Monday, September 12, 2011

गणपती विसर्जन - पुणे मुंबई मधील तफावत....

मी एक अस्सल मुंबईकर. माझा जन्म, शिक्षण सगळं मुंबई मधे झालेलं. सध्या काही वर्ष मी पुण्यात स्थाईक झाले आहे. असं म्हणतात कि मुंबई चा माणूस पुण्यात adjust होऊ शकत नाही. त्याला fast life ची इतकी सवय झालेली असते की पुण्यातली शांतता त्याला खायला उठते. हे थोड्याफार प्रमाणात खरं असेलहि पण पुण्याची भुरळ एकदा पडली की पुणेकर होण्यातली मजा त्याला समजते. मुंबईत पाऊस म्हटलं की अंगावर काटा येतो तसच पुण्यात प्रवास म्हंटला की तो नकोसा होतो. मुंबईत सुविधांना पुण्याचा सुंदर वातावरणाची तोड जरी नसली तरी मुंबईचा समुद्राचा अभाव पुण्याला जाणवतो. थोडक्यात काय तर दोन्ही मध्ये चांगल्या वाईट गोष्टी आहेत. काहीतरी वाटत पुण्याची थंड हवा मुंबई ला export करावी आणि मुंबईची transportation facility पुण्यात आणावी. अर्थात हे स्वप्न आहे. फक्त स्वप्न. असो

मला अनेक जण विचारतात, "पुणे छान की मुंबई"? मुंबईत शिस्त आहे तर पुण्यात एक सुंदर इतिहास आहे. . पुण्यात मराठमोळ वातावरण आहे तर मुंबईत cosmopolitan ची विविधता आहे. आपापल्या परीने दोन्ही आपापल्या जागी छान आहेत.

एक मोठ्ठा फरक मला कोठे जाणवला असेल तर तो गणपती विसर्जनात. बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ साली पुण्यात "केसरीवाडा" सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना करून खर्या अर्थाने सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केले. गणेश उत्सव खरतर महाराष्ट्रा मधे जास्त करून साजरा केला जाणारा उत्सव आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पुण्यात त्या मुलेच की काय खर्या अर्थाने गणेश उत्सव साजरा केला जातो असं मला वाटत. मी आज मुंबईचे गणपती उत्सव आणि पुण्यातील गणेश उत्सव दोन्ही जवळून पहिले आहेत आणि म्हणून मी आज ठाम पणे हे सांगू शकते की पुण्यात अजूनही साजेसा गणेश उत्सव साजरा केला जातो. पुण्यातल्या काही गणेश मंडळांना 'धिंगाण्या' चे स्वरूप जरी आले असले तरी अजून मनाचे गणपती अजूनही आपली शान आणि शिस्त सखून आहेत.


मुंबईत कोणताही कार्य असो अख्खी मुंबई 'बॉलीवूड' च्या तलावात थिरकते. गणपती विसर्जनाचा पण तेच आहे. त्या विसर्जनाला लय असतो ताल. असतो तो नुसता धिंगाणा. एक हात वरती उचलायचा आणि कोणत्यातरी बॉलीवूड च्या गाण्यावर एक एक पाय उचलायचा की झाला dance. मग आपण गणपतीला कोणती गाणी वाजवत आहोत ह्याचा काहीही भान नाही. शीला की जवानी पासून ते मुन्नी अश्या गाण्यावर मुंबईत गणेश विसर्जन होते. लालबाग च्या राजाचा थाट मुंबईत जरी मोठ्ठा असला तरी विसर्जनाची अवस्था तीच. मधूनच मग कोठेतरी मराठमोळी फुगडी घालताना काही बायका मुली नजरेस पडतात पण एक - दोन फुगड्या झाल्या की परत एक हाताचा dance चालू होतो. मुंबईला एकाच धोरण माहिती आहे, "पैसा फेक, तमाशा देख". मग कोणताही सण असो लाखा लाखांचे फटके उडवायचे, तेवढ्याच किमतीचा गुलाल उधळायचा आणि एक हात वर करून चित्र विचित्र नाचायचे.

