Thursday, March 26, 2015
मी आणि मराठी आकडे...
Monday, March 11, 2013
अग आई आणि अहो आई. - एक गमतीदार किस्सा...
Sunday, July 01, 2012
राणीसाहेब...
आज राणीसाहेबांचा काही वेगळाच थाट होता. सकाळी त्यांनी आपल्या अलिशान पलंगावरूनच डोळे
किलकिले करून घरात चालू असलेल्या धावपळीचा अंदाज घेतला. तसं त्यांच घरात अगदी बारीक
लक्ष असे. कागदाचा छोटासा कपटा सुद्धा त्यांच्या दृष्टीस पडला की त्या अस्वस्थ होत असत. मग
कधी तो स्वत: उचलून त्याची विेल्हेवाट लावत असत. नाहीतर इतरांना करायला लावत असतं. आज मात्र त्यां कागदाच्या कपट्याचा त्यांना त्रास होत नव्हता. आज त्यांना कसलाच त्रास होत नव्हता.
धावपळीकडे मात्र त्या चोख लक्ष ठेवून होत्या. आज जेवायला आपल्याला काय हव, कय नको ह्याची
यादी त्यांनी जवळपास सगळ्यांनाच पडल्या पडल्या सांगितली. राणीसरकारांची जेवणाची फ़्रर्माईश
आज काही वेगळीच होती. राणीसाहेबांचा हुकूम ऎकून घरातील लोकांची अगदी धावपळच उडाली.
सगळे तयारीला लागले.
कहिही बोलत नव्हत्या. घारातील मंडळी आपल्या पलंगाजवळ येऊन मुद्दाम आपल्याशी कहीतरी
बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे त्या ओळखून होत्यी. आज त्यांच कुठे आणि काय विनसलं हेच
कुणाला समजत नव्हत. कुणी बोलायला येत आहे हे पाहून त्या सरळ कुस बदलून परत झोपल्याचं
नाटक करत होत्या.
तरी त्या अजून झोपूनच होत्या. आज त्यांना स्वत:च आवरण्याची कसलीच घाई दिसत नव्हती.
घरातील वळदळीकडे त्यांचं लक्ष जरी असलं तरी आज अपणहून त्यांनी कुणाची चैकशी सुद्धा साधी
केली नाही. साफ सफाई करण्यासाठी येणाऱ्या मावशींन पासून ते शेजार पाजरच्या बायकांची त्या
आपणहून चौकशी करत असतं. आज त्यांची अपुलकीने चौकशी करण्यासाठी सुद्धा राणीसरकारांनी
आपला पलंग सोडला नाही. सगळ्यांनाच चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. आज राणीसरकांनी
जवळ जवळ सगळ्यांशी अबोलाच धरला होता म्हणा नं.
घंटानाद जेव्हा करतात, तेव्हा सगळ घर प्रसन्न होतं. आज देवाला पण चुकल्या चुकल्या सारख
वाटत असणार हे नक्की.
स्वयंपाघरात तर त्या जातिने लक्ष घालत असतं. आज कुठली भाजी शिजते आहे, पोळ्या कशा होत
आहेत, हे त्या अगदी जातिने बघत असत. आज मत्र काहितरी वेगळच घडत होतं. जणू आज
सगळ्याच कामकाजला सुट्टी होती त्यांच्या.
आज राणीसरकारांच्या आईचा ‘Weekend’ होता आणि म्हणून राणीसरकार पण खूश होत्या. आज
त्यांना आईने लवकर उठून अवरण्याची कसलिच घाई केलेली नव्हती. आईने आज लवकर उठवले
नाही म्हणजे आज आई घरी आहे हे अमच्या राणीसरकारांनी, म्हणजेच माझ्या २ वर्षाय भाची
अहनाने चांगलच ओळखलं होतं. एरवी ७.३० - ८.०० ला उठणारी अहना, आईच्या weekend च्या
दिवशी हमखास लवकर उठत असे आणि आईला उठवून म्हणत असे, “आई उठ! अहनाची सकाळ
झाली.”
आज सगळ्याला सुट्टी दिली होती. सकाळ पसून राणीसरकारांनी काही खालं नाही, ह्याने
राणीसरकारांची आईच जस्त अस्वथ झाली होती. “आज मनीमाऊने सांगितल्या प्रमाणे छान
बटाट्याची भाजी केली आहे. मग अहना आज छान भाजी पोळी खाणार का?” ह्या प्रश्नाने मात्र
राणीसरकारांचा अबोला तुटला. “अहनाला दु-दु हव” अशी फर्माईश त्यांनी दिली. “ बरं! मग अहना
आज कपानी दुध पिणार आहे का? आई सारखी.” ह्या आईच्या बोलण्याला मात्रा राणीसरकाराने जरा घुश्यातच उत्तर दिलें, “अहनाची बाटली काऊने नेली. काऊ दादा अहनाची बटली दे. असं काय करतोस?” अस म्हणून तोंडात बोट घालून, कुस बदलून त्या परत लोळत पडल्या.
