Saturday, October 21, 2006

योगायोग...

योगायोग...


प्रत्येक माण्साचं भविष्य जसे त्याच्या जन्मवेळेनूसार व त्याच्या आधाराने बनवलेल्या कुंडली अनूसार असते तसेच माण्साच्या आयुष्यात येणारे योगयोग हे त्यच्या इच्छानुसार येणे हे देखिल त्यच्या कुंड्लीवरच अवलंबून असणार ह्यावर माझा ठाम विश्र्वास आहे. म्हणजे बघा हं - One should be at the right place at the right time अशी इंग्लीश म्हण आहे. पण माझ्या बाबतीत मात्र येगायेगाचे ग्रह फ़ारच चिवित्र पध्दतीने मांड्ले आहेत. माझ्या बाबतीत नेहमी - Always in the wrong place at a very wrong time असेच घडत आले आहे.

शाळेत असताना भूषण नावाचा एक मुलगा माझ्या वर्गात होता. त्याच्या योगायोगाचा योग जबरदस्तच होता. परीक्षेच्या वेळी नेहमी योगायोगाने गोष्ट अशी घडायची की त्यच्या पुढे एक सडपातळ बांध्याचा, अतीशय हुषार मुलगा बसत असे. योगायोगाने त्या मुलाचे अक्षर त्यच्या शरीरयष्टीला न शोभण्या एवढे मोठे असायचे. त्यामुळे एकाच उत्तरपत्रीकेवर दोघेही घसघशीत यश मिळवून पास होत असत. माझ्या योगायोगाने एक हुषार मुलगी माझ्या पुढे बसत असे खरी, पण भारदस्त शरीराची व किरट्या अक्षराची. त्यामुळे तशाप्रकाराचा भुषणास्पद योगायोग माझ्या बाबतीत आलाच नाही.

दहावीत मात्र मी चक्क कसून अभ्यास केला. त्यामुळे चांगल्या - नामवंत कॅलेजात प्रवेश मिळाल्यावर मी माझे ग्रह बदलले असे वाटून खुशीत होते. पण अरे देवा! माझ्या आगे - मागे ढढोबा ! त्यामुळे कपाळाला हात मारून आभ्यासाला लागले. अभ्यास न करता योगायोगने पास होण्याचा योगच माझ्या कुंडलीत नाही हो !

मनसोक्त भटकंती करावी, ट्रॅकिंग करावे व त्याच बरोबर अभ्यासात पण भरगोस यश मिळवावे असे एकत्र ग्रह माझ्या आयुष्यात कधी येणार ह्याची वाट पाहतच मी ग्रॅज्यूएट झाले. अमुक एक मुलगा / मुलगी गाण्यात, नाचात, क्रिकेट इत्यादी मधे यशस्वी होऊन अभ्यासात देखिल गौरव मिळवतात हा त्यांच्या आयुष्यात घडत असलेल्या अनुकुल योगायोगा मुळेच असं मला वाटत.

तसा कॉलेजला जाण्याचा पहिला दिवस अविस्मरणीयच. धावत जाऊन लोकल पकडली. खिडकीत जाऊन बसले आणि लक्षात अले अख्खी गाडी रिकामी असून गाडी कारशेडला चालली आहे. कारशेड कशी असते हे बघण्याच कुतुहल त्यामुळे योगायोगानेच घडलेच.

प्रत्येक माणसाच्या बाबतीत योगायोगाच्या गोष्टी घडतच असतात. जेवणाची तयारी केल्याबरोबर दरवाजाची बेल वाजते, पाहूणे येऊन जेवणाचा भुरके मारत अस्वाद घेतात, कांहीं माझ्यासारखे लोक मात्र इतरांच्या घरी नुकतीच जेवण झाल्यावर पोहोचतात. योगायोग लागतो हो! फ़ुकट ते सगंळ पौष्टीक जेवायला.

सगळ्यात जबरदस्त योगायोह कुठे घडत असेल तर तो सिनेसुष्टीत. विलक्षण आणि बुध्दीच्याही पलिकडले. आपल्या सिनेमातल्या हिरोइन्स पडल्या, त्यांची पुस्तकं पडली की आपले हीरो आजूबाजूला असतातच मदत करायला. अशा योगायोगाची कित्येक तरूण - तरूणी वाट बघत असतात पण त्याच्या बाबतीत असा योगायोग कधीतरी घडतो कां याची शंकाच आहे.


शर्वाणी खरे.
०२/११/२००५


1 comment:

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.