ह्या उलट चित्र बघायला मिळत ते पुण्यात. ढोल - ताश्या च्या गजरात गणरायाचं विसर्जन होतं. आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी कधी नव्हे ते पुणेकर शिस्ती पालन करताना मी ह्या ची डोळा ह्याची देही पहिले आहे. गणपती विसर्जनाच्या ढोल पथकाची तालीम एक दीड महिना आधी पासून चालू होते. तालीम करताना ढोलाचे स्वर कानावर पडतात आणि जणू काही ते स्वर गणरायाच्या आगमनाची वरात घेऊन येतात असं वाटते. त्या ढोल ताश्या पथकाच्या तालामिनेच वातावरण प्रफुल्लीत होऊन जाते.Ganesh Visarjan - Pune

पुण्याचे ठरलेले मानाच्या गणपतीचे आधी विअर्जन होते. ही पद्धत फार पूर्वी पासून ते आजतागायत चालू आहे. पहिला निघतो तो 'कसबागणपती' -श्री विनायक ठाकर ह्यांचा घराजवळ ही गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी तेथेच त्याची स्थापना केली. पुण्याचा ग्रामदेवता म्हणून ह्या गणपतीचा मन मोठा आहे.

दुसरा मानाचा गणपती म्हणजे 'तांबडी जोगेश्वरी'. आफ्रिकेतल्या हत्ती सारखी दिसणाऱ्या ह्या मूर्तीची मिरवणूक नेहमी चांदीचापालखीतून निघते.

तिसरा मन आहे 'गुरुजी तालीम' गणेश मंडळाचा. ह्याची स्थापना १८८७ रोजी झाली. हिंदू-मुसलमान ह्यांच्या एकी साठी ह्यागणपतीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.

चौथा मन आहे 'तुळशीबाग' ह्या गणपतीचा. श्री. खटावकर ह्यांचा हस्ते दर वर्षी ह्या तुळशीबागेलाल्या गणरायाची स्थापना केलीजाते. ह्याचा वैशिठ म्हणजे दरवर्षी ही मूर्ती fiber glass पासून बनवली जाते.

पाचवा मानाचा गणपती म्हणजे 'केसरीवाडा'. ह्या गणपती पासूनच बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ रोजी सार्वजनिकगणेशउत्सव ची स्थापना केली. पुण्यात ह्या मानाचा गणपतींचे विसर्जन आधी होते आणि मगच इतर गणेश मंडळ आपल्या मूर्तींचे विसर्जन करतात.

ह्या मानाचा गणपतींची विसर्जन मिरवणूक बघण्या सारखी असते. रस्त्याचा दोन्ही बाजूला रांगोळी काढल्या जातात. पहिला मानाचा गणपती 'कसबा गणपती' ची मिरवणूक सर्वात पहिले निघून त्याचाच साधारण . ला विसर्जन होते.

ह्या सगळ्या मानाच्या गणपतीचा विसर्जन ढोल - ताश्याच्या गजरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घडते. कोठेही गोंधळ नाही,गडबड नाही. कोठेही देवाचा नलाखाली धिंगाणा नाही. "गणपती माप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या" असे गात एक सुंदर अश्या लयबद्ध तालात ह्या गणपतींचे विसर्जन होते.

पुण्यातील ह्या मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले की मात्र मुंबई सारखा धिंगाणा येथे पण चालू होती. मग बॉलीवूडच्या गाण्यावर येथल्या पण लोकांचे पाय थरारतात. एवढ्या उत्कृष्ट ढोल - ताश्याच्या तालानंतर ही गाणी एकूण गणपती बाप्पा सुद्धा आपले सुपेवढे कान बंद करून घेत असेल हे नक्की.

Saturday, June 18, 2011

Modern वटपौर्णिमा

आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्या साठी भारतातील हिंदू सुवसिणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्रत करतात. करवाचौथ, वटपौर्णिमा अशी वेगवेगळी नाव त्याला आहेत. जशी वेगवेगळी नाव, तश्याच वेगवेगळ्या कथा ही त्याला जोडल्या गेलेल्या आहेत.


वटपौर्णिमेच्या दिवशी बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्य साठी अख्खा दिवस उपास धरतात. करवाचौथ च्या दिवशी सुद्धा बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्य साठी नीरजळी उपवास करतात आणि रात्री चंद्रर्शनानेच नवऱ्याच्या हातून पाणी ग्रहण करतात.


