Sunday, November 30, 2008

मी काढलेले काही ‘Sketch’。

मी काढलेले काही ‘Sketch’。 मला साधारण पणे लहान मुलांचे भाव टिपयला जास्त आवडतात。अलिकडे मी काही माझे मित्र - मैत्रिणीचे [तरूण मुला - मुलिंचे] चित्र काढले आहेतच, पण त्याच बरोबर काही व्रुद्ध लोकांचे पण चित्र रेखाटले आहे - माझी आजी आणि Valley Of Flowers ला भेटलेले एक अजोबा. त्याच बरोबर Beauty of Valley अस माझ्या मित्राने नाव दिलेली एक गोड मिलगी.

More: http://picasaweb.google.com/sharvani.khare/MyPaintings#

Friday, September 26, 2008

लग्न, ज्योतिषी आणि मी。。。

अडचणीत माणसाला देव आठवतो म्हणतात. मी म्हणते, कलियुगातल्या माणसाला अडचणीत ज्योतिषी आठवतो. कलियुगात माणसाला देव भेटेल हे दुर्लभच. मी सुद्धा ह्या न त्या कारणांसाठी ज्योतिष्याकडे कडे गेले अहे. माझा जन्म २९ डिसेंबर १९८१ ला पहाटे १.१४ मि. ला - मुलुंड - मुंबईला झाला. [ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणा~यांनी खुशाल माझी पत्रिका मांडावी आणि माझे फुकट भविष्य सांगावे. ] आता पर्यंत अनेक ज्योतिश्यांनी माझी पत्रिका मांडली आहे. पत्रिकेप्रमाणे माझे दर सहा महिन्याने चांगले दिवस येतात. प्रत्येक्षात मात्र 'त्या' सहा महिन्यांची वाट मी अद्याप पहात आहे. वेळेप्रमाणे मांडलेल्या गणितात माझे ग्रह उच्च स्थानी असतात किंवा सहा महिन्यानी ते उच्चीचे होणार असतात. प्रत्येक्षात तसे घडत नाही आणि मग सुरू होते पुढल्या सहा महिन्यांची प्रतिक्षा. मला तर वाटतं माझी जन्माची वेळच त्या डॉक्टर ने चुकीची नोंदवली आहे. सगळे ग्रह मजबूत व उच्चीचे असताना घोडं अड़ते कुठे हेच समजत नाही.

मुलीच्या लग्नाची काळजी सगळ्याच आई - वडीलांना असते तशी माझ्या आई बाबांना पण आहे. अपल्या मुलीला योग्य असा जोडीदार मिळेल का? [आजकालच्या नवीन अमेरिकन फॅड प्रमाणे मुलगी जावईच शोधेल ना? अस पण काही आई वडिल या ज्योतिष्याकडे तसल्ली करून घेत असावेत. नाहितर ही आमच्या मुलिची बायको, अथवा हा आमच्या मुलाचा नवरा अशी ओळख करून देण्याची वेळ येईल ह्याची धास्ती. तो काळ अता भारतात दूर नाही म्हणा!!.] असो... तर मी पण माझे ग्रह सध्या कोणत्या घरात वास्तव्याला अहेत हे विचारायला जोतिष्याकडे गेले. मी ज्या घरात जन्मले त्याच घरात अद्याप राहते आहे. पण माझ्या ह्या ग्रहानी आता पर्यंत अनेक घर बदलली आहेत. बर घर बदलून तेथे वास्तुशांत नको का करायला? दोन चार संस्कृत श्लोक म्हटले की घरात शांतता नांदते. [घरात म्हणजे घरातल्या माणसात असे समजू नये.] माझे ग्रह घर बदलून वास्तुशांत करत नसावेत, म्हणून मग ते घर मला त्रास द्यायला लागत.

。"तुमच्या मुलीचं लग्नानंतर भाग्य उजळणार आहे" अस एकाकडून समजले. माझ्या नव~याच्या ग्रहांच्या मांडणी नुसार लग्नानंतर हाल अपेष्टा असाव्यात, तरिच तो आजून मला भेटलेला नाही.

。"तुझा नवरा पायलट असेल" अस एका पठ्ठ्याने मला सांगितले. त्या दिवसा पसून मी अनेक वर्षे विमानाकडे डोळे लाऊन बसले होते. नंतर त्याच ज्योतिष्याने काही वर्षांनी मला software engineer नवरा मिळेल असे सांगितले. माझ Plane अश्या प्रकारे office मधे Land झाले. लग्नाला उभ्या असलेल्या मुलींच्या भावनांशी असे खेळू नये :-(

。 एका जोतिषाने तर सांगीतले, "ह्या मुलिशी जो लग्न करेल तो मुलगा खूप भग्यवान असेल म्हणे". थापड्या जोतिषी नुसता. माला तर स्वता:लाच स्वताच्या नव~याची दया येते. माझी अखंड बडबड सहन करायला लागणार आहे त्याला. आणि तो भाग्यवान?

。 Arrange marriage चांगले का Love marriage हा सगळ्यांना पडणारा प्रश्न. मला कशाचाच तिरस्कार नाही. Arrange किंवा Love किंवा Marriage ह्या सगळ्यांच्या बाबतीत मी समतोल विचारांची आहे. पण तो arrange marriage मधला "मुलगी बघण" हा प्रकार काही मला झेपलेला नाही आणि जमणार पण नाही. अम्हाला पत्रिका बघायची नाही - आमचा ह्यावर विश्वास नाही, असे ठासून सांगणारे पुढे म्हणतात, "पण मुलीला मंगळ तेवढ नको" हा अर्धवट पणा. मुलीचा संपूर्ण फोटो पाठवा - कशाला ? माझे पायगुण बघायला? काय हा पोरकट पणा. [अश्या लोकांना प्रतिका पाठवायची नाही... अस मी आईला सांगितले. त्यावर आईने मला ४ (४०००) समजूतिच्या गोष्टी सांगितल्या.]

。ह्याला कंटाळून मी एका जोतिष्याला सरळ विचारले,"माझ love marriage होईल का? योग आहे का?" त्यावर त्यांनी "तुझा love marriage चा योग निघून गेला" अस सांगितल. निघून गेला? असा कसा निघून गेला योग? बर मग योग जेव्हा केव्हा होता तेव्हा ३-४ नाही तरी एखाद्या तरी मुलाने मागणी नको का घालायला? मला योग आलेला कळायच्या आतच तो योग शेजारच्या घरात निघून गेला :-(

माझ तर ह्या ज्योतिष्यांना एक सांगण आहे - काही ज्योतोषी सांगतात... पूर्वेला किंवा उत्तरेला किंवा अग्नेयला जा अस सांगण्यापेक्षा सरळ पत्ता का नाही देत? सरळ मला पत्ताच सांगा न!

लग्न, ज्योतिषी आणि मी。。。यांचे ग्रह आजून जुळलेले नाहीत.

Tuesday, September 09, 2008

"Valley of Flowers - पुष्पवटी"

"Valley of Flowers - पुष्पवटी"
ऑगस्ट - १७ ऑगस्ट २००८

Its rightly said, "The World is a book, and those who do not travel read only a page."

चरातीचराती चरतो बघ: - जो चालत असतो तोच ज्ञान प्राप्त करतो. ट्रेकिंग करण्यामागे हेच कारण आहे. आपल्या भारत देशात एवढी विविधता आहे, अनेक रंग त्याच्या विविध छटा, अनेक भाषा, अनेक चेहरे, प्रत्येक जागेचा स्वत:चा असा इतिहास, त्यातून आलेला पेहराव आणि संस्कृती हे भाराऊन टाकणारे आहे. भारत देशाकडे ह्या दृष्टीकोनातून बघणारा ह्या देशाच्या प्रेमात पडला नाही तरच नवल! एकीकडे सैह्याद्रीचा रौद्र कडा तर दुसरीकडे हिमालयाचा विस्तार. एकीकडे खवळलेला समुद्र तर दुसरीकडॆ विस्तिर्ण वाळवंट, एकीकडे शांतपणे वाहणारी कृष्णा तर दुसरीकडॆ दुथडी वाहणारी गंगामैया. आमचा हा ट्रेकसुद्दा या गंगामैयाच्या दर्शनानेच सुरू झाला.



