Monday, September 12, 2011

गणपती विसर्जन - पुणे मुंबई मधील तफावत....

मी एक अस्सल मुंबईकर. माझा जन्म, शिक्षण सगळं मुंबई मधे झालेलं. सध्या काही वर्ष मी पुण्यात स्थाईक झाले आहे. असं म्हणतात कि मुंबई चा माणूस पुण्यात adjust होऊ शकत नाही. त्याला fast life ची इतकी सवय झालेली असते की पुण्यातली शांतता त्याला खायला उठते. हे थोड्याफार प्रमाणात खरं असेलहि पण पुण्याची भुरळ एकदा पडली की पुणेकर होण्यातली मजा त्याला समजते. मुंबईत पाऊस म्हटलं की अंगावर काटा येतो तसच पुण्यात प्रवास म्हंटला की तो नकोसा होतो. मुंबईत सुविधांना पुण्याचा सुंदर वातावरणाची तोड जरी नसली तरी मुंबईचा समुद्राचा अभाव पुण्याला जाणवतो. थोडक्यात काय तर दोन्ही मध्ये चांगल्या वाईट गोष्टी आहेत. काहीतरी वाटत पुण्याची थंड हवा मुंबई ला export करावी आणि मुंबईची transportation facility पुण्यात आणावी. अर्थात हे स्वप्न आहे. फक्त स्वप्न. असो

मला अनेक जण विचारतात, "पुणे छान की मुंबई"? मुंबईत शिस्त आहे तर पुण्यात एक सुंदर इतिहास आहे. . पुण्यात मराठमोळ वातावरण आहे तर मुंबईत cosmopolitan ची विविधता आहे. आपापल्या परीने दोन्ही आपापल्या जागी छान आहेत.

एक मोठ्ठा फरक मला कोठे जाणवला असेल तर तो गणपती विसर्जनात. बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ साली पुण्यात "केसरीवाडा" सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना करून खर्या अर्थाने सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केले. गणेश उत्सव खरतर महाराष्ट्रा मधे जास्त करून साजरा केला जाणारा उत्सव आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पुण्यात त्या मुलेच की काय खर्या अर्थाने गणेश उत्सव साजरा केला जातो असं मला वाटत. मी आज मुंबईचे गणपती उत्सव आणि पुण्यातील गणेश उत्सव दोन्ही जवळून पहिले आहेत आणि म्हणून मी आज ठाम पणे हे सांगू शकते की पुण्यात अजूनही साजेसा गणेश उत्सव साजरा केला जातो. पुण्यातल्या काही गणेश मंडळांना 'धिंगाण्या' चे स्वरूप जरी आले असले तरी अजून मनाचे गणपती अजूनही आपली शान आणि शिस्त सखून आहेत.


मुंबईत कोणताही कार्य असो अख्खी मुंबई 'बॉलीवूड' च्या तलावात थिरकते. गणपती विसर्जनाचा पण तेच आहे. त्या विसर्जनाला लय असतो ताल. असतो तो नुसता धिंगाणा. एक हात वरती उचलायचा आणि कोणत्यातरी बॉलीवूड च्या गाण्यावर एक एक पाय उचलायचा की झाला dance. मग आपण गणपतीला कोणती गाणी वाजवत आहोत ह्याचा काहीही भान नाही. शीला की जवानी पासून ते मुन्नी अश्या गाण्यावर मुंबईत गणेश विसर्जन होते. लालबाग च्या राजाचा थाट मुंबईत जरी मोठ्ठा असला तरी विसर्जनाची अवस्था तीच. मधूनच मग कोठेतरी मराठमोळी फुगडी घालताना काही बायका मुली नजरेस पडतात पण एक - दोन फुगड्या झाल्या की परत एक हाताचा dance चालू होतो. मुंबईला एकाच धोरण माहिती आहे, "पैसा फेक, तमाशा देख". मग कोणताही सण असो लाखा लाखांचे फटके उडवायचे, तेवढ्याच किमतीचा गुलाल उधळायचा आणि एक हात वर करून चित्र विचित्र नाचायचे.

ह्या उलट चित्र बघायला मिळत ते पुण्यात. ढोल - ताश्या च्या गजरात गणरायाचं विसर्जन होतं. आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी कधी नव्हे ते पुणेकर शिस्ती पालन करताना मी ह्या ची डोळा ह्याची देही पहिले आहे. गणपती विसर्जनाच्या ढोल पथकाची तालीम एक दीड महिना आधी पासून चालू होते. तालीम करताना ढोलाचे स्वर कानावर पडतात आणि जणू काही ते स्वर गणरायाच्या आगमनाची वरात घेऊन येतात असं वाटते. त्या ढोल ताश्या पथकाच्या तालामिनेच वातावरण प्रफुल्लीत होऊन जाते.Ganesh Visarjan - Pune

पुण्याचे ठरलेले मानाच्या गणपतीचे आधी विअर्जन होते. ही पद्धत फार पूर्वी पासून ते आजतागायत चालू आहे. पहिला निघतो तो 'कसबागणपती' -श्री विनायक ठाकर ह्यांचा घराजवळ ही गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी तेथेच त्याची स्थापना केली. पुण्याचा ग्रामदेवता म्हणून ह्या गणपतीचा मन मोठा आहे.

दुसरा मानाचा गणपती म्हणजे 'तांबडी जोगेश्वरी'. आफ्रिकेतल्या हत्ती सारखी दिसणाऱ्या ह्या मूर्तीची मिरवणूक नेहमी चांदीचापालखीतून निघते.

तिसरा मन आहे 'गुरुजी तालीम' गणेश मंडळाचा. ह्याची स्थापना १८८७ रोजी झाली. हिंदू-मुसलमान ह्यांच्या एकी साठी ह्यागणपतीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.