Thursday, September 22, 2011
आईच्या स्वप्नात आला अमिताभ बच्चन...
आमच्या घरी कसलस तरी function होता आणि त्या function साठी अमिताभजी आले होता. अर्थात आमच्या घरी अमिताभजी आले आहेत हि गोष्ट ऐश्वर्या pregnant आहे ह्या NEWS इतकीच काही क्षणात सगळीकडे हा हा म्हणता पसरली. आणि हा हा म्हणता आमच्या घरी लोकांची गर्दी जमू लागली. आईने वैतागून मग अमिताभजी ह्यांना आमच्या आतल्या खोलीत लपवून ठेवलं. आणि अमिताभजी ह्यांच्या fans ला सांगितलं,"अमिताभ आजकाल असा लोकांकडे येत जात नाही फारसं. तो आला कि खूप गर्दी होते न... कधीतरी अचानक येऊन जातात तो , म्हणजे कुणाला समजत नाही". असं सांगून आईने त्या येणाऱ्या लोकांना बाहेर काढलं. बिच्चारे.
आईच्या त्या स्वप्नात fans पेक्षा बिच्चारी अवस्था होती ती अमिताभजी ह्यांची. कारण असं लपून बसून कंटाळा आल्याने त्यांनी मग आमच्या सगळ्यांसाठी मस्त पेकी चहा बनवला. आता एवढ्या मोठ्या कलाकाराने आमच्या साठी चहा बनविलेल बघून आईने सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. आई काय खाऊ घालणार होती हे तिला आठवत नाही. पण कसं आहे... आम्ही सगळे, म्हणजे मी, आई, बाबा, ताई सगळ्यांची उंची बेताचीच. आईला तर कधी कधी ह्या कमी उंची चा भयानक त्रास होतो. म्हणजे हेच बघा. आपण 'न लागणाऱ्या वस्तू’ कपाटाच्या अगदी वरच्या कप्यात ठेवतो. छानसा dinner set असो वा सतत न लागणारी वस्तू असो त्या जपून वरच्या कप्यात ठेवल्या जातात. आता अमिताभजी चक्क आले आहेत म्हंटल्यावर आईला कदाचित त्यांच्या साठी 'तो' छानसा नवा (नवा = न वापरलेला १०~१५ वर्ष जूना) dinner set काढायचा असेल. आता एवढ्या वरती तो जपून ठेवलेला dinner set काढायचा म्हणजे आईला शिडीवर अथवा खुर्चीवर चढणं आलेच. आईने मग चक्क अमिताभ जी ह्यांना हाक मारली व म्हणाली, "उंची मुळे केवढा फायदा होतो हो तुम्हाला, मला जरा तो वरचा डब्बा आणि तो छानसा dinner set काढून द्या." आईनी हे सांगितल्या वर मात्र मी खो खो हसायला लागले आणि मनात आलं, "कुणाला कश्याचं काय तर कुणाला कश्याचं काय".
Saturday, June 18, 2011
Modern वटपौर्णिमा
आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्या साठी भारतातील हिंदू सुवसिणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्रत करतात. करवाचौथ, वटपौर्णिमा अशी वेगवेगळी नाव त्याला आहेत. जशी वेगवेगळी नाव, तश्याच वेगवेगळ्या कथा ही त्याला जोडल्या गेलेल्या आहेत.
वटपौर्णिमेच्या दिवशी बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्य साठी अख्खा दिवस उपास धरतात. करवाचौथ च्या दिवशी सुद्धा बा
आपली बायको आपल्या साठी व्रत करते म्हणून काही नवरे पण त्या दिवशी व्रत ठेऊन उपास करतात. तुम्ही पण असा उपास करून आज-तक वर येण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्या नशीबात नाही. त्या साठी तुमचं अमिताभ बच्चन शी काहीतरी नात असणं जरुरीच आहे. अमिताभ बच्चन पण म्हणे जया बच्चन साठी करवाचौथ चा दिवसभर नीळजळी उपास करतो. त्याचं exclusive coverage आज-तक वर दाखवण्यात येते. पुढे अभिषेक आणि ऐश्वर्या चं लग्न झाला. मग अजून एक news चं खाद्य आज-तक ला मिळाल. हि नवी, modern सून करवाचौथ चा व्रत करणार का? आणि अभिषेख पण आपल्या वादिल्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन नीलजळी उपास करणार का? क्या हे आपका जवाब हमको भेजो YES / NO और भेज दिजीये ५८५८५८ पार". अख्ख्या भारताला सातविणारा प्रश्न असल्या सारखं ती news दाखवली जाते. असो.. त्यांच्या सुखी संसारात आपला प्रवेश एवढाच.