दिवसदिवस पहिला - ९ ऑगस्ट २००८
९ ऑगस्टला गरिब ? रथ ने आम्ही मुंबई हून दिल्ली ला निघालो. 'गरिब'रथात सगळ्या सुविधा होत्या, नव्हता तो म्हणजे कोणीगरिब. गाडीत गेल्या-गेल्या adjustment ला सुरवात झाली. १ भला माणूस चटकन जागा बदलायला तयार झाला. तो इतका adjustable होता की आम्ही मजेत म्हणालो सुद्धा - ह्याला कुणी टपावरची जागा adjust कराल का? अस विचारल असत तर तो भला माणून टपावर पण गेला असता. त्यात एक मिठाचा खडा अला, एक शिष्ठ माणूस - शिष्ठ नाहितर काय, एवढ्या भल्या शब्दात आणि गोड अवाजात मी त्याच्याशी बोलले तरी शिष्ठ बुड हलवायला तयार नाही. काही माणसं पैदाइशी दु:खी वाटतात त्यातला तो. असो .... तर आम्ही दिल्लीला पोचलो.



दिवसदिवस दुसरा - १० ऑगस्ट २००८
दिल्लीवरूनदिल्लीवरून हरिद्वारला जाण्यासाठीची Train म्हणजे 5 Star hotel मधून चहाच्या ठेल्यावर आल्यासारखे वाटले. हरिद्वार च्या राम झुल्यावर परत एकदा जाऊन मजा आली. ८ वर्षा पूर्वी आई - बाबां बरोबर आले होते. गांगेचा किनार, अलोट भक्तांची गर्दी, लक्ष्मण झुला, बोलो बंबम - बंबम चा जयघोश, सगळ तसच होत. GMVN 「गढ़वाल मंडल विकास निगम」 मधला आमचा मुक्काम मस्त झाला.



दिवसदिवस तिसरा -११ ऑगस्ट २००८
पहाटॆपहाटॆ उठून आम्ही आमच्या हरिद्वार ते जोशीमठ प्रवासाला लागलो. त्या बस मधे आमच्या सोबत होते ते बिहारी बाबू. त्यांच्या आंगाला येणारा वास आणि त्यांच्या न संपणा~या बिड्या. दर वर्षी फ़क्त एकदा गंगेत येउनच स्नान करत असावेत. त्यांच्या अंगाच्या वासाच्या जोडीला त्यांच्या बिड्या. त्यांच्या बिडीच्या धुराने आम्ही सर्वांनी किती बिड्या ओढल्या ते गंगामैयालाच ठाउक. आम्हा सगळ्यांच १-२ वर्ष आयुष्य कमी झालं हे नक्की. चौदा तासाचा तो बिडीमय प्रवास म्हणजे भारतातल्या गलिच्छ लोकांच दर्शन होत. अजून तो धूर आठवला की खोकला येतो. पण त्याला तडा द्यायला होते गंगामैया च्या घाटातले वेडेवाकडे वळण. Driver अश्या वळणावर गंगामैयाचा घोश करत, "बोलो गंगामैया की जय"असे म्हणून ते वेडेवाकडॆ वळण पार करत असत. ह्या सगळाला सोबत होती ती म्हणजे सुंदर अशा निसर्गाची. डोळे दिपवून टाकणे म्हणजे काय ते येथे समजल. चौदा तासाचा तो गलिच्छ लोकांबरोबरचा प्रवास मी मनसोक्त photography करून घालवला. गंगामैयाला भेटायला आलेले ढग म्हणजे - "अप्रतिम" हा एकच शब्द. खाली वाहणारी गंगामैया, मोठाले पर्वत, आणि ढग असा अनोखा संगम आपणास पहावयास मिळतो. आपल्या जवळच्या मैत्रीणीला भेटायला आतूर झालेली भागिरथी खळखळत वाहात येउन कडकडून अलखनंदेला येउन भेटते. हा अलखनंदेचा आणि भागिरथीचा मैत्रिपूण संगम, ह्यालाच पूढे जाउन आपण गंगा म्हणून ओळखतो. अलखनंदा आणि भागिरथी च्या संगमाचा आनंद घेत आम्ही तो प्रवास करित होतो. तेवढ्यात गिरिशचा किन्चाळण्याचा आवाज आला, " अरे गाडी थांबवा, कुणीतरी ओकलायं माझ्यावर". आम्ही गोंधळून गेलो, कसली गडबड तर दिसत नव्हती. मग लक्षात आले , गिरीषच्या मागे बसलेल्या माणसाने त्याच्या आंगावर उलटी केली होती. मुळात गिरीष बस लागते म्हणून Window seat शी बसला होता तर त्यालाच असा प्रसाद मिळावा? मग काय सगळ्यांनी मिळून त्याला जाम पिडले. जाम मजा आली. त्यात अमोल ने तर height केली, त्या माणसाला त्याने जाऊन विचारल, "भाईसाब, क्या आपका अभिबी जी मचल रहा हे?" अमोलच नशीब बरवत्तर म्हणून बर, आणि हा प्रश्न त्या माणसाच्या बायडीला विचारला नही म्हणून वाचला म्हणायचा. असे सगळे चांगले - वाईट अनुभव घेउन आम्ही जोशीमठ ला पोहोचलो. शंकराचार्यांच्या मठात जाण्याचा योग आला. शंकराचार्यांनी बांधलेल्या चार मठांपेकी हा एक. बाकिचे तीन मठ म्हणजे, रामेश्वर - दक्षिण, द्वारका - पश्चिम आणि पुरी - पूर्व.





दिवस चौथा - १२ ऑगस्ट २००८
"हेमकुंड"


देवदेव काही लोकांना फुरसतीने बनवतो म्हणतात, तसच काही जागा सुद्धा देव फुरसतिनेच घडवतो, त्यातली एक म्हणजे "Valley Of Flowers - पुष्पवटी" आणि "हेमकुंड". देवाने ह्यात इतके विविध रंग भरले आहेत, इतकं नाजूक नक्षीकाम केल आहे की डोळे दिपून जातात. जोशीमठ ते घांगरीया हा १३की. चा प्रवास आम्ही खेचरावर / घोड्यावर केला. मी आधी बसले त्या खेचराचे नाव विरू. अत्यंत बेकार खेचर. मी बसल्या बसल्या महाराज निघाले आणि मला घेऊन एका खड्यात उतरले. मी तो पर्यंत नीट मांड पण टाकली नव्हती. स्वता:ला वाचवण्याच्या गडबडीत मी एका काटेरी झाडाला पकडले. पूढे खूप दिवस बोटं सुजलेली होती. मी कॉलेज ला असताना थोड Horse riding केल आहे. पण ते अत्यंत trained horse होते. ह्या विरूनी जाम त्रास दिला. शेवटी मी आणि अमोलने खेचर बदलली. बसंती दमदार होती. २-३ तासात आम्ही घांगरीयाला पोहोचलो. त्याच दिवशी हेमकुंड करायचं असं ठरलं. वेळ कमी असल्या कारणाने आम्ही परत खेचरावरून /घोड्यावरून जायचं ठरवल. आम्ही हेमकुंडाकडॆ जात असताना आम्हाला परतीचे प्रवासी भेटत होते, "अभी तो गुरुद्वारा बंद हो गई, अब जानेसे कोई फायदा नही" असले सल्ले मिळाले. पण आमच्या नशीब बलवत्तर होत. आमच्या आग्रहास्त्व त्यांनी गुरुद्वारा उघडली. गुरु गोविंदसिंग ह्यांच्या स्मरणार्थ बांधलेली ही गुरुद्वारा शिख लोकांच दैवस्थान आहे. गुरुद्वाराच्या मागे आहे - हेमकुंड. हेमकुंड- हेम म्हणजे हिमालय आणि कुंड. हिमालयाचा कुंडा. हे साधारण १५००० फुटांवर वसलेल आहे. प्रचंड थंड अशा त्या कुंडात सरदार डुबकी मारतात. हिंदू लोकांसाठी गंगेला जे महत्व आहे, ते महत्व हेमकुंडाला शिख लोकांमधे आहे. अशा पवित्र कुंडात डुबकी मारण्याची हिम्मत झाली नही. पण मग मी ते अती थंड पाणी डोळ्यांना लावल. त्या थंड आणि पवित्र पाण्यात हात घालून माझी बोटांची सुज कमी झाली. तेथे असलेल्या लक्ष्मण मंदिरला भेट देउन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. हेमकुंडा वरून परत येताना घोड्याची सवय झाली असली तरी परतल्यावर शरिरात जितकी म्हणून हाड (शिल्लक)होती ती सगळी बोलायला लागली होती. घांगरीयाला आल्यावर मात्र गरम पाण्याने आंघोळ केल्यावर बर वाटल . हा पहिलाच असा ट्रेक होता जेथे आम्हाला आंघोळ करण्याचा आनंद मिळाला. असं सुख ट्रेकला दुर्लभच. अर्थात आंघोळ करुन fresh होऊन आम्ही झोपी गेलो हे ओघाने आलेच.