चौथा मन आहे 'तुळशीबाग' ह्या गणपतीचा. श्री. खटावकर ह्यांचा हस्ते दर वर्षी ह्या तुळशीबागेलाल्या गणरायाची स्थापना केलीजाते. ह्याचा वैशिठ म्हणजे दरवर्षी ही मूर्ती fiber glass पासून बनवली जाते.

पाचवा मानाचा गणपती म्हणजे 'केसरीवाडा'. ह्या गणपती पासूनच बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ रोजी सार्वजनिकगणेशउत्सव ची स्थापना केली. पुण्यात ह्या मानाचा गणपतींचे विसर्जन आधी होते आणि मगच इतर गणेश मंडळ आपल्या मूर्तींचे विसर्जन करतात.

ह्या मानाचा गणपतींची विसर्जन मिरवणूक बघण्या सारखी असते. रस्त्याचा दोन्ही बाजूला रांगोळी काढल्या जातात. पहिला मानाचा गणपती 'कसबा गणपती' ची मिरवणूक सर्वात पहिले निघून त्याचाच साधारण . ला विसर्जन होते.

ह्या सगळ्या मानाच्या गणपतीचा विसर्जन ढोल - ताश्याच्या गजरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घडते. कोठेही गोंधळ नाही,गडबड नाही. कोठेही देवाचा नलाखाली धिंगाणा नाही. "गणपती माप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या" असे गात एक सुंदर अश्या लयबद्ध तालात ह्या गणपतींचे विसर्जन होते.

पुण्यातील ह्या मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले की मात्र मुंबई सारखा धिंगाणा येथे पण चालू होती. मग बॉलीवूडच्या गाण्यावर येथल्या पण लोकांचे पाय थरारतात. एवढ्या उत्कृष्ट ढोल - ताश्याच्या तालानंतर ही गाणी एकूण गणपती बाप्पा सुद्धा आपले सुपेवढे कान बंद करून घेत असेल हे नक्की.

Saturday, June 18, 2011

Modern वटपौर्णिमा

आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्या साठी भारतातील हिंदू सुवसिणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्रत करतात. करवाचौथ, वटपौर्णिमा अशी वेगवेगळी नाव त्याला आहेत. जशी वेगवेगळी नाव, तश्याच वेगवेगळ्या कथा ही त्याला जोडल्या गेलेल्या आहेत.


वटपौर्णिमेच्या दिवशी बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्य साठी अख्खा दिवस उपास धरतात. करवाचौथ च्या दिवशी सुद्धा बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्य साठी नीरजळी उपवास करतात आणि रात्री चंद्रर्शनानेच नवऱ्याच्या हातून पाणी ग्रहण करतात.


आपली बायको आपल्या साठी व्रत करते म्हणून काही नवरे पण त्या दिवशी व्रत ठेऊन उपास करतात. तुम्ही पण असा उपास करून आज-तक वर येण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्या नशीबात नाही. त्या साठी तुमचं अमिताभ बच्चन शी काहीतरी नात असणं जरुरीच आहे. अमिताभ बच्चन पण म्हणे जया बच्चन साठी करवाचौथ चा दिवसभर नीळजळी उपास करतो. त्याचं exclusive coverage आज-तक वर दाखवण्यात येते. पुढे अभिषेक आणि ऐश्वर्या चं लग्न झाला. मग अजून एक news चं खाद्य आज-तक ला मिळाल. हि नवी, modern सून करवाचौथ चा व्रत करणार का? आणि अभिषेख पण आपल्या वादिल्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन नीलजळी उपास करणार का? क्या हे आपका जवाब हमको भेजो YES / NO और भेज दिजीये ५८५८५८ पार". अख्ख्या भारताला सातविणारा प्रश्न असल्या सारखं ती news दाखवली जाते. असो.. त्यांच्या सुखी संसारात आपला प्रवेश एवढाच.


वटपौर्णिमा जवळ आली की हमखास एक प्रश्न मैत्रिणी एकमेकींना विचारतात. "मग काय वटपौर्णिमा चा व्रत करणार का?" मग सुरु होते टांग खिचाई. त्यातूनच मग काही मजेशीर उत्तर मिळतात.


. छे! काहीतरीच काय! मी modern मुलगी आहे, एकविसाव्या शतकातली. You know I don’t believe in this Vatpornima and all. Taking 7 rounds to that tree looks so filmy. असा म्हणणाऱ्या मुलींचा Valentine day वर मात्र विश्वस असतो. :P


. माझा नवरा पण जरका माझ्या साठी उपास करणार असेल तरच मी त्याच्या साठी उपास करीन.. अथवा नाही.


. शी सात जन्मी एकाच नवरा काय. काही चोईसे नकोका? एक जन्मी सहन करते आहे तेच पुष्कळ झाला. जन्म अशक्यच, असं दोन्ही नवरा/ बायको ची मत.


. मी ह्या वर्षी उलटे फेरे मारणार आहे. अथवा हा जन्म ७ वा असूदेत.


५. वडाला फ़ेरी मी मारते round by round, पुढच्या जन्मी हाच पती should not be found. अशी आज कालच facebook update. अजून online वटपौर्निमे चं सौशोधन झालेल दिसत नाही. कही वर्षांनी online वटपौर्निमे चं fad पण येईल. किव्हा table वटपौर्णिमा.

६. काही मुली देवाकडे असं ही मगण करतात की देवा मला जन्म हाच नवरा चालेल, पण जरा सुधारलेल्या आवृत्तीमध्ये.


. माझ्या एका मैत्रिणीने तर height केली. आपण जन्म हाच नवरा का मागायचा ह्याचा तिचा logic भन्नाट आहे. की ह्या जन्मीत्याला सुधारवण्यासाठी घेतलेली महिनात वाया जाता कामा नये. नवऱ्याला सुधारायला जन्म लागतातच. पुढच्या जन्मी दुसरा नवरामिळाला तर ह्या जन्माची आपली महिनात वाया तर जातेच पण परत पाटी कोरी असल्यामुळे पालील्यापासून नवऱ्याला सुधारायलासुरवात करायला लागते.

