Thursday, April 02, 2015

किती सुगंधी पादतेस गं तू !

      माझी office ची colleague नुकतीच माझ्या घरी आली. तिला मी trekking आणि adventure करते हे माहित होतं. आमच्या office मध्ये दर शुक्रवारी एक get-together  करून, त्यात आपल्या hobbies, passion बद्दल सांगून त्याची माहिती सगळ्यांना द्यायची, असा एक लहानसा पण सुंदर असा उपक्रम राबवला जायचा. मग कुणी अंतराळाबद्दल, science बद्दल, photography बद्दल माहिती द्यायचं. मी mountaineering आणि adventure बद्दल माहिती दिल्यामुळे, तिला मी हे सगळ करते हे समजलं होतं. नुकतचं तिला मी painting आणि home décor च्या वस्तू करते ते समजलं. तिने मला त्या बद्दल विचारलं असता, मी माझा अलबम तिच्याशी शेर केला. त्यातल्या काही वस्तू तिला आवडल्या. त्याच बघायला आणि काही विकत घ्यायला ती माझ्या घरी आली.
      
      मी माझ्या घरी आत शिरल्यावर एक wall paint केली आहे. तिने त्याचं कौतुक केलं. मी पण जरा भाव खाल्लाच. मग आमच्या गप्पा चालू झाल्या. मी तिला मी तयार केलेले काही samples दाखवले. प्रतेक वस्तू हातात घेऊन, ती नीट निरखून ती त्याचं कौतुक करत होती. कौतुकाने माझ्यात दोन इंच मास चढलं असं मी म्हणू शकत नसले तरी मी केलेल्या गोष्टींचं कौतुक मला आवडत होतं. माझ्या trekking  आणि painting चं कौतुक तसंच थोड्यावेळ चालू राहिलं. मग मी तिला गरम गरम पोहे खायला kitchen मध्ये बोलावलं. Kitchen ला attach अशी माझी balcony आहे, जिथे मी खूप सारी झाडं लावली आहेत. मग तिने माझ्याकडून थोडीशी झाडांची माहिती घेतलीं. मग माझ्या so-called gardening skill चं पण कौतुक झालं. अता मत्र मला त्या कौतुकाचा जरा राग यायला लागला होता. तिला खरच मी केलेल्या गोष्टी आवडत आहेत का कौतुक करण हा तिचा स्वभावच आहे, हेच मला समजेना. Office मध्ये मझा आणि तिच्या तसा संबध येत नसे, म्हणून मला तिच्या स्वभावाबद्दल काहीच माहित नव्हतं. एकीकडे मी पोहे करत होते. गरमा गरम पोहे खाताना ती म्हणाली, “ए! मस्त झाले आहेतं पोहे”. असं तिने म्हटल्यावर मी खरं तर तिला Thank you म्हणायला पाहिजे होतं. पण मी तिला thank you म्हणण्या वेजी, “खा ग अता गपचूप” असं जरा रागातचं म्हणाले.

      मग मनात विचार आला.... अती कौतुकाने मला अजीर्ण झाल्यासारखं वाटत होतं. अजीर्ण होऊन मला अपचन झालं आणि gasses झालें आणि मी फुसकुली सोडली तर ही बया म्हणायची, “किती सुगंधी पादतेस गं तू!” असा विचार मनात आला आणि मी तुच्यास समोर हसायला लागले.

      कौतुक कुणाला नाही आवडतं, पण कौतुकाला पण मर्यादा असावी हे आज समजलं. अति कौतुकाने सुद्धा अजीर्ण होतं हे ही तितकचं खरं.

2 comments:

Anonymous said...

sheeeeee

mazya muli (9 and 6) asalech kahi bahi boltat.

Jyoti Pawar said...

Hahahahahahahahaha...hasun hasun lot pot...