कालचीच गोष्ट आहे. मी रात्री झोपण्याची तयारी करत होते. गाद्या घातल्या आणि लक्षात आल की त्यांची Alignment काहिशी चुकलेली आहे. चटकन Align Button शोधण्यासाठी गादीच्या वार नजर गेली आणि माझच माला हसू फ़ुटले. पण मग एक पूसटशी [पूसटशी कशाला, चांगली दांडगी] इच्छा मनात आली. माझ्या कल्पनेतील Automation ची दुनीया...
Technology, Automation असे शब्द office मधले. त्यांचा घरी म्हणावा तसा फ़ारसा उपयोग होत नाही. तस बघता 5S system मधे आपण घरातल्या kitchen ची उदाहरणे सांगत - वापरत असतो. मग घरातल्या automation ला का बरे प्रधान्या देऊ नये. Technology च्या क्रांतीने Food-processor, Automatic washing machine, Microwave ह्या गोष्टी घरात नुसत्या आल्या नाहीत तर ग्रुहीणींचे अनेक आशीर्वाद सुद्धा त्यांनी मिळवले.
पण अजून आपल्याला ह्यात खूप प्रगती करायची गरज आहे.
उदा. घरच्या कामासाठी Ctrl + A, Ctrl + C, Ctrl + V, Ctrl + X आणी Crtl + Z अश्या काही गोष्टींच सौशोधन करण्याची.

मी वरील सांगीतलेला किस्सा ह्या गोष्टीचा वापर करून जरा आता पुन्हा imagine करून बघा.
प्रसंग - रात्रीची झोपण्याची तयारी करणे : मी Remote Monitoring System सारखी कसली तरी technology वापरून बसल्या जागेवरुन गाद्या घालते आहे. अथवा - Touch screen चा वापर करून वरील Ctrl सारख्या commands देते आहे. गाद्यांची Alignment चुकणे केवळ अशक्याच. आणि alignment समजा चुकलीच तर Just-a-click Align paragraph वापरून ती ताबडतोप व्यावस्थीत करणे.
स्वयंपाक करताना मीठ अथवा मसाला कमी जास्त पडला? No-Problem... Paint brush, Dream Viewer सारखा काहीतरी tool वापरून त्यात भाजी Crtl + X आणी Ctrl + V करून paste करा आणि Color pannel मधल्या Edit color सारख काहीतरी वापरून Edit मसाला, Edit मीठ वापरून ती भाजी Edit करा - की झालीच की First class भाजी तयार.
मी एकटी राहील्यापासून मला ह्या Crtl किव्हा Undo [Crtl + Z] ची गरज अधीकच भासायला लागली आहे. एकदा मी पोळ्या करताना ’नजर हटी - दुर्घटना घटी’ तशी पोळी करपली. काश माझ्याकडे undo हा option उपलब्ध असता... :(
माझ्या सारखा अनेक जणांना अजून एका गोष्टीचा तिटकारा नक्की येत असणार. ती म्हणजे,’जेवण झाल की खरकड काढण्याचा आणि थोडीफ़ार गरजेची भांडी घासण्याचा’. जेऊन सुस्तावलो की हे सगळ करायच म्हणजे office time संपल्यावर boss नी काम दिल की कशी संतापाची भावना येते तसच काहीस.... लहान असताना मी आईला नेहमी म्हणायचे,’जेवण झाल की एक button पाहीज, जेणेकरून सगळी खरकटी भांडी खाली washer मधे पडून चांगली लख्ख होऊनच वर येतील’आणी आपापल्या नेमलेल्या जागेवर जाऊन विराजमान होतील. [अर्थात त्या वेळी washer माहीत नसल्याने, ती भांडी खालच्यांच्या घरात पडावी अशी ईच्छा असायची, आम्ही top floor ला राहतो हे काही सांगायला नको].
ही आजूनही माझी सुप्त ईच्छा आहे.
अजून एक अत्यंत गरजेची ईच्छा म्हणजे - Human Fax machine. मी ह्या बद्दल आधीच्या blog मधे बोललेच आहे. घरातून स्वता:ला fax करायच आणी काहीच सेकंदात office च्या खूर्चीवर बाहेर. शेतकऱ्याने भाजी सरळ Fax करायची की भाजी direct घरातल्या fridge मधे.
Microwave, washing machine ह्या गोष्टीना 'The most innovative and useful technolog' चा किताब मिळाला ही गोष्ट खरी आणी योग्य असली तरी, आणि ह्या गोष्टीमुळे काम सोपे झाले आहे ही गोष्ट सुद्धा जरी खर असल तरी अजून आपल्याला खूपssssssss प्रगतीची आणी Automation ची गरज आहे.