वटपौर्णिमा जवळ आली की हमखास एक प्रश्न मैत्रिणी एक
१. छे! काहीतरीच काय! मी modern मुलगी आहे, एकविसाव्या शतकातली. You know I don’t believe in this Vatpornima and all. Taking 7 rounds to that tree looks so filmy. असा म्हणणाऱ्या मुलींचा Valentine day वर मात्र विश्वस असतो. :P
२. माझा नवरा पण जरका माझ्या साठी उपास करणार असेल तरच मी त्याच्या साठी उपास करीन.. अथवा नाही.
३. शी सात जन्मी एकाच नवरा काय. काही चोईसे नकोका? एक जन्मी सहन करते आहे तेच पुष्कळ झाला. ७ जन्म अशक्यच, असं दोन्ही नवरा/ बायको ची मत.
४. मी ह्या वर्षी उलटे फेरे मारणार आहे. अथवा हा जन्म ७ वा असूदेत.
६. काही मुली देवाकडे असं ही मगण करतात की देवा मला ७ जन्म हाच नवरा चालेल, पण जरा सुधारलेल्या आवृत्तीमध्ये.
७. माझ्या एका मैत्रिणीने तर height केली. आपण ७ जन्म हाच नवरा का मागायचा ह्याचा तिचा logic भन्नाट आहे. की ह्या जन्मीत्याला सुधारवण्यासाठी घेतलेली महिनात वाया जाता कामा नये. नवऱ्याला सुधारायला ७ जन्म लागतातच. पुढच्या जन्मी दुसरा नवरामिळाला तर ह्या जन्माची आपली महिनात वाया तर जातेच पण परत पाटी कोरी असल्यामुळे पालील्यापासून नवऱ्याला सुधारायलासुरवात करायला लागते.
तुम्हीला कोणत्या पर्याय आवडला हे मला सांगण्यासाठी type करा १, २, ३, ४, ५, ६ का ७, आणि पाठवा Comment मध्ये. :-)
मुली असं म्हनातात तेथेच मुल म्हणतात, तुम्हा मुलींना व्रत वगैरे करून हाच नवरा ७ जन्म हवा/नको असं पर्याय तरी आहे. आम्हाला जी पदरात पडेल तिलाच स्वीकारावे लागते. हा अन्याय आहे.
मुली मस्करी मध्ये काहीही बोलत असूदेत, पण आज सुद्धा मुली तितक्याच श्रद्धेने हे व्रत करतात. ह्यात modern, orthodox वगैरे कोणताही "पणा" नसतो. आपल्याला आवडणाऱ्या, आपण ज्याचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे त्याला निरोगी आणि दीर्घयुषा लाभो असं सगळ्याचबायकांना वाटत.
******************************
वटपौर्णिमे बद्दल थोडक्यात - सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशीवडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते.
ज्येष्ठ महिना. नावाप्रमाणेच सर्व ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा हा महिना. ऋतूचक्रातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो.हा महिना तसा गंभीर, शांत आणि संथही. ग्रीष्माची चाहूल लागलेली, आभाळ भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला,मध्येच पावसाची हलकी सर येणार्या पावसाळ्याची आठवण करून देते. उन आणि पावसाळ्याचं 'फ्यूजन' म्हणजे हा महिना. निरोपघेणारा उन्हाळा नि सुरू होणारा पावसाळा यांची गळाभेट या महिन्यात पाहता येते. अशा या स्वप्नील वातावरणाला धार्मिकअधिष्ठानही लाभले आहे.
*****************************************************************************************************************
करवाचौथ बद्दल थोसक्यात - करवा म्हणजे तोटी (spout) असलेल एक मातीच मडक आणि चौथ म्हणजे चौथा दिवस. ह्या दिवशी सुवासिणी बायका निळजळी उपास करून रात्री चंद्र दर्शनानेच नवऱ्याच्या हातून पाणी ग्रहन करून उपास सोडतात. करवाचौथ ची अशी कथा आहे की, विरावती नवची एक रुपवान मुलगी होती. तिचा विवाह एक राजकूमाराशी झाला. पहिल्या करवाचौथ चा दिवशी ती माहेरी आली आणि तिने कडक व्रत केला. पण तिची तब्बेत खराब झाली. तिला ७ भाउ होते, त्यांना तिची अवस्था बघवली नाही. म्हणून मग त्यांनी पिंपळ्याचा झाडामगून आरश्या चे प्रतिबिंब पडल. तो चंद्र अहे अस समजून विरावतीने अपल व्रत सोडल. पण लगेचच तिचा नवरा आजरी पडला. तेव्हा तिला सांगण्यात आल की तिच्या हातून करवाचौथ चा व्रत मोडला गेला आहे आणि तो तिने पुर्न केला. अश्या प्रकारे तिने तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवले.