्षिक करुन दाखवले. वघुन तस सोप वाटल. काही जाणाना करताना बघून अजुन जारा धिर आला. Dukes nose ह्या ठिकाणी Raplling करून आलेली मुलगी Waterfall Rappelling करायला गेली. तिच्या साठी हे अतिशय सोप. पण मघ्यावर आल्यावर तिला काय झाले काहीच समजलेच नाही. ती मधेच अडकली ते एक दिड तास. Waterfall च्या जवळ एक ठिकाणी जाउन बसली ते उठायच नावच घेइना. बर ती तशी अनुभवी असल्यामुळे तिला आधी Rappelling करायला सांगितले जेणेकरुण Leadersना जरा तयारी करायला वेळ मिळेल. शेवटी तिला उचलून खाली आणायला लागले.
तिला बघुन मात्र माला भिती वाटली. आधिच पाण्याची भिती होतिच. माझा turn आला. मी rope वर भार देउन position घेतली. पहिला पाय खाली टाकला आणि पडले. नाका - तोंडात पाणि गेले आणि मी गुदमरले. परत वर आले. सुदिप ला म्हणाले, नाही जमणार माला, मी नाही करत. त्यानी मला instructions follow करायला सांगितल्या. मी मनाची तयरी करुन परत निघाले आणि परत घसरले. Rope, Harness असल्या मुळे तशी भिती नासते. पण पाणि नाका गेल्यामुळे जीव गुदमरला. परत वर आले. :-( . २-३ मिनिट थांबले आणि परत एकदा ना घाबरता प्रयत्न करातच ठरवल. परत Position घेतली. सुदिप वरुन instructions देत होता. Rope वर balance कर. जेवढ जमेल तेवढ sitting position घे, एक एक पाय खाली टाक. मी Instructions follow करायला लागले आणि जमल....
Raplling तस अत्यंत सोपा प्रकार आहे. Rope, Harness असल्या मुळे पडण्याची तशी भिती नसते. Sitting position निट जमली की १-२ मोनीटात खाली. Waterfall Rappelling करताना, Rocks जरा निसरडे झाले असतात. त्यामुळे पायाची grip जाते आणि आपण rock वर जाउन आदळतो आणि पाणि नाका - तोंटात जाते. Leader नी दिलेल्या Instructions पाळणे तेवढ गरजेचे असते. त्यांचा खूप वर्षांचा अनुभव असतो.
ट्रेकिंग म्हटल की अनेक लोकांच्या मनात शंका येतात. अनेकांना ट्रेकिंग हा एक वेडेपणा पण वाटतो. डोंगर चढायचा आणि उतरायचा, ह्यात कसली आली आहे मजा. पण ट्रेकिंग हा एक नशा आहे. ज्याला लागला त्याला तो कायमचा चिकटतो. इथे Overconfidence सुद्धा चालत नही आणि बेफिकीरपणा तर मुलीच नाही. अपल्या बरोबर असलेल्या अनुभवी लिडरचे instructions कायम followकेले की कसलाच खतरा नसतो. And then one can explore oneself in the world of nature.

Monday, January 07, 2008

BhimaShankar

भीमशंकर एक गिरीदुर्ग. (३५००’)
रायगड जिल्हात बसलेला हा दुर्ग. हिवाळ्यात व पावसाळ्यात करण्या जोगा एक सुंदर ट्रेक.
गडावर जाण्याच्या वाटा:

१. गणेश घाट:
अत्यंत सोपी अशी ही वाट आहे. कच्च्या रस्त्याची वाट असून वर जाण्यास ६ते७ तास लागतात.

२. शिडी घाट:
दीड तासात ३ शिड्या. पावसाळ्या जाराशी कठीण वाटणारी अशी ही वाट. पण काळजी घेतल्यास कसलाही धोका नाही.

अनूभव:

माझी आवडती वाट म्हणजे शिडी घाट. भीमाशंकर ला जायच आसल्यास मी ह्याच वाटेने जाते. शेवटच्या शीडी नंतर एक Traverse वळण लागत. माला तो क्षण आजून आठवतो, अगदी काल घडल्या सारखा. शेवटची शीडी चढून मी वर गेले. Traverse पाहून जारा पोटात गोळा आला. हात पकडायला छोटीशी खाच, त्या खाचेला पकडून सावकाश पुढे जायचे. पाय ठेवायला अजून एक खाच, पण साधारण ६फुट खाली. माला हातावर लटकणच भाग होत. दोन सेकंद ब्रह्मांड आठवल. पलीकडे मंगेश उभा होताच. मंगेश अत्यंत उत्क्रुष्ट असा ट्रेकर आहे. त्याची ३वर्षाची चिमुर्डी मुलागी सुद्धा छान ट्रेकिंग कारते. मंगेशनी मला न घाबरता बिंधास्त यायला सांगीतल. मी निघाले, अर्धी वाट हातावर लटकत गेले आणि.... खाली वाकून खोल दरीत डोकावले. संपल, हात - पाय कापायलाच लागले. पहीला fall होता साधारण १५००फुट खाली. १सेकंद जाम भिती वाटली. मंगेशची ती खणखणीत हाक आजून आठवते मला. त्यानी मला बजावल होत की खाली बघायच नही. मी वाटेत थंबल्यावर त्यानी आवाज दिला, शर्वाणी Move, come on. मी जारावेळ डोळे मिटले आणि निघाले. लटकत लटकत मी पोहोचले खरी पण नंतर पलीकडे जाण्यासाठी लांब पाय टकण्याची वेळ आली. मला जेवढा लांब पाय करता आला मी केला, पण मझा पाय पुरेना. शेवटी मंगेशने एक झाडाचा आधार घेउन मला फुलासारख चक्क उचलून पलीकडे आणले. पलीकडे जाउन जेव्हा मी परत दरी बघीतली, तेव्हा जास्त भिती वाटली. पण १दा गेल्यावर भिती गेली. नंतर येणाऱ्या वर्षात मी अनेकदा भीमाशंकर केला, अणि शीडी घाटानेच केला. अप्रतीम असा अनूभव.