आपली बायको आपल्या साठी व्रत करते म्हणून काही नवरे पण त्या दिवशी व्रत ठेऊन उपास करतात. तुम्ही पण असा उपास करून आज-तक वर येण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्या नशीबात नाही. त्या साठी तुमचं अमिताभ बच्चन शी काहीतरी नात असणं जरुरीच आहे. अमिताभ बच्चन पण म्हणे जया बच्चन साठी करवाचौथ चा दिवसभर नीळजळी उपास करतो. त्याचं exclusive coverage आज-तक वर दाखवण्यात येते. पुढे अभिषेक आणि ऐश्वर्या चं लग्न झाला. मग अजून एक news चं खाद्य आज-तक ला मिळाल. हि नवी, modern सून करवाचौथ चा व्रत करणार का? आणि अभिषेख पण आपल्या वादिल्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन नीलजळी उपास करणार का? क्या हे आपका जवाब हमको भेजो YES / NO और भेज दिजीये ५८५८५८ पार". अख्ख्या भारताला सातविणारा प्रश्न असल्या सारखं ती news दाखवली जाते. असो.. त्यांच्या सुखी संसारात आपला प्रवेश एवढाच.


वटपौर्णिमा जवळ आली की हमखास एक प्रश्न मैत्रिणी एकमेकींना विचारतात. "मग काय वटपौर्णिमा चा व्रत करणार का?" मग सुरु होते टांग खिचाई. त्यातूनच मग काही मजेशीर उत्तर मिळतात.


. छे! काहीतरीच काय! मी modern मुलगी आहे, एकविसाव्या शतकातली. You know I don’t believe in this Vatpornima and all. Taking 7 rounds to that tree looks so filmy. असा म्हणणाऱ्या मुलींचा Valentine day वर मात्र विश्वस असतो. :P


. माझा नवरा पण जरका माझ्या साठी उपास करणार असेल तरच मी त्याच्या साठी उपास करीन.. अथवा नाही.


. शी सात जन्मी एकाच नवरा काय. काही चोईसे नकोका? एक जन्मी सहन करते आहे तेच पुष्कळ झाला. जन्म अशक्यच, असं दोन्ही नवरा/ बायको ची मत.


. मी ह्या वर्षी उलटे फेरे मारणार आहे. अथवा हा जन्म ७ वा असूदेत.


५. वडाला फ़ेरी मी मारते round by round, पुढच्या जन्मी हाच पती should not be found. अशी आज कालच facebook update. अजून online वटपौर्निमे चं सौशोधन झालेल दिसत नाही. कही वर्षांनी online वटपौर्निमे चं fad पण येईल. किव्हा table वटपौर्णिमा.

६. काही मुली देवाकडे असं ही मगण करतात की देवा मला जन्म हाच नवरा चालेल, पण जरा सुधारलेल्या आवृत्तीमध्ये.


. माझ्या एका मैत्रिणीने तर height केली. आपण जन्म हाच नवरा का मागायचा ह्याचा तिचा logic भन्नाट आहे. की ह्या जन्मीत्याला सुधारवण्यासाठी घेतलेली महिनात वाया जाता कामा नये. नवऱ्याला सुधारायला जन्म लागतातच. पुढच्या जन्मी दुसरा नवरामिळाला तर ह्या जन्माची आपली महिनात वाया तर जातेच पण परत पाटी कोरी असल्यामुळे पालील्यापासून नवऱ्याला सुधारायलासुरवात करायला लागते.

तुम्हीला कोणत्या पर्याय आवडला हे मला सांगण्यासाठी type करा , , , , , ६ का ७, आणि पाठवा Comment मध्ये. :-)


मुली असं म्हनातात तेथेच मुल म्हणतात, तुम्हा मुलींना व्रत वगैरे करून हाच नवरा जन्म हवा/नको असं पर्याय तरी आहे. आम्हाला जी पदरात पडेल तिलाच स्वीकारावे लागते. हा अन्याय आहे.


मुली मस्करी मध्ये काहीही बोलत असूदेत, पण आज सुद्धा मुली तितक्याच श्रद्धेने हे व्रत करतात. ह्यात modern, orthodox वगैरे कोणताही "पणा" नसतो. आपल्याला आवडणाऱ्या, आपण ज्याचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे त्याला निरोगी आणि दीर्घयुषा लाभो असं सगळ्याचबायकांना वाटत.

*************************************************************************************

वटपौर्णिमे बद्दल थोडक्यात - सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशीवडाची पूजा केली आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते.

ज्येष्ठ महिना. नावाप्रमाणेच सर्व ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा हा महिना. ऋतूचक्रातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो.हा महिना तसा गंभीर, शांत आणि संथही. ग्रीष्माची चाहूल लागलेली, आभाळ भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला,मध्येच पावसाची हलकी सर येणार्या पावसाळ्याची आठवण करून देते. उन आणि पावसाळ्याचं 'फ्यूजन' म्हणजे हा महिना. निरोपघेणारा उन्हाळा नि सुरू होणारा पावसाळा यांची गळाभेट या महिन्यात पाहता येते. अशा या स्वप्नील वातावरणाला धार्मिकअधिष्ठानही लाभले आहे.

*****************************************************************************************************************

करवाचौथ बद्दल थोसक्यात - करवा म्हणजे तोटी (spout) असलेल एक मातीच मडक आणि चौथ म्हणजे चौथा दिवस. ह्या दिवशी सुवासिणी बायका निळजळी उपास करून रात्री चंद्र दर्शनानेच नवऱ्याच्या हातून पाणी ग्रहन करून उपास सोडतात. करवाचौथ ची अशी कथा आहे की, विरावती नवची एक रुपवान मुलगी होती. तिचा विवाह एक राजकूमाराशी झाला. पहिल्या करवाचौथ चा दिवशी ती माहेरी आली आणि तिने कडक व्रत केला. पण तिची तब्बेत खराब झाली. तिला ७ भाउ होते, त्यांना तिची अवस्था बघवली नाही. म्हणून मग त्यांनी पिंपळ्याचा झाडामगून आरश्या चे प्रतिबिंब पडल. तो चंद्र अहे अस समजून विरावतीने अपल व्रत सोडल. पण लगेचच तिचा नवरा आजरी पडला. तेव्हा तिला सांगण्यात आल की तिच्या हातून करवाचौथ चा व्रत मोडला गेला आहे आणि तो तिने पुर्न केला. अश्या प्रकारे तिने तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवले.

Wednesday, May 25, 2011

Gulmohar - गुलमोहर



"गुलमोहर"
ह्या झाड बद्दल तसं फारसं कुणी लिहिलेलं मला आठवत नाही. गुल म्हणजे फुल आणि मोहर म्हणजे मोराचा पिसारा. त्याला इंग्रजीत "Flame Tree" असं ही म्हणतात. ते त्याच्या फुलाच्या रंगामुळे. गुलमोहर बहरला की आग लागल्या सारखं ते झाड दिसायला लागतं म्हणून Flame Tree असा नाव त्याला पडलं आहे.

माझं आणि गुलमोहर ह्याच पण एक नातं आहे.गुलमोहर बहरला म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी हे समीकरण ठरलेलं. एरवी-तेरावी ओसाड पडलेल्या ह्या झाडाला उन्हाळा जवळ आला की पालवी फुटायला सुरवात होते.आता लवकरच उन्हाळ्याची सुट्टी सुरु होणार ह्याची जणू ती एक चाहूल असाते.

माझ्या लहानपणी माझा मुंबईच्या घरी असंच एक गुलमोहर आमच्या सुट्टीची, आमच्या दंग-मस्तीची वाट पहात मस्त डवरायचा. जणू आम्हा सगळ्या लहान मुलांना तो खेळायला बोलवायचा. त्या झाडाचा विस्तार एवढा मोठा होता की भर दुपारी सुद्धा अंगणात त्या झाडाची सावली सर्वत्र पसरायची. त्या झाडाच्या साक्षीने मग आम्ही लगोरी, डबाइस पैस, लपछपी, डोजबोल ई.खूप सारे मैदानी खेळ खेळत असू. भर दुपारी खेळताना त्या गुलामोहाराची साथ आम्हाला असायची. आई जेवायला हाक मरे परीयंत आम्ही त्या उन्हात खेळत असू. भूक-तहान सगळ्यांचाच विसर पडत असे. ते झाड आमच्या मस्तीचा, भांडणाचा, खोडकर पणाच साक्षीदार होता.

लहान मुलांचं जसं ते लाडका होतं तसंच ते मोठ्या माणसांचा सुद्धा लडक होतं. गुलमोहराची सावली त्याना देखील हवी हवीशी वाटायची. एवढी की त्यांनी त्या झाडा खाली एक पार बांधला. निवांत त्या पारावर सोसायटी ची सभा भरायची.अनेक पक्षी सुद्धा त्या झाडाला भेट देत असायचे. अनेक अश्या पक्षांनी त्या झाडावर आपला संसार सुद्धा थाटला.

एके दिवशी आमच्या त्या लाडक्या गुलमोहरच्या झाडावर renovation च्या नावाखाली कुल्हाड चालवली. आम्हा मुलांचा आनंदालाच
कुणीतरी नजर लावावी तसं हळूहळू आमचा खेळ आणि बालपण दोन्ही संपलं.

आज मला माझ्या DSK Visha मधे गुलमोहर बहरलेला दिसला आणि परत एकदा त्याने मला माझ्या लहानपणीची जणू सहालाच घडवून आणली.