दिवसदिवस पाचवा - १३ ऑगस्ट २००८
"Valley Of Flowers"



सकाळीसकाळी लवकर तैयार होऊन आम्ही Valley ला निघालो. 「रघुविर चौव्हाण」 हे आमचे लोकल गाईड 「Local Guide」. M Sc Botany झालेले चौव्हाण गेली ३० वर्ष Valley मधे एक अभ्यासक म्हणून हिंडत आहेत. Ticket काढण्यासाठी आम्ही थांबलो असताना, मी पिट्टूत बसून घेतले. घोड्यावर बसताना पण माला जेवढी भिती वाटली नव्हती तेवढी भिती मला ह्या पिट्टूत बसताना वाटली. एक तर आपण कुणा माणचाच्या पाठीवर बसायचे ही कल्पनाच मनाला पिळ पाडण्यासारखी आहे. [अर्थात, ढष्ट - पुष्ट सरदार आणि सरदारीणींना ह्या पिट्टूत बसलेल बघून, "रोज माझ्या सारख भाड मिळूदे" अशी त्या माणसाने गंगामैयाला साकड नक्की घातल असणारच.] Valley मधे साधारण ३५० प्रकारची फुले अढळतात. लोकांच असा समज आहे की जुलै - ऑगस्ट ह्या सिझन मधे आपल्याला ही सर्व फुल बघावयास मिळतील. सरांनी सांगितल्याप्रमाणे, वर्षभरात वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळी फुल उमलतात. बर्फ असताना उमललेली फुल बर्फाबरोबर नाहिशी होतात. तर काही बर्फ वितळण्याच्या वेळेला, तर काही पावसाळ्यात अढळतात. Forget me not, Arisaema Tortuosum, Geranium Wallichianum, Codonopsis Virdis etc. असे अनेक फुलांचे प्रकार आम्ही बघितले. [ही सगळी नाव माझ्या स्मरणशक्ती मुळे आठवून लिहीलेली नाही. पुस्तकातून शोधून लिहीली आहेत, उगाच गैसमज नको.] नचिकेत ने ह्यावर एक भारी किस्सा केला होता. सर फुलांची नाव सांगत होते आणि आम्ही नविन नावाबरोबर आधिच नाव विसरत होतो. त्यावर नच्याचे टिपण असे की, सरांना आपण कुठे चुकू नये म्हणून बरोबर घेतल आहे, बाकी काही नाही. [त्याच्या ह्या जोक ला, नंतर आम्ही 'Best Joke of the Trek" अस award दिलं.] Valley सरांनी आम्हाला पहिल्या फुलाची माहिती दिली आणि गिरिशला नेहमीप्रमाणे बाळबोध प्रश्न पडला, ही फुल आपण खाऊ शेकतो का? फळ खाण्यासाठी असतात हे माहिती होत पण फुल खाण्यासाठी कोण विचारेल अस वाटल नव्हत कधी! एक निळ्या रंगाच फळ खाण्याची परवानगी सरांकडून मिळाली. गिरिश ने ती असंख्य प्रमाणात खाल्ली हे सांगायला नकोच. Valley म्हणजे देवाची बाग. ही बाग देवाने अनेक रंगांनी नटवली आहे. त्या Valley ची गुलाबि छटा बघून कुणाचे 'होश' उडले नसतील तरच शपथ! असंख्य फुल, Glacier बघून व मनसोक्त photography करुन आम्ही परतलो. मन ह्या फुलांनी फुलून गेले होते.



देवाने ज्या प्रेमाने येथला निसर्ग नटवला आहे तसच येथली माणस.






दिवासदिवस सहावा - १४ ऑगस्ट २००८

ह्याह्या ट्रेक मधे दोन अविस्मरणीय गोष्टी घडल्या, त्यातली एक. परतीचा प्रवास - घांगरीया ते गोविंदघाट. परतीच्या प्रवासात मी आणि मानसी सोडल्यास सगळ्यांनी चालत जायच ठरवल. मानसीचा पाय वाईट दुखावला गेल्यामुळे आणि मला horse ridingचा आनंद लुटायचा होता म्हणून मी - असे दोघींनी घोडे घेतले. मी ह्या वेळी घेतलेला घोड्याचे नाव "शेरू" ! अत्यंत रुबाबदार असा हा घोडा. Tall - Dark and Handsome. एके ठिकाणी checkpost वर आम्ही थांबलो असता, माझ्या घोड्याचा मालक receipt शोधण्यात मग्न असताना, त्याने शेरूला चरण्यासाठी बाजूला सोडले. हे महाशय असे थांबणार थोडीच!!. ते निघाले मला एकटीला घेऊन . सुरवातीला मजा वाटली पण मग हे थांबायच नावच घेईनात. अर्चनाने सुरवातीला घोडा केला होता. मी पुढे जाऊन तिच्या घोडेस्वाराला माझा घोडा थांबवायला सांगितला. मग मात्र मला चेव आला आणि मी जवळ्जवळ तीन साडे तीन तास त्या valley तून एकटीने मनसोक्त horse riding केल. त्या घोडेवाल्याले मला लगाम कसा ओढून घोड्याला दिशा दखवायची, टाच मारून त्याला चल म्हणून सांगायचे हे शिकवले. "हिबरू" हा एक शब्द मी त्याच्याकडून शिकले. हिबरू म्हणजे - "चलिऎ, चला हुहूर." मधे एके ठिकाणी एका ठेल्यावर तो स्वता: थांबला. थांबला म्हणजे ठेल्याच्या समोरच्या एका उंच जागी चढला [सवई प्रमाणे], तेव्हा मी एवढ्याने ओरडले. [त्या वेळेला त्याला कुणितरी पाठिवर बसल्याची जाणीव झाली असेल.] पण मग मी बिंद्दास होऊन मनसोक्त horse riding केल. मधे मी आमच्या ग्रुप च्या खूप पुढे आले होते, म्हणून मग आम्ही एके ठिकाणी थांबलो. मी लगेच फोटो काढण्यात मग्न झाले. तव्हा शेरू ने माझ्या खांद्यावर अलगत मान टाकली. तो क्षण माझ्या आयुश्यातला आनंदाचा क्षण. This was the most memorable day and moment of my life. गोविंदघाट ला उतरल्यावर मी त्या घोड्याला एक गळ्यातला पट्टा विकत घेतला, माझी आठवण म्हणून. घोडेवाल्याने आम्हाला गोविंदघाटाच्या बरच आधी सोडल्यामुळे आम्हाला आमच्या बॅगा उचलाव्या लागल्या. जोशीमठ ते हरिद्वार मार्गा वर landsliding झाल्यामुळे आम्ही बद्रिनाथला जायचे रद्द केले. त्यावेजी आम्ही औलीला गेलो. औली हे skiing करण्यासाठीचे भारतातले प्रसिद्ध ठिकाण. ह्या ठिकाणी cable car नी जावे लागते. परत जोशीमठात येऊन आम्ही थोडा timepass करून झोपी गेलो.


दिवसदिवस सातवा - १५ ऑगस्ट २००८

Most thrilling, exciting, horrifying day. This thrill was exclusively captured by Sharvani n Amey's channel. जोशीमठातून आम्ही हरिद्वारला निघालो. आमच्या सुदैवाने आदल्या दिवशी पूर्णपणे बंद असणारा जोशीमठ ते हरिद्वारचा महामार्ग , आम्ही निघालो त्याच्या १ तास आधी सुरू झाला. मुसळधार पावसामुळे खूप ठिकाणी landslide झालं होतं. अशाच एका landsliding मुळे आम्ही अडकलो . मी, अर्चना, अमेय, गिरिश आणि अमोल ते बघण्यासाठी उतरलो. काही लहान - मोठे दगड - धोंडे बाजूला केल्यावर एक मोठा दगड काढण्यासाठी सुरंग लावण्याचे ठरले. सगळ्या लोकांना लांब करण्यात आले. "गाडी में जाके बैठो " असे सांगण्यात आले. पण आम्ही धाडसी [अगाऊ] बाहेरच थांबलो. मी आणि अमेय हे सगळ Live आमच्या कॅमेरात टिपण्यासाठी म्हणून आतूर होते, आणि जरा अगाऊगिरीने पुढेच उभे होतो. बारूद भरला गेला. मग त्या JCB च्या कामगाराने आधी बिडी शेलकावली आणि मग ती त्या वायरीला लाऊन त्याने धूम ठोकली. Countdown चालू झाले. मी कॅमेरा फोकस करून उभी होते. हात कापायला लागला. आणि काही सेकंदात एक मोठा विस्पोट झाला आणि त्या दगडाचे तुकडे उडाले. त्या क्षणी घाबरायला पण वेळ नव्हता. आम्ही धूम ठोकुन समोरच्या bus मधे चढलो. सगळ्यांची धावपळ झाली. त्या क्षणी मजा वाटली पण आता तो video परत बघताना त्याच गांभीर्य जाणवते. त्यात १५ ऑगष्ट ला माझ्या आईचा वाढदिवस. अशा दिवशी उसणे धाडस करायला नको होते. पण असो ... मजा आली, हे मात्र १०० टक्के खर. रस्ता सुरू झाल्यावर आम्ही निघालो आणि हरिद्वारला पोहचलो. भारतातल्या निसर्ग वरदानाला दारिद्र्याचा आणि अस्वस्छतेचा एक भयंकर शाप आहे. हरिद्वार station हे त्यातल एक उदाहरण. गंगेच अस्तित्व लाभलेल असताना station मधे दारिद्र्याची आणि गलिच्छ लोकांची गर्दी. अख्खे station म्हणजे शौचालय असल्यासारखा सगळी कडे वास मारत होता. त्या लोकांच्या भुकेल्या कुत्रां कुत्र्यांसारख्या नजरा. त्या station वर ३-४ तास कसे घालवले हे गंगेलाच ठाऊक. गंगा मात्र त्या वेळी मला एका असहाय नदी सारखी वाटली. खरच गंगा मैली हो गई! दिल्लीला जाणारी train आली आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.


दिवसदिवस आठवा - १६ ऑगस्ट २००८

सकाळीसकाळी साधारण ९.३० (7.30) ला आम्ही दिल्लीला पोहचलो. नवी दिल्लीला जाण्यासाठी आम्ही मेट्रो पकडली. Clock room मधे सामान टाकून आम्ही दिल्ली भटकंतीला निघालो. राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटला जाऊन आलो. मी हरिद्वार, दिल्ली ह्या दोन्ही ठिकाणी दहा एक वर्षांपूर्वी जाऊन आले होते. पण मित्र - मैत्रिणींबरोबर जाऊन मजा आला. संध्याकाळी ४.३० ला राजधानीतून मुंबईला निघालो. UNO खेळून आम्ही झोपी गेलो.


दिवसदिवस नववा - १७ ऑगस्ट २००८

सकाळीसकाळी साधारण ९.३० (8.30) ला आम्ही मुंबईला परतलो. मी एकटीच मुंबईची असल्यामुळॆ सगळ्याचा निरोप घेऊन मी परतले ते ह्या ट्रेकच्या चांगल्या अशा आठवणी घेऊन.


थांबा ट्रेक आजून संपला नाही आहे.

आम्ही ३१ ऑगस्ट ला पुन्हा भेटले. 'Prize Distribution' साठी.
१。 अमेय जांबेकर - उत्कृष्ट मॅनेजमेंट
२。 शर्वाणी खरे - Photography (First prize)
३。 सैरब मोघे - Photography (Second Prize)
४。 विनोद अलाट - a. Best entertainer b. Best Captions for the photograph (only nominee)
५。 मानसी मोघे - Best UNO player
६。 गिरीश पेंडसे - a. Khataron Ke Khiladi b. Creating entertaining scenes
७。 रोहित ढेकणॆ - Best Trekker
८。 मुकेश चौधरी - Kya aap paanchvi fail Champu Hai
९。 नचिकेत - Best joke of the trek.


[L-R] विनोद, गिरिश, मानसी, नचिकेत, सौरब, अमय, अमोल, अर्चना, तन्मय, गैरी, रोहित, मुकेश आणि मी [photographer]

Wednesday, May 28, 2008

मीच का ?

अनेकदा आपल्या सगळ्यांना पडणारा हा प्रश्न - मीच का? तुम्हाला पण हा प्रश्न अनेकदा पडला असणारच. मी काही तुमच्याहून वेगळी नाही. त्यात माझी "मकर रास" असल्या कारणामुळे अनेकदा असे मीच का? हा प्रश्न पडणारे प्रसंग घडतच असतात. तोंडाशी आलेला घास समोरसा घेउन जातो आणि मग असहाय पणे आपण विचार करतो, मीच का? कधी हस्यास्पद, कधी Embarrassing Moments तर कधी Frustrating, Depressing moments मधे - नेहमी मीच कशी ह्या बाबतीत अडकते, मीच का? असा प्रश्न पडतोच. पण त्याचे उत्तर ब्रह्मदेवालाच ठाउक. इतर सगळ्यांच आयुष्य मस्त असताना, आपणच कसे नेहमी अडकतो? पण आपण देखिल समोरच्यांसाठी इतर असतो हे आपण विसरतो.

Blog लिहीण्याचे कारण म्हणजे करमणूक. म्हणून आपण frustrating, depressing moments बद्दल न बोलता. काही मजेशीर विनोदी घटणाच बघुयत.

मुलुंडच्या platform क्रमांक १ वर मी train ची वाट पहात उभी होते. तेवढ्यात announcement झाली,"Platform क्रमांक १ पर आने आली अगामी लोकल आज platform क्रमांक १ के बजाय platform क्रमांक ३ से रवाना होगी". मग काय... धावा... धावत धावत bridge चढायला लागले. माझ्या बरोबर १ मछली ची टोपली घेऊन १ भैया पण धावायला लागला. धावता धावता तो अडखळला आणि त्याच्या हातून मास्याची टोपली उलटी झाली. माझ्या आंगावर मछलीचं पाणी पडलं. माझ्या बाजूने चालत असलेल्या बाईच्या आंगावर तर काही मासे सुद्दा पडले. ती बाई एवढ्याने ओरडली [जैन असेल्यास तिने किती दिवस त्याबद्दलचं प्रायश्चित्त म्हणून उपास तपास केले असतील तिच जाणे.] मी जाम हसत सुटले, सवई प्रमाणे. ती बाई मात्र जाम भडकली होती, ती त्याला ओरडत होती," ये क्या किया? अब मै office कैसे जाउंगी?" तो भैया पण जरा घाबरला होत पण माला हसताना बघून त्याला धिर आला असावा. "आप train मे चढेगी तो पूरी train खाली हो जाएगी." अस म्हणून तो पण खो खॊ हसत सुटला. तस पण त्याच्यावर भडकण्यात काहीही अर्थ नव्हता. त्याने थोडी हे सगळ मुद्दाम केले होते. चालायचचं. घरी येउन २ तास आंघोळ केली. मी शाकाहारी असल्यामुळे स्वत:च्याच आंगाचा वास नकोसा झाला होता. "मीच का?" आज पण तो प्रसंग आठवला की हसू येते.

Office मधे एकदा असच झालं, मीच का? म्हणण्याचा प्रसंग आला. मी cabin मधे काम करत बसले होते एकटी. Colleague नी lunch साठी buzz केल. मी cabin बाहेर जायला निघले तर समजलं, cabin चा दरवाजा lock झाला आहे. एक चावीवाल्याला सगळी कुलुप तपासायला बोलावले होते. त्याने नेमक माझ्या cabin च lock तपासून बघताना ते lock करून तो चावी घेउन गेला. मी माझ्या कलीगला फोन लावला, तर मी miss call करते आहे अस समजून तिने तो २दा कट केला. मग एकदाचा तिने उचलला फोन. मी तिला जेव्हा सांगीतले की मैं आंदर फस गई हूँ तर ती हसायलाच लागली. वर मला म्हणते," रुक मैं आती हूँ तुझे देखने तू अंदर locked कैसी लगती है, रुकना". रुकना? त्या पलीतडे मी काय करु शकत होते? मी अडकली आहे ही news, office मधे वा~यासारखी पसरली. चावीवाल्याची शोधाशोध चालू झाली. त्या दरम्यान माला बघायला ५-६ जण आले. US च्या आमच्या office मधून Mike नवाचा एक ७फुट ६ इंच ऊंच माणूस आला होता. तो आणि मी अनेकदा एकमेकांच्या बाजूला उभं राहून एक्मेकांना complex देत असू. तो सुद्धा आला मला बघायला. जस काही मी पिंज~यातला प्राणी आहे. Mike मला म्हण्तो कसा," You are looking like a rabit in a huge lion's cage". पिंज~यात्ल्या प्राण्यासारखी मी असाहाय दिसत होते.