तुम्हीला कोणत्या पर्याय आवडला हे मला सांगण्यासाठी type करा , , , , , ६ का ७, आणि पाठवा Comment मध्ये. :-)


मुली असं म्हनातात तेथेच मुल म्हणतात, तुम्हा मुलींना व्रत वगैरे करून हाच नवरा जन्म हवा/नको असं पर्याय तरी आहे. आम्हाला जी पदरात पडेल तिलाच स्वीकारावे लागते. हा अन्याय आहे.


मुली मस्करी मध्ये काहीही बोलत असूदेत, पण आज सुद्धा मुली तितक्याच श्रद्धेने हे व्रत करतात. ह्यात modern, orthodox वगैरे कोणताही "पणा" नसतो. आपल्याला आवडणाऱ्या, आपण ज्याचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे त्याला निरोगी आणि दीर्घयुषा लाभो असं सगळ्याचबायकांना वाटत.

*************************************************************************************

वटपौर्णिमे बद्दल थोडक्यात - सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशीवडाची पूजा केली आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते.

ज्येष्ठ महिना. नावाप्रमाणेच सर्व ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा हा महिना. ऋतूचक्रातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो.हा महिना तसा गंभीर, शांत आणि संथही. ग्रीष्माची चाहूल लागलेली, आभाळ भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला,मध्येच पावसाची हलकी सर येणार्या पावसाळ्याची आठवण करून देते. उन आणि पावसाळ्याचं 'फ्यूजन' म्हणजे हा महिना. निरोपघेणारा उन्हाळा नि सुरू होणारा पावसाळा यांची गळाभेट या महिन्यात पाहता येते. अशा या स्वप्नील वातावरणाला धार्मिकअधिष्ठानही लाभले आहे.

*****************************************************************************************************************

करवाचौथ बद्दल थोसक्यात - करवा म्हणजे तोटी (spout) असलेल एक मातीच मडक आणि चौथ म्हणजे चौथा दिवस. ह्या दिवशी सुवासिणी बायका निळजळी उपास करून रात्री चंद्र दर्शनानेच नवऱ्याच्या हातून पाणी ग्रहन करून उपास सोडतात. करवाचौथ ची अशी कथा आहे की, विरावती नवची एक रुपवान मुलगी होती. तिचा विवाह एक राजकूमाराशी झाला. पहिल्या करवाचौथ चा दिवशी ती माहेरी आली आणि तिने कडक व्रत केला. पण तिची तब्बेत खराब झाली. तिला ७ भाउ होते, त्यांना तिची अवस्था बघवली नाही. म्हणून मग त्यांनी पिंपळ्याचा झाडामगून आरश्या चे प्रतिबिंब पडल. तो चंद्र अहे अस समजून विरावतीने अपल व्रत सोडल. पण लगेचच तिचा नवरा आजरी पडला. तेव्हा तिला सांगण्यात आल की तिच्या हातून करवाचौथ चा व्रत मोडला गेला आहे आणि तो तिने पुर्न केला. अश्या प्रकारे तिने तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवले.

Wednesday, May 25, 2011

Gulmohar - गुलमोहर



"गुलमोहर"
ह्या झाड बद्दल तसं फारसं कुणी लिहिलेलं मला आठवत नाही. गुल म्हणजे फुल आणि मोहर म्हणजे मोराचा पिसारा. त्याला इंग्रजीत "Flame Tree" असं ही म्हणतात. ते त्याच्या फुलाच्या रंगामुळे. गुलमोहर बहरला की आग लागल्या सारखं ते झाड दिसायला लागतं म्हणून Flame Tree असा नाव त्याला पडलं आहे.

माझं आणि गुलमोहर ह्याच पण एक नातं आहे.गुलमोहर बहरला म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी हे समीकरण ठरलेलं. एरवी-तेरावी ओसाड पडलेल्या ह्या झाडाला उन्हाळा जवळ आला की पालवी फुटायला सुरवात होते.आता लवकरच उन्हाळ्याची सुट्टी सुरु होणार ह्याची जणू ती एक चाहूल असाते.

माझ्या लहानपणी माझा मुंबईच्या घरी असंच एक गुलमोहर आमच्या सुट्टीची, आमच्या दंग-मस्तीची वाट पहात मस्त डवरायचा. जणू आम्हा सगळ्या लहान मुलांना तो खेळायला बोलवायचा. त्या झाडाचा विस्तार एवढा मोठा होता की भर दुपारी सुद्धा अंगणात त्या झाडाची सावली सर्वत्र पसरायची. त्या झाडाच्या साक्षीने मग आम्ही लगोरी, डबाइस पैस, लपछपी, डोजबोल ई.खूप सारे मैदानी खेळ खेळत असू. भर दुपारी खेळताना त्या गुलामोहाराची साथ आम्हाला असायची. आई जेवायला हाक मरे परीयंत आम्ही त्या उन्हात खेळत असू. भूक-तहान सगळ्यांचाच विसर पडत असे. ते झाड आमच्या मस्तीचा, भांडणाचा, खोडकर पणाच साक्षीदार होता.

लहान मुलांचं जसं ते लाडका होतं तसंच ते मोठ्या माणसांचा सुद्धा लडक होतं. गुलमोहराची सावली त्याना देखील हवी हवीशी वाटायची. एवढी की त्यांनी त्या झाडा खाली एक पार बांधला. निवांत त्या पारावर सोसायटी ची सभा भरायची.अनेक पक्षी सुद्धा त्या झाडाला भेट देत असायचे. अनेक अश्या पक्षांनी त्या झाडावर आपला संसार सुद्धा थाटला.

एके दिवशी आमच्या त्या लाडक्या गुलमोहरच्या झाडावर renovation च्या नावाखाली कुल्हाड चालवली. आम्हा मुलांचा आनंदालाच
कुणीतरी नजर लावावी तसं हळूहळू आमचा खेळ आणि बालपण दोन्ही संपलं.

आज मला माझ्या DSK Visha मधे गुलमोहर बहरलेला दिसला आणि परत एकदा त्याने मला माझ्या लहानपणीची जणू सहालाच घडवून आणली.

Sunday, February 13, 2011

जपानी भाषेतील 'Politeness' ’आदरातिथ्य’ चा उच्चांक

जपानी भाषा शिकायला लागल्यापासून त्या भाषेची कांहीं ठराविक वैशिष्ठ्ये मला समजायला लागली. जपानी भाषा शिकायला जाण्याआधी मी त्या भाषेची कांहींशी माहिती काढायला सुरवात केली. आशियाई देशात खूपदा भारतीय संस्कृतीची कुठल्या ना कुठल्या स्वरुपात छाप दिसते कां ते मी नेहमी शोधत असते. राजा अशोकाच्या मुलीने जपानच्या राजाशी लग्न करून आपली खूप संस्कॄती जपानला नेली आहे. जपानवर भारत आणि चीन ह्यांचा खूप प्रभाव असल्याचे जाणवते. भारतातील 'पोंगल', 'चैत्रगौर', 'पित्रूपंधरवडा', 'विविध मंदिरांच्या निघणाऱ्या पालख्या', 'शस्त्रपूजा' इत्यादि सारखे कांहीं सण जपानमध्ये साजरे केले जातात. तर चीनकडून त्यांनी लेखी भाषा उचलली. एवढेच नव्हे तर 'चहा' 「お茶」हे पेय त्यांनी चीन्यांकडून उचलले व जपानच्या नम्र पद्धतीत ते बसवून 'Tea ceremony' नांवाचा एक प्रकार अमलात आणला.

जपानी भाषा ऎकायला गेलं तर शिव्यांचा भडिमारच वाटतो. साधं 'तारखा' बघायच्या झाल्या तर 'त्सुईताची', 'फ़ुत्सुका', 'मिक्का', 'योक्का' 'ईत्सुक्का', 'मुईका', 'नानोका', 'योsका', 'कोकोनोका' आणि 'तोsका', अशा प्रकारे १ ते १० तारखांची नांवे. नळावरच्या दोन बायका भांडताना जे ध्वनिमुद्रण ऎकायला येते तसच काहीतरी. मी ही भाषा शिकायला लागल्याचा एक प्रसंग - नुकत्याच मी ह्या तारखा पाठ केल्या होत्या. क्लास सुटून मी आणि माझी मैत्रीण 'लेडिज स्पेशल' पकडून परतीच्या प्रवासाला लागलो. 'लेडिज स्पेशल' ट्रेन म्हणजे एक प्रकारे विविध रेडियो स्टेशने एकाच वेळी एकाच डब्यात लावली तर कसे वाटेल, तसलाच प्रकार असतो. कॉलेजच्या मुलींचा हषा, office
मधल्या बायकांच्या गप्पा आणि सण साजरे करणे, गुजराती बायकांचे डब्याच्या एका फ़र्लांगपासून ते दुसऱ्या फ़र्लांगापर्यंतचे बोलणे आणि चरणे, कानातल्या पासून dress material ते भाज्या विकणाऱ्या बयका ह्या सगळ्यांच्या रोजच्या गोंधळात डोक्याचा भुगा झाला होता. त्यात last stop ला उतरायचे असूनही दरवाजात उभ्या असलेल्या बाईशी एकीच कड्याक्याचे भांडण झाले. बाचा - बाची मधे अनेक 'ब' 'भ' शिव्यांनी उद्धार झाला. 'मराठी - हिंदी' ह्या दोन्ही संमृद्ध भाषांचा पण उद्दार झाला. 'तुमको thane उतरना है तो तुम कायको अभिसे इधर दरवाजेमे खडी है? अंदर जाके निवांत बेठोनं'. दरावरची बाई: 'अंदर कैसे जाऊ? सबको तुडाके जाऊं क्या? मैं घाटकोपरमे उतरके वापस चढताय ना. तुम कायकू tension लेती हो' अशा प्रकारे दोन मराठी बायका हिंदित भांडायला लागल्या. शेवटी असहाय होऊन मी, 'ब' 'भ' शिव्याच्या सुरात, 'त्सुईताची', 'फ़ुत्सुका', 'मिक्का' चालू केले. चेहऱ्यावर एक प्रकारचा त्रासीक भाव व 'ब' 'भ' शिव्यांमधे PhD. केलेल्यांना सुद्दा झिंग येईल असे उच्चार. आज आपल्या डब्यात एक 'भारी' व्यक्ती आली आहे असा आदर मला मिळाला. मी पण उगाचच जरा भाव खाऊन घेतला. एरवी मामला बिकट असतो.


जपानी भाषा ऎकायला एवढी भयानक वाटते तेव्हढीच ती भाषा अत्यंत नम्र भाषा म्हणून ओळखली जाते ह्यावर माझा सुरवातीला विश्वासच बसेना. पण हे खरे आहे. जपानी माणूस ज्या पद्दतीने अनेकदा 'अभिवादनास्पद' आपल्या समोर वाकतो त्यावरून त्यांच्या नंम्रतेचा अंदाज लावता येईल. आपली मराठी म्हण, 'मोडेन पण वाकणार नाही' ह्याचे जपानी भाषेत भाषांतर होणे कठीणच. ते लोक बोलताना सुद्दा बसल्या बसल्या थोडीसे
वाकतच असतात. वाकण्याचे पण बरेच प्रकार. साध डोक थोडसे वाकवले कीं ते informal अभिवादन, मित्राला करण्याजोगे. चालता चालता थोडेसे वाकले कीं अपण रस्यात भेटल्यावर जशी नजरानजर करतो तसला प्रकार. पूर्ण कमरेतून ९० अंश वाकणे म्हणजे खरा आदरपूर्वक नमस्कार. (नशीब भारताचा साष्टांग नमस्कार त्यांनी आत्मसात केला नाही). तातामी (चटई) वर तुम्ही बसला असाल तर वज्रासनात बसून मग कमरेत थोडेसे वाकणे आलच. थोडक्यात काय, कसेही वाका पण वाका. अमेरिकन (पाश्चिमात्य) संस्कृती कपडे, लग्न समारंभ आणि लग्न व्यवस्था, leave-in-relationship
घेण्यापुरतीच. पाश्चात्य देशाचा तुसडेपणा आणि friendliness त्यांना रुचला नाही आणि पचलाही नाही. कामावर boss आणि subordinate नी एकाच टेबलावर जेवणे त्यांना नामंजूरच. 'Hierarchy' हा प्रकार जेवढा जपान मधे पाळला जातो, तेवढा इतरत्र कुठेही पाळला जात नाही. Boss शी बोलताना, थोडेसे वाकून, त्याच्या उंचीपेक्षा खाली जाऊन, नजरेला नजर न भिडवता ते बोलतात.

भाषा हा एक अजून वेगळा प्रकार. 'Polite form' चे पण बरेच प्रकार. तुम्ही कुणाशी बोलत आहात, तुमच आणि त्या माणसाच पद, ह्या गोष्टीवरून क्रियापदात बदल करावा लागतो.
उदा. ジョンさんがさとさんを待つ。
जोन हा सातो साठी थांबला आहे. (John waits for Sato) असा साधा सरळ अर्थ.

पण हेच Teacher कुणा विद्यार्थ्यासाठी थांबली असेल तर -
   先生がお待ちになる。
   Teacher थांबली आहे. (Teacher wait) पण ह्यात teacher नी आपल्यावर उपकार केल्याचा स्वर असतो.

विद्यार्थी teacher साठी थांबला असेल तर -
先生をお待ちする。
   विद्यार्थी teacher साठी थांबला आहे. (I await for you, teacher) ह्यात कर्ता अपण असलो तरी teacher चा हुद्दा अपल्यापेक्षा मोठा आहे म्हणून आपण त्यांच्या साठी थांबलो, ह्यात आपलच भाग्य
असल्याचा भाव.

एवढ्यानेच हे संपत नाही... कामावर कांहीं कारणास्तव तुम्हाला घरी लवकर जायच आहे असा साधा सरळ / सोपा प्रसंग. तुम्हाला तुमच्या boss ची ह्यासाठी परवानगी घ्यायची आहे.
English मधे, "Would it be fine for me to leave early today", किंवा "Can I leave early today, please". अस म्हटल तरी ते चालत व ते polite समजल जात. पण जपानी भाषेत मात्र, 「ちょっと早く行かせていただけませんか」。अर्थात, "May I get you to let me go early" एवढ्या पातळीवर polite भाषा वापरली जाते.

「お元気ですか」。ओगेनकी देसुका? (O-genki desuka?) ज्या शब्दाला मान द्यायचा, त्याच्या मागे 'O/ओ' 'Go / गो' लागतो. वरील उदा. गेनकी म्हणजे तब्बेत / health. 'तुमची तब्बेत कशी आहे?' हा साधा प्रश्न पण गेनकी च्या मागे 'ओ' लाऊन त्या शब्दाचा प्रभाव वाढवायचा व त्याला मान द्यायचा. ह्याच उत्तर पण पदावरून बदलते. तुमचं पद श्रेष्ट असल्यास, 「はい、元気です」。(हाय, गेनकी देसु) म्हणजे, हो! मी बरा आहे अस साध सरळ. पण विचारणाऱ्या माणसापेक्षा तुमचं पद (इथे फ़क्त नोकरीतलेच पद नव्हे तए व्यवहारीक पद पण लक्षात घेतल जात) अनुसार तुम्ही वरिष्ठ माणसाला उत्तर देतना.. 「おかげさまで元気です」。(ओकगेसमदे गेनकी देसु). ह्याचा शब्दश: भाषांतर म्हणजे, "तुमच्या कृपेने मी बरी आहे".

さん / सान - सान हा शब्द, "श्री", "श्रीमती", "सौ", "कु" इत्यादी (Mr. Mrs. Miss) सगळ्यासाठी वापरतात. पण स्वत:साठी तो वापरायचा नसतो. आपले हिंदी भाषीक स्वत:ला पण 'हम' म्हणूनच संबोधतात तसला प्रकार नाही. पण जपानी माणूस दुरऱ्या देशात गेला असेल तर तो जपानी असल्याच्या अभिमानास्तव स्वत:ला ही 'सान' लावतो.

अता कालचीच गोष्ट. माझी मैत्रीण क्रांती दुभाशी म्हणून एका call वर बसली होती. तेव्हा सुरवातीला 「お世話になっております」。(ओसेवनीनत्तेओरीमासु) अस म्हणून, "मी तुमच्या सेवेला तत्पर आहे" अस आभिवादन केले. आपल्या अस्सल मराठी भाषेत न-सजेसे. एक तर त्याला इंग्रजी येत नाही म्हणून ती त्याला मदत करत होती. तरी त्याच्या ऎवजी तिने कां बरे धंन्यता मानावी? ह्या उलट आपण असतो तर, "बोंबला! अरे एवढ साध English येत नाही तुला? चायला! मला कामाला लवलस तू" अस कांहींस बोलून सुरवात झाली असती ह्यात शंका नाही.

Thursday, November 11, 2010

रुढी आणि परंपरा

असंख्य रुढी आणि परंपरा असलेला आपला हिंदू धर्म. लहान पणापसून आपल्यावर कळत नकळत त्या रुढी आणि परंपरां चे संस्कार होत असतात. काही परंपरेचें मला जितके कौतुक वाटते तितकेच अप्रुप पण वाटते.

अहनाच्या महिन्यांच्या वाढदिवसांना आई तिला ओवाळते व तिच्या डोक्यावर कापुस व दुर्वा ठेवत म्हणते, "कापुसा सारखी तू म्हातारी हो व दुर्वांसारखा तुझा वंश वाढुदे". आपल्या धर्मात जेवढा सखोल व सुक्ष्म विचार केला आहे, तसा विचार अजून कोणत्याही धर्मात केलेला नाही. कापुस कितीही झुना झाला तरी तो खराब होत नाही किंवा तो म्हातारा होत नाही. कितीही झुना झाला तरी कापसाचा उपयोग होतो, तो कधीही टाकाऊ व निरुपयोगी होत नाही, तशीच तू सुद्दा कापसा सारखी म्हातारी हो आणि तुझा जगाला कायम फायदा होऊदे. तातप~य तू सुद्दा चिरतरूण रहा. एका दुर्वा पसून अनेक दुर्वांचा जन्म होतो, तसाच तुझा वंश सतत वाढुदे. किती छान कल्पना आहे नाही. आणि त्यामागे किती अभ्यास आहे.

एक काळी टिट आपल वाईट नजरेपासून सौरक्षण करत असते. काही लोक ह्याचा अतिरेक करतात तो भाग वेगळा. ते लोक बाळाला एवढी टिट लावतात की ते बाळ अगदी कुरूप दिसायला लागत. मग त्याला नजर लागेलच कशी? मी काही वर्षापूर्वी ह्या टिट लावण्याच्या पद्दतिला हसत असे. त्याला मुर्खिपणा म्हणत असे. पण मावशी झाल्यापसून मी बदलले आहे. आपल्या गोंडुस बाळाला कुणाकुणाची नजर लागू नये असे वाटत असते. मी अहनाला आता टिटि लावल्याखेरीज कोठेही घेऊन जात नाही. आणि का कुणास ठाऊक, अहना सुद्दा टिट लावली असली की शांत असते व कधी टिट लावावयास विसरलो की ती हमखास घारी येऊन रडा रड करते. मग आई तिची द्रुष्ट काढते.

"द्रुष्ट - मिष्ट पापी चांडाळाची, भुता-केतांची, आल्या-गेल्याची, घरातल्या माणसाची - दारातल्या माणसांची -
बाहेरच्या माणसाची, पशु - पक्ष्यांची, झाडा - झुडप्यांची, किड्या - मुंग्यांची, द्रुश्य- अद्रुश्य शक्तिंची द्रुष्ट, जशी श्री कृष्णाची निघाली तशी आमच्या अहनाची निघुन जाउदे. ह्यात आपण आपल्या आजुबाजूला असलेल्या सगळ्या जीव-निर्जीव वस्तुंपासून आपल्या बाळाचे संरक्षण करत असतो. किती सुंदर कल्पना आहे नाही!
द्रुष्ट वाईटच असते अस नाही. खूप मनापसून, प्रेमाने केलेल्या तारीफेमुळे सुद्दा द्रुष्ट लागते. अता modern thinking प्रमाणे विचार केला तर आपण म्हणतो की आपण नेहमी positive vibes spread करावे. अता मला सांगा positive thinking किंवा positive vibes मिळाल्यामुळे आपल्या aura मधे बदल होतो व आपल्याला एक वेगळी प्रकारची energy मिळते हे आपण मानतो. मग आता त्या द्रुष्टीने द्रुष्ट काढण्याच्या पद्दतिकडे पहा. आपण directly, indirectly positive energy spread करत असतो. आपण एकाप्रकारे त्या बाळाल protection कवच घालत असतो. त्याच्या aura ला सगळ्यापासून रक्षण करत असतो, अस नाही का वातट.

आपल्या हिंदू संस्क्रुतित आपण लक्षीची जशी पूजा करतो तशी आपण झाडुची पण लक्षी समजून पुजा करतो. त्या मागचा हेतु हा की, लक्षी घरात आली की संम्रुद्धी जशी येते, तसच झाडू आपल्या घराची सफाई करुन घरा स्वच्छता ठेवते. म्हणुन आपण तीची लक्षी समजून पूजा करतो. शेवटी घर स्वच्छ असल्याखेरीज लक्षी त्या घरात नांदेलच कशी. लक्षीला पण प्रसन्न वातावरण आवडत अस माझी आई मला नेहमी सांगत असते. त्यामुळे घराची स्वच्छता करून घर निरोगी ठेवणा~या झाडूला सुद्दा आपल्या धर्मात स्थान आहे.

हिंदू, गो मातेची आई समजून पूजा करतात. जगात सगळ्यांना त्याच अप्रुप वाटत. मला एकदा एका जपानी माणसाने हसतच विचारले, "तुम्ही गाईला देव / आई का मानता?" आता त्याला पटेल अस आणि आपल्या हिंदू धर्माचे महत्व समजावून देणारे उत्तर देणे आवश्यक होते. मी त्याला म्हणाले, "लहान असताना आपण आईचे दुध पितो. तसेच मग मोठ झाल्यावर आईच्या दुधाला पर्याय म्हणुन आपण गाईच दुध पितो, म्हणुन आम्ही गाईला आई समजून तिची पूजा करतो." त्याला पण हे उत्तर पटल पण मग त्याचा पुढचा प्रश्न, "गाय म्हातारी झाली की ती दुध देत नाही. मग तिचा फारसा उपयोग पण होत नाही. मग गाय म्हातारी झाली की तिला तुम्ही मारुन खात का नाहीत"? बापरे, काय हा क्रुर विचार. मग मी त्याला विचारल, "तू आजून तुझ्या आईचे दुध पितोस का?" त्याला काही समजले नाही पण मग हसुन म्हणाला, "छे! आता मोठा झ्याल्यावर आईच दुध कोण पित का?" मग मी त्याला विचारल, "मग तरी तू तुझ्या आईला मारून खाल्ल नाहीस आहेस न? तसच आम्ही गाईला आई मानतो. मग तिने आपल्याला दुध देणे बंद केले तरी आम्ही तिला कस बर मारू. ती आई आहे आणि त्यामुळे कायम पुजनियच असेल". तो जपानी चपापलाच पण त्याला खरच आपल्या संस्क्रुतिची कमाल वाटली. तस त्याची पण चुक नाही. जपान हा कृषी प्रधान देश नाही. काही पिकत नसल्यामुळे सगळ्या प्राण्यांना देवाने आपल अन्न म्हणुनच ह्या प्रुथ्वी वर पाठवल आहे अशी समजूत तेथे आहे. आणि म्हणुन भारतात खूप लोक शाकाहारी आहेत व प्राण्यांची पुजा करतात ते त्यांच्या पचनीच पडत नाही.

दर दस~याला आम्ही निसर्ग प्रेमी मुंब्राला जातो आणि तिथे डोंगराची पुजा करतो. पाऊस असल्यामुळे आमच 'rock climbing' काही महीने बंद असत. मग आम्ही दस~याला त्या डोंगराची पुजा करतो व त्याला सांगतो की आता आम्ही तुझ्यावर परत चढाई करु, तर तू आमची काळजी घे! किती छान वाटत म्हणुन सांगू! आपण सकाळी ’कराग्रे वसते लक्षी करमद्दे सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनं॥ समुन्द्र वसते देवी पर्व स्तन मंडिते! विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पद स्पर्श क्षमस्व में॥" अस म्हणुन आपण पायाचा स्पर्श केल्याबद्दल / पाय लावल्या बद्दल आपल्या प्रुथ्वी मातेची माफी मागतो. तसच आम्ही डोंगराची पुजा करून त्याची आधी माफी मागतो आणि मग पुढच्या चढाई साठी त्याचे आशिर्वाद पण घेतो.

काही लोक ह्याला निव्वळ अंधश्रद्दा म्हणतील. पण विचार करता, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचे आपल्या आयुष्यातील महत्व आपल्याला ह्यातून समजते व त्यासाठी आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करतो. अश्या आणि अश्या प्रकारच्या आनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या रुढी आणि परंपरा मधे असल्याचा मला अभिमान आहे!

Wednesday, October 27, 2010

"गु" ह्या शब्दाचा जपानी अर्थ - 具を入れてください。(गु ओ इरेते कुदासाई).

माझा एक जपानी मित्र भरत फिरायला आला असताना त्याने "सुशी" हा जपानचा प्रसिद्द पदार्थ भारतात मिळतो का ह्याची चैकशी माझ्या जवळ केली. मी त्याला मराठी भाषेत शी आणि सु [शू] चा अर्थ सांगितला. पुन्हा
तो पदार्थ खाताना त्याला सु - शी चा अस्सल मराठी अर्थ अठवला नाही तरच नवल.


मागील blog मधे मी "अहो!" ह्या शब्दाचा जपानी अर्थ "अहो ऎकलत का?" ह्या blog मधे सांगीतला होता. असच आता "गु"ह्या शब्दाचा जपानी अर्थ.

एकदा मी आणि माझ्या मैत्रिणी जपानी भाषेचा आभ्यास करत होतो. Japanese CD लाऊन आमचा आभ्यास चालू होता. Exam साठीची तयारी. CD ऎकायची आणि उत्तर शोधायचे. एकदा असच आम्ही "Japanese Cooking ची CD" ऎकत होतो. त्यात एक जपानी माणूस एक Japanese dish बनवत होता. मग त्यात त्या माणसाने कोणते पदार्थ घातले, किव्हा त्याला ती dish बनवायला किती वेळ लागला असे प्रश्र्न असयचे. त्यामुळे आम्ही सगळ्या जणी कान लाऊन ऎकत होतो.

Dish ची recipe आणि क्रुती सांगता सांगता तो माणूस मधेच म्हणाला, "具を入れてください。" [गु ओ इरेते कुदसाई]. आम्ही सगळ्या जणींनी एकमेकींकडे बघीतल. मी चुकीच तर काही ऎकल नव्हत ना! अशा अर्थी हा कटाक्ष होता. पण सगळ्याच जणिंनी काहीतरी हस्यास्पद ऎकले होते. आम्ही परत ती CD थोडीशी rewind करुन पुन्हा एकदा ऎकली. पण ह्या वेळीसुद्दा सगळ्या जणींना गु ओ इरेते कुदसाई असच ऎकायला आले आणि मग हस्याचा एकच स्पोट झाला. अख्खी Japanese Dictionary मधे cooking शी संदर्भ असलेला गु चा अर्थ सापडला नाही. 具 किव्हा गु ह्या शव्दाचा खरा Japanese अर्थ म्हणजे tool. पण मग cooking मधे तसा संदर्भ लागत नव्हता. मग खूप शोधल्यानंतर गु ह्या शब्दाचा अजून एक अर्थ सापडला. गु म्हणजे "Ingredients" अश्या अर्थी सुद्दा गु वापरला जातो.

"具を入れてください。" [गु ओ इरेते कुदसाई] म्हणजे "अता त्यात ’गु’ भरा". म्हणजेच आता त्यात तयार केलेले सारण भरा. आम्ही सगळ्या जणी पोड धरून हसायला लागलो. त्यात भर म्हणजे मी पटकन बोलून गेले, "ही Japanese लोक काहीपण खातात. आपण गु बाहेर टाकतो आणि ती ते सारण म्हणून आत टाकतात. शी sss!"

अश्या अनेक गमती-जमती नवीन भाषा शिकताना घडतच असतात. ह्या blog मधे ऎवढच.

Friday, October 22, 2010

न नरे नकारातला आणि न नरे नन्ना च्या पाढ्यातला

काही दिवसांपूर्वी माझ्या काही जवळच्या मैत्रिणींना मी फोन केले. आम्ही माझ्या मुंबईच्या घरी night stay करून मजा टाकण्याचा plan ठरवत होतो. अपेक्षे प्रमाणे सगळ्याजणींनी लगेच ह्या plan ला होकार दिला आणि भेटल्यावर काय काय करायच ह्याच planning आम्ही करायला लागलो. मैत्रिणी म्हटल की त्यात अनेक स्वभावाचे, अनेक रंगांचे, विविध आवडी निवडी असलेले असे सगळे आलेच. मग त्यातच असते "खो" घालणारी
एक मैत्रिण.

आमच्या एका मैत्रिणीचेही असेच काहीसे आहे. ’न नरे नकार’ आणि ’न नरे नन्ना चा पाढा’ ह्या कोष्टकाचे रोजच्या रोज पारायण करणा~या तिने अपेक्षे प्रमाणे खो घातलाच. काही लोकांना शिव्या देऊन वाक्याची सुरवात करायची सवय असते. ’ब’, ’भ’ वाक्याच्या सुरवातीला आल्याशिवाय त्यांना मुळी काही बोलताच येत नाही. त्याच प्रमाणे माझ्या ह्या मैत्रिणीला ’न नरे नकारातला’ हे कोष्टक न वापरता मुळी बोलताच येत नाही. "नाही ग", "नको ग", "माला नही ग जमणार", "अत्ता नको ग", वगैरे वगैरे. कायम असे नकाराचे ढिंडोरे बडवत असल्या मुळे खूपदा आपल्याला न जाणवणा~या वा न त्रास देणा~या दु:खांचे ती स्मरण करून देते. ती स्वभावाने खूप चांगली आहे ह्यात वाद नाही. पण माणसाने नुसत चांगल व सरळ आसून उपयोगाचे नसते. Positive energy spread करणारे positive vibes असणे जास्त आवश्यक आहे. आपल्या आनंदात सहबागी होणारी व दु:खात आपली मदत करणारी मैत्रिण पाहिजे. दु:खात सात्वन करणारी अथवा सुखाच्या क्षणी आपल्या दु:खाची आठवण करून देणारी मैत्रिण काय उपयोग. मग हळूहळू आपण तिच्या पसून दुरावतो.

कुठेतरी ह्या नकाराची सुरवात अगदी लहान पणापसून म्हणजे अगदी आपल्या कानावर पहीले शब्द पडायला
लागल्या पसून होते असे मला वाटते. माझी भाची अहना जेव्हा आमच्या आयुष्यात आली तेव्हा पसून हे मला
प्रखरतेने जाणवायला लागले आहे. सध्या ती ७ महिन्याची झाली असून अतीशय मस्तिखोर झाली आहे. तोंडात दोन्ही हात कोंबून तिला असीम आनंद मिळतो. मग कुणितरी तिला चांगल्या सवई लागाव्यात म्हणून," अहना
तोंडात हात नाही घालायाचा, शी!" केव्हा ती रडायला लागली की, "रडायच नाहीअस, वेड्या मुली सारख" अस
म्हटल जातच. "नाही" हा शब्द आपण इतक्यांदा म्हणत असतो की मला वाटत की लहान मुल म्हणूनच शिकतात नाही म्हणायला. एकदा माझ्या वाचनात आले होते की "भरतात माणस कुठल्याही वाक्याची सुरवात आधी "नाही" म्हणजेच "NO" ह्या शब्दाने करतात.


उदा.:
१ माणुस: दादरला जायला train सोईसकर आहे का bus
२ माणुस: नाही! मला वाटत तुम्ही train नी जा. Bus नाही म्हटल तरी खूप फिरून जाते.
(प्रतेकाने स्वत: स्वत:च judgement घायला हारकत नाही. घरी, office मधे जरा स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष द्या. आपण कीती वेळेला नाही म्हणतो ते पाहून आपल्यालाच आश्चर्याचा धक्का बसेल)

Japanese person: I think most of the Indians always start the sentence with No.
Indian person: No! I don't think so its true. (we ourself use 'No' so frequently that we do not even realize that we have just said it)

"नाही म्हटल तरी" हे कोष्टक तर आपण हे किती सरास वापरतो. त्यात थोडासा का होईना नकार, नकारत्मक विचार आलाच की. "नाही म्हटल जरा कठिण trek ला जाऊन बघाव". "नाही म्हटल तरी ती हुशार आहे!" अस आपण सहज बोलतो. अस म्हणण्या पेक्षा "मी कठिण trek ला जाते/ जाणार आहे", "ती मुलगी खरच हुशार आहे" अस सरळ साध बोला न! (सरळ साध आपण का नाही बोलत).

We Indians are famous to say 'Yes' just like 'No'. खरच विचार करा. आपण खरच ’हो’ म्हणताना डोक्यानी ’नाही’च म्हणत असतो. "Always think positive" or "How to think positive" "सकारात्मक विचार केल्याचे फायदे" अशी पुस्तक आपण मोठेपणी वाचतो. पण त्याचा उपयोग आपण आपल्या नंतरच्या पिढी परियंत कसा पोहोचवतो त्याचा पण विचार नको का करायला. लहान लहान गोष्टीतून जर का आपल्याला हे सकारत्मक विचात मुलांवर कोरता आले तर मोठेपणी त्यांना "Personality development" "How to pass positive vibes" "How to think positive" असल्या courses ला जाण्याची गरजच उरणार नाही.

माणसाने नेहमी सकारात्मक विचार करावा अस आपण सारख म्हणतो. मग लहान मुलांना वाढवताना हा सकारत्मक विचार आपण बोलण्यात आणला तर? अहनाच्या बाबतीत आता आम्ही कटाक्ष घातला आहे. अहना तोंडात बोट नाही घालायच अस म्हणण्या पेक्षा आम्ही "अहनाने आता तोंडातून बोट काढल आहे" अस म्हणतो. कुठेतरी नकळत आपण आपल्या मुलांवर नकार अथवा नकारात्मक गोष्टी बिंबवत असतो. हो ना!