मीच का??????????

Wednesday, March 19, 2008

तोरणा - प्रचंडगड

तोरणा - प्रचंडगड (७ र्माच - ९ र्माच २००८ )

तोरणा - Much Awaiting Trek
१६४६ साली वयाच्या १६व्या वर्षी महाराजांनी तोरणा गड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. असा समज आहे, की त्यामुळेच त्याचे नाव तोरणा पडले. पण खर तर ह्या गडावर तोरण नावाची पुष्कळ झाड असल्या कारणाने त्याच नाव तोरणा पडल आहे. महाराजांनी त्या गडाचा प्रचंड विस्तार पाहून त्याचे नाव 「प्रचंडगड」 ठेवले.

तोरणा काही न काही कारणाने माझा नेहमी रहात होत. तो ह्या खेपेला पूर्ण झाला. जाम मजा केली. एक ९ वर्षाची चिमुर्डी केतकी आमच्या बरोबर होती. केतकी वय वर्ष ९ आणि आपटे काका वय वर्ष ५५, सगळ्यांना लाजवतील असे चढत होते. केतकी माझ्या बरोबर कधी चालायला लागली माहित नाही, पण मग चढताना आणि उतरताना ती मझ्या बरोबरच होती. "चल आपण सगळ्यांच्या पुढे जाऊया, ह्या दादाच्या पुढे जाऊन मग थांबुया हे असले प्रोत्साहन कारक वाक्य नंतर मालाच भारी पडले. ती चिमुर्डी थांबायलाच तयार नाही.

तोरणा तसा सोपा असला तरी त्याचा प्रचंड विस्तार आहे.

सुरवातीलाच कडा चढाईने ह्या गडाची सुरवात होते. मार्च महीन्यात सर्वत्र चुक रान पसरल्यामूळे हिळवळ तशी नाहीच. धकून भागून आम्ही वर पोहोचलो. ह्या सगळ्यात भर म्हणून की काय तोरण्या ला वर्ती जे मंदिर आहे, त्याचे काम चालू होते, त्यामुळे सर्वत्र सिमेंटच सिमेंट होते. सगळ्यांनी बाहेर वरांड्यात सोपण्याचा विचार आला. आम्हा मुलिंना मात्र त्या सिमेंट मधे आमच्या Sleeping bags टाकून झोपावे लागले. मुलिंनी बाहेर नको, रात्री खूप थंडी पडते, Safety च्या द्रुष्टीने ते बरोबर नाही... असे अनेक सल्ले मिळाले. असो....

Difficulties always come from all side अस म्हणतात ते काही खोट नाही. काही कारणामुळे, काही चुकिच्या calculations मुळे ७-८ जणांना पुरेल एवढेच जेवण आमच्या कडे होते, आणि आम्ही होतो आंदाजे २०-२२ जण. आपटे काका, पाटकर काका, केदार आणि त्यांची मुलगी केतकी ह्यांना पहीले जेवायला दिल. नशीबाने काही मंडळी रात्री गड सढून येणार होते. त्यांना ताबडतोप phone लावण्याचे प्रयंत्न झाले. एकदाचा तो लागला, नशिबाने ते hotel मधे dinner घेत होते. लगेच parcle आणयला सांगीतले. ३घा जणांच्या Instant food मधे आम्ही पाच मुली जेवलो. आम्हाला ते पुरल हे सांगायला नको. मुलगी असल्याचे अनेक फायदे असतात त्यातला हा एक. रात्री चढून येणा~या मंडळींना येयला बराच वेळ लागणार होता. पोटात तर सगळ्या मुलांच्या आग पडली होती. शेवटी पप्पूने एक नविन dish चा शोध लावला "पापड कोशिंबीर". आमच्याकडे बरेच पापड होते व काही tamatoes, onions, फरसाण असे काही सामान होते. मग काय, झाली कोशिंबीर तयार. पाव-भाजी ज्या चविने खावी तशी ती कोशिंबीर मुलांनी खाल्ली, बिच्चारे :( नंतर आजून एका dish चा शोध लागला. सकाळच्या Pack-lunch मधे काही जणांनी "रावण पिठले आर्थात श्रिखंड" आणल होत. मग Apple श्रिखंड dish चा शोध लागला. माला तो प्रकार बघूनच कसतरी झाल. "अग खाउन बघ... कसली मस्त teast आहे" अस म्हणत बल्लुने माला एक फोड श्रिखंड लाउन खायला दिली. खर संगायच तर काहीही चव नव्हती त्याला. "हू! पोट भरल्या चा परीणाम, म्हणून तुला त्याची चव लागत नाही... कदर नाही" इती बल्लू. खरच भुकेला कोंडा आणि निजायला ढोंडा.

रात्री साधारण १.०० ला बाकीची मंडळी वर पोहोचली. मग सगळे ताव मारत बिर्याणी जेवले. तो परीयंत आम्ही मुली झोपी लेलो होतो, गाड. ट्रेक म्हंटल की अश्या छोट्या गोष्टी घडायच्याच. चालायच........

पाहाटे कोणाच्या तरी घोरण्याने माला जाग आली. आपटे काका सवई प्रमाणे आधिच उठून चहाच्या तयारीला लागले होते. काका ५मि. नंतर उठते अस म्हणून माझा जर डुलकी काढण्याचा विचार होता. पण घोरण्याचा आवाज मंदिरात घुमत होता. सगळयांचीच झोपमोड होत होती. आपटे काका हुशार, त्यांनी चालताना हळूच वाकून त्या घोरणा~या माणसाला हातानी हलवल्या सारख करुन नमस्कार केला. तो माणूस दचकून जागा झाला,"काय, कोण?" काकांनी तेवढयाच शांतपणे उत्तर दिल," Sorry! पाय लागला होता". आम्ही ओठ दाबून हसत होतो.

आजून एक आठवण म्हणजे - मी आणि बल्लू रात्री ९.३० ला पाणि काढायला म्हणून तळ्यावर गेलो. पोटात भितीचा गोळा होताच. बल्लू पाणि काढत असताना मी Torch दाखवत उभी होते. पाणि भरून आम्ही वळालो आणि माझीच एवढी मोठ्ठी सवली पडलेली बघून मी घाबरले. केस विखूरलेले, त्यात ते curley आणि मी केवढी - माझी सावली केवढी.... आधीच तो तोरणा गड, भिती असतेच. भकास आणि खूपसा Haunted वाटणारा गड आहे हा. पाणि घेउन आम्ही निघालो. मी आजू-बाजूला कोण आहे का बघायला म्हणून torch फिरवत होते आणि प्रकाश अचानक एका water pump वर पडला. मी आणि बल्लू दोघेही घाबरलो. १मि समजलच नाही काय आहे ते. समजून पण फार काही भिती गेली नाही. बल्लू माला म्हणाला," शर्वाणी चल आता पटापट" आणि आम्ही सुटलो ते थेट मंदिरात येउन थांबलो.

जाम धमाल आली... प्रतेक ट्रेक चा आठवणी आणि अनूभव वेगळे.

Tuesday, March 18, 2008

रायगड रौप्यमहोत्सव

रायगड रौप्यमहोत्सव
१ फेब्रुवारी २००८ - ३ फेब्रुवारी २००८


「चक्रम हायकर्स」 चा रौप्यमहोत्स्वी सांगता सोहळा समस्त दुर्गप्रेमींच्या रायगडावर पार पडला. एकुण १३० चक्रम लोकांनी रायगड सर केला. पण सर केला तो मात्र ५ वेगवेगळ्या मार्गानी. चित्त दरवाजा, रायगड प्रदक्षिणा करून चित दरवाजातून वर आले [ह्या सोप्या वाटा], भवानी टोक, होरकणी बुरुज आणि वाघ दरवाजा [ह्या अवघड वाटा]. मी हिरकणी वाटेने गेले. मोठी वयस्कर मंडळी आणि लहान १ ते ४ वर्षाची मुल व त्यांचे पालक मंडळी Rope way नी गडावर गेली. हा ट्रेक केवळ चक्रम लोकांन करीताच होता. चक्रम चे members आणि चक्रम बरोबर खूप ट्रेक केलेली मंडळी.
चक्रंम मधे अनेक चांगले ट्रेकर्स - climbers आहेत. आणि त्यांच्या जोडीला आहेत सर्वाचे लाडके "आपटे काका". गड बघायला जयच तर आपटे काकांबरोबरच. ते स्वता: उत्तम ट्रेकर असून त्यांचा गड, दुर्ग, लेण्या ईत्यांदीवर प्रचंड आभ्यास आहे. वय वर्ष ५५, पण आपल्याला लाज वाटावी एवढा stabina. आम्हि गमतीने नेहमी म्हणतो, आपटे काका बहूतेक लहानपणापसून च्यवनप्राश खात असणार. महाराजांबद्दल बोलताना, त्यांचा ईतीहास सांगताना ते अगदी तल्लीन होऊन जातात आणि ऎकणारा श्रोतागण रमुन जातो. गड, दुर्ग नुसता बघताना जेवढा भकास वाटतो तेवढाच त्या ठिकाणी ऊभ राहून गडाचा ईतीहास, गडाची माहीती, गड विशीष्ट पद्दतीत बांधण्या मागच कारण हे एकताना खरच तो गड जीवंत होऊन आपल्याशी संवाद साधतो. ह्यावेळी सुद्दा काकांच्या मुळे रयगडाला जाग आली. राज्यांच्या दरबारात उभ राहून इतीहास ऎकण्यात सगळे भान हारपले आणि एकच जल्लोश झाला, महाराजांना सलामी देण्यात आली, " गोब्राह्मण प्रतिपालक, प्रौढ प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय"

रायगड मोहीम अगदी ठाताची होती. सगळे वेगवेगळ्या मार्गा वरुन रायगड सर करुन आले आणि मग काय विचारता, १३० चक्रम एकत्र आल्यावर चक्रम पणा, जल्लोश आलाच. रात्री काही चक्रम ग्रुप चे जेष्ठ आणि श्रेष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. आमच्यातल्या काही जणानी नंतर पोवाडे म्हणून, गोंधळ घालून, न्रुत्य करून एक जल्लोश केला. बाजा, पेटी, ढोलकी ची साथ आर्थातच होती.


रायगडाची मोहीमेला अप्रतिम!!! हा एकच शब्द...


काकांनी सांगीतलेली गडाची थोडक्यात माहिती व गडाचे वैशिष्ठ:

१. राणी वसा - पारंपारीत समजूत - रायगडावर सहा महाल आपल्याला दिसतात, त्याला राणीवसा म्हणतात. महाराजांना जरी आठ राण्या असल्या तरी, रायगडाच्या रचने वेळी सईबाईंचा म्रुत्यू झाला होता व चारच राण्या त्यावेळी गडावर होत्या. चार राणीवसा एकमेकांना आतून जोडले आहेत. आत दोन झोत आपल्याला दिसतात - एक बैठकिची जागा आणि ह्या चित्रात जो चवथरा दिसतो आहे, तेथे सुंदर वाडा व आत राणीच्या सोइसाठीच्या सगळ्या वस्तू असाव्यात असा आंदाज आहे. Photo मधे जे पलीकडे तोन दरवाजे दिसत आहेत ते आहेत त्या काळातली सैचालय / Toilets. टोपली संडास सारख बांधकाम आपल्याला येथे बघावयास मिळते. त्या काळात कशी सोय होती सांगण कठीण आहे. त्याकाळात १८ कारखाने व १२ महाल ही सांकल्पना होती. त्यापेकी हे ६ महाल असण्याची शक्यता आहे.
Controversy: त्यात समजा हे सहा महाल राणीवसा असतिल तर मग त्यात स्नानग्रुह हे असलच पाहीजे, जे आपणांस येथे आढळत नाही. त्यामुळे हा राणीवसाच आहे का राजांच्या प्रधानांचे व इतर कसले वाडे अहेत ह्यावर मतभेद आहेत.

२. कैद खाना / धान्यकोठार - राणीवसा च्या समोर एक मोठ तळघर आहे. २०-२५ फ़ुट खोल अस हे तळघर खूप प्रसस्त आहे. काही तद्यांच्या प्रमाणे ते कैद खाना आहे. पण परत प्रक्ष्न तोच मनात येतो, राणीवसाच्या एवढया जवळ कैद खाना कसा? काही तद्यांच्या मते, ती जागा धान्या कोठार असावा. पण मग त्या जागेची रचना पावसाच्या द्रुष्टीने योग्य वाटत नाही.

३. अष्ट प्रधान वाडा - राणीवसेच्या समोर पण थोडस खालच्या बाजूला अष्ट प्रधानांचे मोडक्या अवस्थेत असलेले आठ वाडे दिसतो. आता मोडकळीत आलेल्या ह्या वाड्यांना बघून त्याच्या विस्ताराचा आंदाज करता येतो. चित्रात दिसत असल्या प्रमाणे प्रतेक वाडा प्रशस्थ आहेत. महाराजांच्या सेवेत असलेल्या खास लोकाच्या साठी केलेले हे वाडे. त्या काळात मात्र ह्या वाड्यांची शान काही ओरच असेल नाही?

. राज सभा / सिंव्हासन - राजांचा राज्याभिशेक झाला ते सिंव्हासन रत्नजदीत सिंव्हासन होत. आता आपण बघतो ती मेघडंबरी. ह्या जागेच वैशिष्ट म्हणजे, एकूण ५००० माणस ह्या दरबारात मावतिल एवढी प्रचंड जागा आहे आणि कोणत्याही कोप~यातून किणीही कितीही हाळू आवाजात बोलल तरी ते महाराजां परीयंत पोहचत. महाराज आसनावरून जे काही सांगत असत, बोलत असत ते, समोर उभा असलेल्या ५००० - ६००० लोकांना सहज ऎकू येत असे, कोणतेही साधन न वापरता. जरा जरी त्या जागे पासून दूर गेलात तरी ते शक्य नाही. त्या काळात अश्या जागेची निवड करणे खरोखरच किती आवघड होत. ह्यावरून आपल्याला त्या काळातील विदवत्तची जाणीव होइल. ज्या दिवशी महाराझांचा राज्याभिशेक झाला तो दिवस पण तसा खासच. त्या दिवशी सु~याचे किरण सरळ सिंव्हासनावर पडतात.

महाराजांचा राज्याभिशेकाचे तीन महत्वाचे पैलू

राज्याभिशेक - खरा राज्याभिशेक एका शाळेत झाला. त्यानंतर महाराज सिंव्हासनाधीश झाले व आलेल्या मंडळींची त्यांनी भेट घेतली. आणि नंतर देवदर्शन.

५. शिळा - महाराजांच्या म्रुत्यूची बातमी गडा बाहेर न जाण्याची दक्षता घेण्यात आली होती. महाराज गेले त्या दिवशी त्यांची द्वितीय पत्नी पुतळाबाई ह्या पाशाड्ला होत्या. १८ जून ला जेव्हा संभाजी राजे गडावर आले तेव्हा पुतळाबाईनी सती जाण्याची परवानगी त्यांच्याकडून घेतली. त्यांच्या स्मरणार्थी रायगडावर त्यांची सतिशिळा बांधली आहे. आज मात्र त्या सैभग्यावतीला शिरकाई मंदिरा मागे ठेवण्यात आले आहे.

. बाजारपेठ - राजगडावर प्रचंड वसाहत रहात असे. त्यामुळे बाजारपेठ बांधन्यात आली आहे. प्रचंड मोठी आशी ही बाजारपेठ आहे. पूर्वीच्या काळी मावळे घोड्यावरून बाराला जात असवी, कारण बाजारपेठेची उंची लक्षात घेता, पाई चालणा~या लोकांना वस्तू दिसण शक्या नाही.

Controversy: गडावर एअवढी मोठी बाजारपेठ असण शक्य नाही असे काही लोकांचे मात आहे. महाराजांना लोक गडावर भेटायला येत असत. ही त्यांच्या रण्यासाठी बांधलेली नगरपेठ आहे असाही एक समज आहे.

७. अष्ट कोनी स्तंभ / Balcony : फ़ोटोत दिसत असल्या प्रमाणे अत्यांत कलाकुसरीचे असे हे स्तंभ आहेत. महाराज्यांच्या काळात ते पाच मजली असल्याचा आंदाज आहे. येथे बसून राण्या बाजारपेठ व मैदानात चाललेले खेळ बघत असे. स्तंभात आपल्याला प्रतेक भिंतीवर वरच्या बाजूला छिद्र दिरतात. तेथुन पूर्वीच्या काळी ठंड पाणि वहात असे. त्याच्या खली तेलाचा दिवा ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. त्या दिव्याचा प्रकाश पाण्यात पडून सुंदिर प्रकाश पडत असे. खिडक्यांना सुंदर वाळ्याचे व मखमलाचे परफ़े लावलेले आसायचे. आज ह्या पाच मजल्यांपेकी १-२ मजले मोडक्या अवस्थेत अपल्याला बघायला मिळतात.

८. ह्या व्यतिरीक्त महा दरवाजा, चोर दरवाजा असे अनेक ठिकण आपल्याला बघायला मिळतात.

प्रतेक माणसाने रायगड आयुष्यात एकदा तरीक रावाच. ज्यांना ट्रेकिंग करण शक्य नाही त्यांच्या साठी Rope-way ची सोय आहेच.


Wednesday, February 06, 2008

चहा...

" चहा पानम मनुष्याणांम प्रथमंम बुद्धिलक्षणंम"

चहा... हा एक छोटासा, पिटूकला शब्द पण केवढा मोठ्ठा दिलासा देऊन जातो. अस म्हणतात की पाण्याला कोणताही परीयाय होऊ शकत नाही... मी म्हणते, पाण्या सारखच चहाला सुद्दा दुसरा परीयाय नाही. चहा हा हवाच.

फुक्या लोकांची जशी आपापसात पटकन मैत्री होते की नाही, तशीच चहा शोकिन लोकांची पण मैत्री पटकन होते. दोन फुके office च्या break मधे बाहेर भेटतात आणि त्यांची आपापसात चटकन मैत्री होते. तशीच मैत्री चहा पिणा~यांची सुद्धा होते.

"चहा ची वेळ झाली की चहा पाहिजेच" असे शब्द कानावर पडले की मन भरून येत. मग दोन चहा बेवडे टपरी शोधतात. मी अनेक अश्या चहाच्या टपरींवर जाऊन चहा चा भुरके मारुन स्वाद घेतला आहे.

चहा आवडणाऱ्या लोकांच्या शरिरात एक नैसर्गीक घड्याळ असत, चहा ची वेळ दाखवणार. चहा ची वेळ झाली रे झाली, घडाळ्याचा गजर वाजायला लागतो
आणि अपोआप पावल चहा च्या टपरी च्या दिशेला वळतात. तो चहा चा गजर चहा घेतल्यावरच शांत होतो.

चहा चे तसे अनेक प्रकार आहेत. Black Tea, WhiteTea, Green Tea, Oolong Tea वगैरे वगैरे. चहा कोणताही असो, तो उत्तम बणवण्याची कला असते.

उत्तम चहा कोणता? तर.... चहाची टपरी काढल्या दिवसापासून, म्हणजे ज्या फडक्याने पहिला चहा गाळून चहा टपरी चे उत्तघाटण झालेल असेल, त्याच फडक्याने अनेक वर्ष सतत्याने चहा गाळलेला चहा म्हणजे उत्तम चहा. वर्षानू वर्षे ची अविट गोडी असते त्यात. प्यायला आहात का कधी असा चहा. प्यायला असाल तर त्याची गोडी तुम्हाला सांगायला नको. आणि नसाल तर हा लेख वाचून लगेज मागवा बघू बाजूच्या टपरी मधुन चहा... म्हणजे मग चहा चे घोट घेत घेत उरलेले सगळे ब्लोग वाचता येतील, कस.....................

Wednesday, January 16, 2008

देहेणे - रतन

३ नद्या, अत्यंत अरुंद वाट, खोदलेल्या वेड्या वाकड्या पाय~या, प्रचंड चढ आणि प्रचंड चाल असा ट्रेक म्हणने देहेणे- रतन. ३ नद्या वगळल्या तर बाकी कशाचिही माला भिती वाटत नाही. पण पाणि म्हंटल की हात पाय ठंड पडून कापायला लागतात. पाण्याचा प्रवाहाला जोर होता. मी सुदिप ला धरुन नदी cross करायला लागले. बिचारा सुदिप माला समोर धरुन नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेला चालत होत. मध्यापरियंत सगळ ठिक होत. मध्यावर आल्यावर सुदिप मला म्हणतो," शर्वाणी ताई, तुला एक गम्मत सांगू? माला सुद्धा पोहता येत नाही". दोन मिनिट ब्रह्मांड आठवले. तोंडातून एकच उद्गार निघाला,"काय"?



नद्या cross करण पुरेस नव्हत की काय कोण जाणे, उतरताना आमची आणि एका गटाची सुकामूक झाली. ज्या काही जणांकडे जेवणाच सामान होत, ते आणि आम्ही वेगळ्या मार्गावरुन उतरलो. शोधासोध झाली पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नही. ते आम्हाला भेटले ते jeap पाशी. सकाळी चाहा आणि थोडा नाष्टा ह्यावर आम्हाला तो कठिण ट्रेक उतरायला लागला. जेवण मिळाल ते संध्याकाळी उशीरा. पोटात वाईट आग पडलेली जाणवत होती. Main Road येई परियंत मी तग धरुन बसले. Main Road ला लागलो, समोर jeap आणि हारवलेले मित्र दिसले आणि माझी सहनशक्ती संपली, मी सस्त्यातच बसले. १०-१५ मिनीट तशीच बसून राहीले.

शेवट मात्र गोड झाला. Lunch ला झक्कास आंरसाचा बेत होता. आम्हाला तो Dinner ला मिळाला एवढाच फरक.

Tuesday, January 15, 2008

लहान पणी काढलेली काही चित्र

लहाणपणा पसून चित्रकला हा माझा आवडीचा विषय. Biology त्यामुळेच अर्थात माला आवडयचा. पण गम्मत अशी असायची की, मी heart, kidney, frog ह्यांच चित्र काढण्यात एवढी गुंतून जात असे की, चित्रा बरोबरच theory पण लिहायला लागते हे लक्षात येईपरीयंत उशीर झालेला असायचा. माझ्या चित्राला very good remark कायम असायचा आणि theory ला .... जाऊदे. सांगायचा मुद्दा असा... मुलीला heart कस असत, त्यातले भाग ईत्यादींची माहिती नसल्याशीवाय ती चित्र काढेलच कस? एकदा हे उत्तर मी biology teacher ला दिल आणि नेहमी प्रमाणे मुकाट्याने जाउन वर्गा बाहेर उभी रहीले.

शाळेत history मधल्या महातम्यांचे चेहरे रंगवणे हा सगळ्यांचा आवडतीचा उद्योग. माझाही होता. फक्त मी गांधींना सुट-बुट आणि हातात सिगरेट देण्याऎवेजी, गांधींना गांधींच ठेउन त्यांच व्यंगचित्र करत असे आणि जोडिला त्यांच्या मनतले विचार. व्यंगचित्र काढणे हा अत्यांत गम्तिशीर विषय असला तरी त्या माधमातून गांभिर विशय मिष्किल पणे दाखवणे ही एक कला आहे.


एकदा मी आमच्या एक teacher च व्यंगचित्र फळ्यावर काढले होते. त्या मगे येउन कधी उभ्या राहील्या समजलच नाही. अत्यांत कडक, खडूस म्हणून ओळखल्या जाणा~या त्यांनी, चक्क माला शाबासकी किली, त्या वेळेला एवढ गहीवरुन आल म्हणून सांगू... असाच उदार पणा त्यांनी marks देताना दाखवला असता तर? Teacher ची लाडकी असण हा नशिबाचा भाग असतो. असो....


मी history books मधे काढलेली चित्र पण आज History झाली आहेत. त्या काळात काढलेली काहीच चित्र माझ्या कडे आहेत, पण ती व्यंगचित्र नाही आहेत. १-२ चित्रच आज माझ्याकडे आहेत ती येथे टाकते.



Sunday, January 13, 2008

कारकाई...

कारकाई... ५ऑगष्ट २००७


कारकाईची मनात भरलेली आठवण म्हणजे, करकाईला अनुभवलेल वादळ. मी अनेक ट्रेक केले आहेत, पण कारकाईला जे वादळ अनुभवले ते अवीस्मरणीय.

कारकाई हा अमचा तसा पायलेट ट्रेक होता. आम्ही पहील्यांदाच जात होतो आणि रसत्याची जुजबीच माहिती होती. पावसाळ्याचे दिवस, तुफान पाऊस आणि त्याच्या जोडिला वादळ. टेकडीवर तर अक्षरशा: ढकलले जात होतो. उतरताना पण वाट घसरडी झाल्यामुळे सगळ्यांची वाट लागली होती. उतरताना आम्ही हरीचंद्रच्या वाटेनी उतरली [धरणाची वाट] . धरणावरुन तर एकट्याने चालण शक्याच नव्हत. आम्ही अक्षरशा: साखळी करुन चालत होतो तरी साईडला ढकलले जात होतो. कानाला वा~याचा फटका आणि पावसाचा मारा. डोळ्यांत तर पावसाच्या पाण्याचे बाण मारावे तसे बाण बसत होते. एवढा वादळात फोटो काढण पण शक्यच नव्हत, तरी काही जणांनी फोटो काढण्यासाठी छत्र्या आणल्या होत्या, त्यामुळे थोडे तरी फोटो काढले गेले. Enjoy...
















अप्रतीम असा निसर्ग, तुफान असा वारा, जोरदार पाऊस, घसरडी वाट आणि धमाल.

Thursday, January 10, 2008

Waterfall Rappelling...

Waterfall Rappelling...
माला तशी पाण्याची भिती वाटते. मुळात ३-४ वेळेला पोहायला शिकायला गेले असून पोहता न येणारी मी एकटीच असीन. ट्रेक, Climbing करताना तशी माला भिती वाटत नाही. काळजी घेणारे मित्र असतातच. पण मी Waterfall Rappelling करायच ठरवल. मनात जाम भिती होती पण पाण्याची भिती पण कायमस्वरुपी घालवायची होती. आणि Waterfall rappelling हा माध्यम मी निवडला. त्याला कारण पण आहे, Rappelling करताना rope, Harness चा सहायाने ते केले जाते. तशी पडण्याची काहीच भिती नसते.

काही वर्षा पूर्वी मी पहील्यांदा Waterfall Rappelling केल. [वरील photo गेल्या वर्षीचे आहेत.] Bhivpuri station जवळ एक सुंदर waterfall आहे. आम्ही २० जणांचा ग्रुप गेलो होतो. काही Leadersनी एक दिवस आधी जाउंन तयारी केली. माझ्या सारख्या पहिलांदाच Rappelling करणारे अनेक होत्या. Leader नी सुरवातीला प्रात्यक्षिक करुन दाखवले. वघुन तस सोप वाटल. काही जाणाना करताना बघून अजुन जारा धिर आला. Dukes nose ह्या ठिकाणी Raplling करून आलेली मुलगी Waterfall Rappelling करायला गेली. तिच्या साठी हे अतिशय सोप. पण मघ्यावर आल्यावर तिला काय झाले काहीच समजलेच नाही. ती मधेच अडकली ते एक दिड तास. Waterfall च्या जवळ एक ठिकाणी जाउन बसली ते उठायच नावच घेइना. बर ती तशी अनुभवी असल्यामुळे तिला आधी Rappelling करायला सांगितले जेणेकरुण Leadersना जरा तयारी करायला वेळ मिळेल. शेवटी तिला उचलून खाली आणायला लागले.
तिला बघुन मात्र माला भिती वाटली. आधिच पाण्याची भिती होतिच. माझा turn आला. मी rope वर भार देउन position घेतली. पहिला पाय खाली टाकला आणि पडले. नाका - तोंडात पाणि गेले आणि मी गुदमरले. परत वर आले. सुदिप ला म्हणाले, नाही जमणार माला, मी नाही करत. त्यानी मला instructions follow करायला सांगितल्या. मी मनाची तयरी करुन परत निघाले आणि परत घसरले. Rope, Harness असल्या मुळे तशी भिती नासते. पण पाणि नाका गेल्यामुळे जीव गुदमरला. परत वर आले. :-( . २-३ मिनिट थांबले आणि परत एकदा ना घाबरता प्रयत्न करातच ठरवल. परत Position घेतली. सुदिप वरुन instructions देत होता. Rope वर balance कर. जेवढ जमेल तेवढ sitting position घे, एक एक पाय खाली टाक. मी Instructions follow करायला लागले आणि जमल....
Raplling तस अत्यंत सोपा प्रकार आहे. Rope, Harness असल्या मुळे पडण्याची तशी भिती नसते. Sitting position निट जमली की १-२ मोनीटात खाली. Waterfall Rappelling करताना, Rocks जरा निसरडे झाले असतात. त्यामुळे पायाची grip जाते आणि आपण rock वर जाउन आदळतो आणि पाणि नाका - तोंटात जाते. Leader नी दिलेल्या Instructions पाळणे तेवढ गरजेचे असते. त्यांचा खूप वर्षांचा अनुभव असतो.
ट्रेकिंग म्हटल की अनेक लोकांच्या मनात शंका येतात. अनेकांना ट्रेकिंग हा एक वेडेपणा पण वाटतो. डोंगर चढायचा आणि उतरायचा, ह्यात कसली आली आहे मजा. पण ट्रेकिंग हा एक नशा आहे. ज्याला लागला त्याला तो कायमचा चिकटतो. इथे Overconfidence सुद्धा चालत नही आणि बेफिकीरपणा तर मुलीच नाही. अपल्या बरोबर असलेल्या अनुभवी लिडरचे instructions कायम followकेले की कसलाच खतरा नसतो. And then one can explore oneself in the world of nature.

Monday, January 07, 2008

BhimaShankar

भीमशंकर एक गिरीदुर्ग. (३५००’)
रायगड जिल्हात बसलेला हा दुर्ग. हिवाळ्यात व पावसाळ्यात करण्या जोगा एक सुंदर ट्रेक.
गडावर जाण्याच्या वाटा:

१. गणेश घाट:
अत्यंत सोपी अशी ही वाट आहे. कच्च्या रस्त्याची वाट असून वर जाण्यास ६ते७ तास लागतात.

२. शिडी घाट:
दीड तासात ३ शिड्या. पावसाळ्या जाराशी कठीण वाटणारी अशी ही वाट. पण काळजी घेतल्यास कसलाही धोका नाही.

अनूभव:

माझी आवडती वाट म्हणजे शिडी घाट. भीमाशंकर ला जायच आसल्यास मी ह्याच वाटेने जाते. शेवटच्या शीडी नंतर एक Traverse वळण लागत. माला तो क्षण आजून आठवतो, अगदी काल घडल्या सारखा. शेवटची शीडी चढून मी वर गेले. Traverse पाहून जारा पोटात गोळा आला. हात पकडायला छोटीशी खाच, त्या खाचेला पकडून सावकाश पुढे जायचे. पाय ठेवायला अजून एक खाच, पण साधारण ६फुट खाली. माला हातावर लटकणच भाग होत. दोन सेकंद ब्रह्मांड आठवल. पलीकडे मंगेश उभा होताच. मंगेश अत्यंत उत्क्रुष्ट असा ट्रेकर आहे. त्याची ३वर्षाची चिमुर्डी मुलागी सुद्धा छान ट्रेकिंग कारते. मंगेशनी मला न घाबरता बिंधास्त यायला सांगीतल. मी निघाले, अर्धी वाट हातावर लटकत गेले आणि.... खाली वाकून खोल दरीत डोकावले. संपल, हात - पाय कापायलाच लागले. पहीला fall होता साधारण १५००फुट खाली. १सेकंद जाम भिती वाटली. मंगेशची ती खणखणीत हाक आजून आठवते मला. त्यानी मला बजावल होत की खाली बघायच नही. मी वाटेत थंबल्यावर त्यानी आवाज दिला, शर्वाणी Move, come on. मी जारावेळ डोळे मिटले आणि निघाले. लटकत लटकत मी पोहोचले खरी पण नंतर पलीकडे जाण्यासाठी लांब पाय टकण्याची वेळ आली. मला जेवढा लांब पाय करता आला मी केला, पण मझा पाय पुरेना. शेवटी मंगेशने एक झाडाचा आधार घेउन मला फुलासारख चक्क उचलून पलीकडे आणले. पलीकडे जाउन जेव्हा मी परत दरी बघीतली, तेव्हा जास्त भिती वाटली. पण १दा गेल्यावर भिती गेली. नंतर येणाऱ्या वर्षात मी अनेकदा भीमाशंकर केला, अणि शीडी घाटानेच केला. अप्रतीम असा अनूभव.